Subscribe:

Monday, June 27, 2011

Excerpts from Thursday Discourse dated 23 June 2011


 सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (२३ -०६-२०११)
                                                                         हरी ॐ
आता आपण दहावी वमनबाधा याचा दुसरा प्रकार बघणार आहोत. ते म्हणजे तीच चूक परत परत करणे. त्यावेळी आपण त्या चुकीच्या मागील कारणाला ओळखले पाहिजे. त्याचे वमन आपल्याला करता आले पाहिजे. जर करु शकत नसू तर वमनबाधा होते.  मलेरिया, टी.बी. असे आजार/रोग होतात. त्यावेळी जर नीट उपचार करुन त्याचे विषाणू दूर केले नाहीत तर तो आजार आपल्याला परत परत होतो. त्याचप्रमाणे चूक देखील परत परत होते. हीचा व्यय नाही असा कोणी नाही. आणि असेल तर तो ‘संत’ आहे. जर आपल्याकडून झालेली चूक एकदाच घडली परत कधीच त्याने ती चूक केली नाही तर ती व्यक्ति ‘संत’ असते की ज्याच्याकडून कधीच कोणतीच चूक घडतच नाही.
यातही दोन प्रकार आहेत एक म्हणजे ज्याला ती चूक केल्यामुळे पश्चात्ताप होतो/आहे आणि दुसरा म्हणजे ज्याला पश्चात्ताप नाही.


ज्या व्यक्तिला पश्चात्ताप होत नाही तो वमनबाधेत मोडत नाही आणि अशावेळी श्रीगुरुक्षेत्रमंत्रदेखील त्याच्या मदतीला धावून येत नाही. कारण ‘ज्याला बदलण्याची इच्छा नाही त्याला देवपण बदलू शकत नाही.’’ अगदी उपासना करुन जादूटोणा करुन देखील नाही. मनुष्य जर स्वेच्छेने एखादी चूक वारंवार करत असेल तर ती चूकच आहे आणि त्याला त्या बाबतीत त्याला पश्चात्ताप नसेल तर ती बाधा नव्हे पाप आहे.


याउलट जर चुकीचा/चुकीबद्दल पश्चात्ताप असेल तर बाधाप्रशमन श्रीगुरुक्षेत्रमंत्र त्या गोष्टीला (चुकीच्या) दूर करतो. पाप दूर करतो. पण जर पश्चात्ताप असेल तरच श्रीगुरुक्षेत्रमंत्र काम करतो.
माझ्याकडून जे घडतंय ते चुकीचे आहे आणि मी त्यातून बाहेर पडायचा ‘प्रयास’ करतो, अशा वेळी गुरुक्षेत्रमंत्र धावून येतो. (आपल्या मदतीला) तो आपले मन बदलतो, गोष्टी  अशा काही घडवून आणतो की आपण तीच चूक परत करणार नाही. पण ज्यांना पश्चात्ताप आहे, आपली चूक आहे हे मान्य आहे त्यांच्याविषयी /बाबतीच हे घडते.
बापू सांगतात, माझ्या क्लिनिक मध्ये माझ्या टेबलवर माझ्या डाव्या हाताला एक बेल ठेवली होती. एक पेशंट गेल्यावर दुसर्‍या पेशंटला बोलवताना बापू ती बेल वाजवून बोलवायचे. ती बेल काही कारणास्तव खराब झाली  आणि नवीन बेल बसवताना ती उजव्या हाताला बसवली. नवी बेल उजव्या हाताला आहे हे माहित असूनसुद्धा पुढचे काही दिवस नवीन पेशंटला बोलवताना हात पहिले डाव्या बेल वर जायचा ती वाजली नाही की मग दुसर्‍या बेल वर. म्हणजे काय ? तर हात आणि बेलची जागा यांचे कंडिशनिंग झाले होते.


‘कंडिशनिंग’ जेव्हा ‘अ’ नावाची घटना/गोष्ट आणि ‘ब’ नावाची घटना किंवा गोष्ट या सतत एकत्र घडतात, त्यावेळी  मेंदूमध्ये एक वेगळे नवीन सेंटर बनते की ज्यामध्ये ‘अ’ आणि ‘ब’ चा परस्पर संबंध असतो. आपल्या जीवनामध्ये जेव्हा २-४ गोष्टी सतत एकत्र घडत राहतात तेव्हा त्यांचे मेंदूमध्ये एक समीकरण तयार होते यालाच कंडिशनिंग  म्हणतात.


