Subscribe:

Friday, April 6, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०५.०४.२०१२)


हरी ॐ 

आज सहा महिन्यानंतर आपण भेटतोय.. पहिल्यांदा एक लहानशी छान गोष्ट सांगायची आहे .
१) पुण्यातील आळंदीजवळ पुरुषार्थ धामासाठी आपण जागा घेतली आहे तिथे आता रस्त्याचे काम सुरु होत आहे.
२) श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशनतर्फे गरीब वृद्धांच्या  उपचारासाठी आपण सानपाडा येथे ५६०० स्क्वे.फ़ीटची जागा घेतली आहे. जुईनगर पासुन ५ मिनिटे अंतर चालत ही जागा आहे. हे वृद्धाश्रम नव्हे तर गरीब वृद्धांना व्यवस्थित उपचार मिळावेत म्हणून हे आपण हॉस्पॉईस म्हणजेच हॉस्पिटल व नर्सिंगहोम एकत्रित बांधत आहोत.

  हरी ॐ

  गेले सहा महिने तपश्चार्या चालू होती अनेक मंडळी गुरुक्षेत्रम मध्ये येत होती. नेमके काय घडत आहे किंवा घडले असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत होता. योंगिद्रसिंहनी ह्यावर पुस्तिका ही लिहिली होती. किती जणांनी ती वाचली. एवढ्या लोकांमध्ये फक्त ७०-८० हात वर आहेत. म्हणजे अजून एवढी आमच्याकडे निरक्षरता आहे!!

मी (प.पू.बापू.) आज एव्हढेच सांगेन की जशी माझ्या आईला हवी होती तशी ही तपश्चर्या सफल संपूर्ण झाली. मला जे हवे होते ते मला मिळाले. मी स्वार्थी आहे आणि माझा स्वार्थ हा माझ्या मित्रांसाठीच आहे.

येणार्‍या कठीण काळात जो कोणी श्रद्धावान माझ्यावर संपुर्ण पणे विश्वास ठेवेल त्याला ह्या तपश्चर्येचे फळ मिळेल. श्रद्धावान म्हणजे ज्याची १०८% श्रद्धा आहे तोच खरा श्रद्धावान.  

जेव्हा माझी श्रद्धा आहे असे म्हणतो तेव्हा स्वत:ची किती श्रद्धा आहे ते प्रत्यकाने पडताळून पहायला हवे. आमची श्रद्धा लोलकाप्रमाणे डोलत असते. कधी ९० डिग्री तर कधी ३६० डिग्री. साईसत्चरीतात आपण १९, २३, ३२, ३८ व्या अध्यायात आपण श्रद्धा कशी असावी ते बघतो. श्रद्धा म्हणजे All or None एकतर पुर्णपणे नाहीतर काहीच नाही. ह्यामध्ये थोडे किंवा जास्त असे नसते. 
  
अश्या श्रद्धेवरच कुठलेही मोठे संकंट लीलया पार होऊ शकते. कलीयुगात मानवाचा जन्म मिळाला आहे म्हणजे पापाचे गाठोडे हे पुण्यापेक्षा नक्कीच जास्त आहे ह्याला कोणीही अपवाद नाही. त्यामुळे मी किती सात्विक किंवा मी किती वाईट असा विचार कधीच करु नये.
मात्रुवात्स्यल्यमध्ये आपण कलीचा प्रभाव कसा आहे हे वाचले. एक लक्षात ठेवा कलीयुगात प्रवेश करताना जेवढे जीव निर्माण केले गेले त्या प्रत्येकाची उत्क्रांती मानवापर्यंत झालेली असते. म्हणजेच सर्व योनींमधून प्रवास करत मानवाचे सात जन्म झालेले असतात. ज्याअर्थी मानवाचा जन्म आहे त्याअर्थी थोडेतरी सत्व गुण आमच्यात आहेत. जेव्हा सत्वगुण नाहीत तेव्हा गाय, घोडा, हत्ती, कुत्रा अश्या योनीत जन्म होतो. म्हणजेच मी जसा पवित्र नाही तसेच माझ्या आजुबाजुचेही कोणी संत नाहीत हे आम्हांला माहिती पाहिजे. 

आमचे combination कोणाही बरोबर नाही . आम्ही ३ युगे मानवाचा जन्म फुकट घालवला म्हणुन कलीयुगात आम्ही मानवाच्या जन्माला आलो, कारण कलीयुगात जास्तीत जास्त भोग भोगून घेतले जातात.
जो कोणी माझ्यावर १०८% विश्वास ठेवेल त्याने कितीही पापे केली तरी योग्य वेळी त्यास मदतीचा स्त्रोत कमी पडू नये ह्यासाठी ही तपश्चर्या होती. माझे भांडार मी open  करुन ठेवले आहे.
त्यासाठीच रामनवमीला मी येथे जप करत होतो. पण ह्या भांडारासाठी माझ्या आईची एकच अट आहे ती म्हणजे, " ज्याचे तुझ्यावर प्रेम आहे त्यालाच हे भांडार चोरता येईल".

ज्याचे माझ्यावर १०८% प्रेम त्याला ह्या भांडारातील एक टोपली उचल्यावर न मागताही १० टोपल्या पण मिळतील. म्हणूनच बाळांनो तुम्हांला आतपर्यंत जेवढी पापे आठवत असतील ती सोडून द्या. कारण आमच्या बापूने त्याची सोय केली आहे. आता ह्यापुढे मात्र चांगले वागायचे एव्हढेच लक्षात ठेवा.

असं का ? तर medical मधले उदाहरण बघू. समजा तुमच्या पोटात acidity झाली आहे आणि तेव्हाच खूप भूक लागली आहे अश्यावेळी जर तुम्ही एकदम तळलेले fish व झणझणीत रस्सा खाल्ला तर ह्यामुळे भूक भागेल पण किती वेळ बर वाटेल?  इथे परत acidity होणारच आहे. म्हणजेच जे योग्य आहे ते महत्वाचे असते. आपल्याला जीवनात कधी साध्या आजरावर औषध घ्यायचे नसते तर मग जेव्हा समृद्धी, शांती, समाधान ह्याविषयी जेव्हा रोग होतो तेव्हा आपल्याला doctor मिळत नाही.

मला (प.पू.बापू) तुमची भीती घालवायची आहे. कारण भित्रेपणामुळे तुमच्याकडून ९९% चुका घडत असतात.
कलीचे कामच भय उत्पन्न करणे आहे आणि मला तुम्हांला निर्भय बनवायचे आहे.


"माझं बापूवर जेव्हढं प्रेम तेवढ्या प्रमाणात मी निर्भय".

  
वाल्याकोळ्याने १०,००० बलात्कार केले व तेवढ्याच प्रमाणात लुटमार केली. तरीही गुरुवर जेव्हा त्याने विश्वास ठेवला तेव्हा तो पूर्णपणे पापमुक्त झाला..... मग आम्ही का नाही होणार? म्हणूनच मनात ह्यापुढे भिती बाळगायची नाही.
इथे प्रत्येकजण माझ्या फोटोशी बोलताना स्वत:च्या सोयीनुसार सांगत असतो.
मी खरं सांगतो dr. अनिरुद्ध धैर्यधर जोशी नावाच्या माणसाला तुमच्या मनातील काहीही कळत नाही......त्यामुळे तुम्ही निर्धास्त रहा.
इथे बघा माझं बोट दिसतेय ..हे बोट म्हणजे बोटाची चामडी दिसतेय त्याच्या आत मधले रक्त,मांसपेशी दिसतात का? नाही. तुमचं ह्रुदय ७२ वेळा लब डब वाजतेय तुम्हांला ऐकू येतेय पण दिसते का? नाही. इथे आता हवा आहे पण ती कोणाला दिसत आहे का? नाही. मग इथे हवा आहे ह्याचा पुरावा काय ? प्रत्येक जण तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुम्ही जिवंत आहात ह्याचा पुरावा काय ? मी काही मोठा ज्ञानी नाही, मला सोप्या गोष्टी समजतात.

 म्हणजे जे दिसत नाही ते नसते हे खरं नाही. ह्याचाच अर्थ दिसतं तसे नसतं.
एक छोटीशी घडलेली गोष्ट सांगतो, एका गुरु कडे एक शिष्य होता तो अतिशय चिकित्सक होता.
त्याने अनेक ग्रंथ वाचून काढले पण प्रत्येका बाबत त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असत त्यामुळे कधीही त्याला समाधान मिळत नसे तेव्हा गुरु त्याला म्हणाले, ’ बाबारे, तु कुठलातरी एकच ग्रंथ निवड व त्यावर मन एकाग्र कर व ते जीवनात उतरव "
सततच्या शंकानी त्रस्त होऊन तो शिष्य एकदा गुरुस म्हणतो, "तुम्ही मला एकच काहीतरी करायला सांगा ज्यामुळे मनाला शांती मिळेल "
गुरु त्यास सांगतात उद्या जेवढ्या वेळ जमेल तेव्हढा वेळ," जय हरी विठ्ठ्ल श्री हरी विठ्ठ्ल" हा जप कर" दुसर्‍या दिवशी उठल्यावर जप सुरु करणार तेव्हढ्यात ह्या शिष्याच्या मनात प्रश्न येतो की कधी पासुन करायचा, कुठल्या तिथीपासून करायचा ते गुरुने सांगितलेच नाही. परत हे प्रश्न घेऊन तो गुरुकडॆ जातो.
गुरुंना म्हणतो, "महाराज, तुम्ही नीट मला आदेश दिला नाहीत" म्हणजे इथे त्याला चूक कोणाची वाटते? गुरुचीच!!
गुरु त्यावर म्हणतात, "ठिक आहे आज दुपारी बारा वाजता सुरु कर" आता स्पष्ट आदेश मिळाला असा विचार करुन तो बारा वाजता जप सुरु करणार तेव्हढ्यात त्याला प्रश्न पडतो, जप उभ्याने करायचा की बसून की सोवळे नेसुन ते गुरुने सांगितलेच नाही, जप करताना कांदा- लसुण खायचा का ते ही नाही सांगितले"
परत तो गुरुकडे येतो परत तक्रार करतो तुम्ही नीट आदेश नाही दिला. त्यावर गुरु सांगतात, "साध्या कपड्यात कर, चालताना, उठताना कधीही कर, जेवणाचेही काही बंधन नाही" परत तो प्रश्न करतो आताकधी सुरु करु कारण तो पर्यंत दुपार होऊन गेलेली असते. गुरु सांगतात "घरी गेल्यावर सुरु कर"
घरी गेल्यावर तो जप सुरु करणार तोच त्याला भुक लागते, त्याच्या स्वयंपाकीण बाईचे नाव विठाबाई असते. ती जेवण वाढते, तेव्हा त्याला भाजीत मीठ लागत नाही ह्या कारणावरुन तो विठाबाईचा उद्धार करतो.... विठे तुला अक्कल नाही, तू नरकातच जाशील, असा तोंडाचा पट्टा त्याचा सुरु होतो.
जेवण झाल्यावर पोट जड झाल्याने त्याची शत पावली सुरु होते, शतपावली करताना gas सुटू लागतो. gas सुटताना नाव घ्यायचे कि नाही असा प्रश्न त्याला पडतो परत तो गुरुकडॆ त्याच अवस्थेत धावत जातो. त्यावर गुरु शेवटी त्याला म्हणतो, "बाबारे तुझ्या मनाला वाटेल तेव्हा नाव घे"

ह्या कथेवरुन आपल्याला लक्षात येईल की आमच्या मनाला किती प्रश्न पडत असतात . एकदा विश्वास टाकला की तर्क कुतर्क करत बसू नका. आमची कधी पूर्ण श्रद्धा असते तर कधी काहीच नाही.
जेव्हा झाड वाढते तेव्हा त्याची पाने, फुले, फळे आपल्याला दिसतात पण आपण पाणी - खत कुठे घालतो? मुळांनाच मग त्या पानांना सूर्यप्रकाश देण्याचे काम तो परमात्मा करत असतो. 

आम्ही सामान्य माणसं आहोत; सुख, मोह कितीही आकर्षक वाटले तरी आम्हांला मुळालाच म्हणजे श्रद्धेलाच पाणी घातले पाहिजे .
लक्षात ठेवा माझी श्रद्धा माझी आहे त्यावर कोणाचाच अधिकार नाही. तुमच्या पापात, चुकीच्या  गोष्टीत तुम्हांला  सगळ्यांचे सहाय्य मिळू शकते. पण हे श्रद्धेच्या बाबतीत घडत नाही. जर कोणी तुमची श्रद्धा कमी करु शकत असेल तर ह्याचा अर्थ तुमची श्रद्धाच नाही.

झाडाला पानं, फुलं, फळ आल्यावर मी श्रद्धा ठेवेन तर असे होत नाही. तुमच्या मनात कुठले विकार, कुठली बीजे आहेत ह्याची तुम्हांला महिती असते का? ते फक्त तोच जाणतो. आम्हांला आमची श्रद्धा फक्त बळकट करायची असते.

जेव्हा स्वत:ची भक्ती great  वाटू लागते तेव्हा श्रद्धा शून्य आहे असे समजावे . जर त्या परमात्म्याकडे श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव नाही तर मग तो तुमच्याकडे कशाला हवा?

सद्गुरुंच्या रांगेत माझे जे काही आहे ते कोणीही चोरु शकत नाही, म्हणूनच फालतू प्रश्नांना जिवनात स्थान द्यायचे नाही.
गुरुक्षेत्रम मंत्र बापूंनी आम्हांला म्हणायला सांगितला आहे मग तो पुर्वेकडे बसुन म्हणायचा की पश्चिमेकडे असे प्रश्न नकोत. समजा हा मंत्र १०८ वेळा म्हणायचा आम्ही ठरवले नियम केला आणि काही कारणामुळे जमू शकले नाही तर त्याचे ओझे बाळगू नका, आम्ही केलेले नियम आम्ही पाळू शकत नाही म्हणुन आम्ही नालायक आहोत असा कधीही समज करुन घेऊ नका.

आम्ही चांगल्या गोष्टीसाठी केलेले नियम पाळायची ताकद आम्हांला कुठून मिळणार आहे? तर बापूंच्या खजिन्यातून ...

स्त्रियांना ह्याची खरी गरज असते. स्त्रिची व्यथा तीच जाणू शकते. ती कितीही modern असली तरी तिच्या अनेक difficulties असतात . स्त्री जमात ही मातृत्व उदरात घेऊनच जगते.
पंचशील परीक्षेमध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त असते पण तेच होम, स्तवन असेल तर स्त्रियांना माघार घ्यावी लागते. नवर्‍याची परवानगी, मुलांचे प्रश्न, घरातल्या जवाबदार्‍या अशी अनेक ओझी घेऊन स्त्रिया जगत असतात. म्हणूनच एखादी चूक घडली तर देव कोपेल अशी भिती स्त्रीला जास्त असते. 

म्हणुन मी एक partiality  केली आहे ,मी पुरुषांना १० ग्रम efforts मध्ये ५०% देईन तर तेच स्त्रियांना १० ग्रम  efforts मध्ये १००% देईन. 

स्त्रियांनाच इथे झुकते माप का ? तर मासिक पाळीच्या काळात स्त्रिचे मन चिडचिडे होते, मनाची अस्थिरता वाढते.ज्याला irritable mind म्हणतात,ह्या अवस्थेतुन त्यांना कायम जावे लागते. अशीच स्थिती तिची  menopause च्या काळातही होते,तिच्या शरीरात घडणार्या ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत, हा कुठलाही विकार नाही हे तिच्या पतीने व घरच्यांनी समजुन घेतले पाहीजे. 

 घरातील स्त्रीच धर्माचे संस्कार सांभाळत असते. कुठलाही सण असो घरात तो सण साजरा करताना स्त्रीयाच जास्त झटत असतात. त्याच घरातले विविध सण सांभाळतात. स्त्रीच मुलाला घडवते, सासर्यांना सांभाळते, नवर्याची काळ्जी घेत असते. 

ह्या तपश्चर्येचे सगळॆ फळ  open  आहे.त्यामुळे तुमच्या श्रद्धेच्या आड येणार्या नानाविध प्रश्नांना ह्यापुढे घाबरायचे नाही. कितीही मोठ्यात मोठी चुक झाली तरी तुमचा बापू समर्थ आहे सांभाळायला.

चित्रगुप्ताचे मला माहित नाही पण माझ्या (प.पू.बापू) मनाच्या पटलावर तुमच्या चुका, दोष किंवा पापे मी कधीच लिहुन ठेवत नसतो. म्हणुन मला काहीही कळ्त नाही . हे negative account  माझ्याकडे (प.पू.बापू) कधीच नव्हते आणि ह्यापुढेही कधीही नसेल.
मला फक्त तुम्ही किती भक्ती केली ?तुम्ही किती चांगल्या गोष्टी केल्या? ह्या तुमच्या फक्त चांगल्या गोष्टींचे  account माहीत असते. 

गुरुक्षेत्रम असो की पुरुषार्थ धाम हे सगळे बापुंनी आमच्यासाठी दिले आहे हे लक्षात ठेवा. 

कित्येकांच्या घरात अनेक देवांचे भरमसाठ फोटॊ असतात. एकाच खोलीत बाबांचा फोटो आहे , स्वामींचा आहे,गणपतीचा आहे, चण्डिकाकुलाचा आहे, अनिरुद्ध बाबाचा आहे..इतके फोटो असतात की ते कुठे ठेवायचे हा प्रश्न पडतो.  ह्याबाबतीत मागेही मी एकदा सांगितले होते की, फोटो किंवा मुर्ती ज्या पुजेला लावायच्या त्या मोजक्याच असाव्यात .इतर फोटो लावायचे असतील तर ते प्रेमाने जरुर लावु शकतात. 
कारण घरात ५० फॊटो असतील तर त्या सर्व फोटॊंची रोज पुजा करणे शक्य नाही,आणि मग एखाद्या दिवशी जर पुजा करायची राहुन गेली तर मनात भिती -शंका निर्माण होऊ लागतात.

हल्ली लग्नात किंवा इतर समारंभात देवाच्या मुर्ती भेट देतात, हे चुकीचे आहे. आतापर्यंत जे घडले ते घडले पण ह्यापुढे उगाचच कोणालाही देवाच्या गोष्टी भेट म्हणुन देत जाऊ नका.कारण ह्यात आपण किती सायंफिटीक गोष्टी पाळतो ? हे आपल्याला कळत नाही.

 जर एखाद्या व्यक्तीकडे already  एका देवाची मुर्ती असेल तर तुम्ही त्याच देवाची अजुन एक मुर्ती भेट देऊन त्या व्यक्तीला संकटात टाकता. कारण ही मुर्ती विकता येत नाही की मोडता येत नाही. आज हे मुद्धामहुन सांगतोय कारण गेल्या १२ महिन्यात मला असे मुर्तीविषयी १८१ प्रश्न विचारले गेले. 
अशी मुर्ती दिल्याले तुम्हांला पुण्य मिळत नाही. प्रत्येक तिर्थक्षेत्राला गेल्यावर तिथला फोटो आणलाच पाहिजे असे कुठलेही बंधन नसते. 

अश्या जर अनेक देवाच्या मुर्ती घरात असतील तर त्यासाठी आपल्या धर्मात स्पष्टपणे एक विधी सांगितला आहे. 
ह्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्राम्हमुहूर्तावर उठुन एकाच देवाच्या २-२ मुर्त्या झाल्या असतील तर त्या सर्व फोटॊंचे , मुर्त्यांचे पंचोपचाराने पुजन करायचे. म्हणजेच 
(१) स्वत:च्या हातांनी उगाळलेले चंदन सर्व फोटोंना लावायचे.
(२) नंतर दोन प्रकारच्या अक्षता पिवळ्या व लाल (हळदीची आणि कुंकवाची) सर्व फोटोना अर्पण करायच्या. 
(३) सुगंधित फुले सर्व फोटोना अर्पण करायची.
(४) सुक्या खोबर्याची एक वाटी + गुळ हा नेवैद्य (सर्व फोटोना मिळून एकच नेवैद्य) अर्पण करायचा.
(५) व शेवटी धूप दाखवायचा. 

असे पुजन झाल्यावर एक साष्टांग घालायचामग हे सगळे फोटो व मुर्त्या एका सोवळ्यात बांधून दुपारी १२ वाजायच्या आत पाण्यात विसर्जन करायच्या.

घरात भारंभार देवाच्या मुर्ती ठेवल्याने तुमचे concentration  होत नाही.एखाद्या दिवशी एखाद्या फोटोची पुजा चुकली तर मनात भीती निर्माण होते.ह्या भयामुळे प्रेम कमी होते. 

एकाच देव्हार्यात एकाच देवाच्या दोन मुर्ती कधीही ठेऊ नयेत कारण ती मुर्ती ही केवळ मुर्ती नसते तर त्या देवाची शक्ती असते व ती शक्ती तुमच्या capacity  नुसार कार्य करत असते. फोटोच्या बाबतीत असे नसते. 

कुठल्याही देवाच्या सगुण मुर्ती अश्या चिन्हांनी बनलेल्या असतात की आपोआप त्या देवाची कार्य शक्ती त्यात येते तिथे वेगळी प्रतिष्ठापना करावी लागत नाही.आपण सामान्य मानव त्यामुळे आपली देवाकडुन ग्रहण करण्याची capacity किती असणार? त्यातही आपण जर आपल्या देवाच्या कार्यशक्तीला दोन मुर्ती मध्ये विभागले तर आपल्याला काय मिळणार ?

आजपासुन निर्भयपणे जगा. माझ्यासोबत म्हणा...(सगळे प.पू.बापूंसोबत म्हणतात..)
" मी आजपासुन सगळी भीती सोडुन दिली..पुर्ण काळोख , आजुबाजुला शेकडो भुते असली तरी माझं कुणीही वाकडं करु शकणार नाही .उलट मीच त्या भुताला चांगली गती देऊ शकतो .."

कारण तपश्चर्या आमच्या बापाने केली आहे ...म्हणजे ही वडिलोपार्जित इस्टेट आहे, ही कुणालाही नाकारु शकत नाही.

"मी (प.पू.बापू) फक्त माझ्या आईचे नियम पाळतो..आणि तिचे नाव आहे क्षमा.
माझी बाळे निर्भय बनली तर माझ्या तपश्चर्येचा आनंद मला जास्त असेल "

ह्याच वर्षी मी परत एकदा उपासनेला बसणार आहे पण तेव्हा मंडप नसेल.आज जे काही बोललो तसे वागणे ज्यांना जमत नसेल त्यांना booster dose  देण्यासाठी ती उपासना असेल. तेव्हा मी कुठेही फिरेन कोणाच्याही घरात जाईन ..मग तेव्हा तुम्ही तुमचे दरवाजे लावा अथवा नका लावु .. I dont care .  ok 

हरी ॐ  

2 comments:

Anonymous said...

maje bapu mala je have hote te aaj mialale att mahanva tya kalila kiti hi maje man brhasht kar pan majya bapuna nahi sodnara ki tyanchay baddal majay manat kahi hi yeanr nahi bapu maje aahet ani majay barobar rahanr aahet kadhi ani kute hi hari om bapu tumchi veera

Unknown said...

श्रीराम

Post a Comment