एका सायंटिस्टने एक कुत्रा ठेवला आणि एका ठराविक वेळेला एक विशिष्ट /वेगळा बझर लावून तो त्याला त्याचे आवडते खाद्य देत असे. काही दिवसांनी तो फक्त बझर वाजवत असे आणि रिकामी डिश त्याच्यासमोर सरकवत असे त्यावेळी देखील फक्त बझर ऐकून त्या कुत्र्याच्या तोंडात लाळ येत असे, नंतर त्याने डिश सरकवणे सुद्धा बंद केले तो फक्त बझर वाजवत असे आणि तेव्हासुद्धा त्या कुत्र्याची लाळ गळत असे. यावरुनच कंडिशनिंग इफेक्ट लक्षात येतो.


आपल्या मनाचे कंडिशनिंग हे आपणच करतो. काही बाबतीत आपले आईवडिल , संस्कार करणे ही गोष्ट चांगली की वाईट, दिवा लावला की नमस्कार करायचा ही सवय. माझ्या देवासमोर दिवा लागला की हात जोडला जातो ही सवय असते.
कंडिशनिंग जे आहे ते स्थळ, काळ, दिशा, वेळ आजूबाजूची परिस्थिती यावर अवलंबून नसते. आणि सवय जर आजूबाजूची परिस्थिती अनुकूल असेल तरच प्रकटते. समजा एखादा मुलगा सिगरेट पित असेल आणि त्याचे आईवडिल त्याच्यासमोर असतील, तर ती त्याची सवय असेल तर तो आईवडिलांसमोर पिणार नाही आणि जर का ते कंडिशनिंग असेल तर मात्र तो बिनधास्त ती सिगारेट त्यांच्यासमोर पण ओढेल.


‘‘सवयीपेक्षा कंडिशनिंग’ तीव्र असते. कंडिशनिंग मनुष्याला निर्लज्ज बनवते. त्याला स्थळ, काळ, वेळ बघायची गरजच भासत नाही. सवय आपण बंद करु शकतो.
तर बापू हे कसं काय ?


जर एखादा मनुष्य दारु पितो, दररोज एक पेग- त्याचा संबंध दुःख किंवा आनंदाशी नाही तर सवय.
पण ज्याक्षणी तो डोक्याला शांती मिळते, दुःख विसरल जातं, आनंद व्यक्त करता येतो म्हणून पितो ते कंडिशनिंग - त्यामुळे व्यसन लागते. सुटणारी ती सवय आणि न सुटणारी- कंडिशनिंग / व्यसन आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट सुधारायची किंवा नाही ‘इट डिपेंडस ऑन कंडिशनिंग’.


मोठ्यातला मोठा कंडिशनिंग मधून बाहेर यायला कंडिशनिंग च मदत करते.
निगेटिव्ह कंडिशनिंग चुकीचे. पॉझीटिव्ह कंडिशनिंग चांगले. की जे वाईटातून बाहेर पडायला मदत करते.
जर व्यक्ती दुःख विसरण्यासाठी किंवा चांगली ऍक्टिंग करतो म्हणून दारु/सिगरेट पित असेल त्यावर डिपेंडंट राहत असेल म्हणजे व्यसनी बनत असेल आणि जर त्याला त्यातून बाहेर पडायचे असेल तर त्याचे ऍक्टिंग दुसर्‍या गोष्टीबरोबर जोडले पाहिजे. दारु पिण्याने माझी ऍक्टिंग चांगली होते तर त्याने दारु प्यावी पण त्याबरोबर स्वतःच्या मनाने एखादे स्तोत्र म्हणावे की हा अमुक स्तोत्र बोलल्यावर माझी ऍक्टिंग चांगली होते. हळूहळू ती व्यक्ति पाच पेग दारु ऐवजी चार पेग आणि एकदा स्तोत्र पठण, तीन  पेग आणि दोन वेळा स्तोत्र पठण असे करत करत स्तोत्रांची संख्या वाढवत न्यायची  आणि पेगची संख्या कमी करत न्यायची. असे केल्याने त्याच्या मेंदूमध्ये पठणाचे नवीन केंद्र तयार होईल आणि त्याचे ऍक्टिंग चे केंद्र स्तोत्र पठण केंद्राशी जोडले जाईल. दारुच्या केंद्राची सत्ता कमकुवत होईल व पठणाच्या केंद्राची सत्ता वाढेल.
कंडिशनिंग वाईट किंवा चांगले हे आपल्यावरून ठरते. ती गोष्ट आणि माझे रिलॅक्सेशन (निवांतपणा) आपल्या नकळत चूक आणि रिलॅक्स होणं यांचं कंडिशनिंग होते.


आपण जेव्हा एखादी चूक करतो तेव्हा त्याचे ३ टप्पे असतात,
जेव्हा चूक घडत असते ती वेळ,  चूक करायच्या आधीची वेळ, आणि चूक केल्यानंतर,  हे ते तीन टप्पे.
त्यामध्ये पहिले चूक होऊ नये म्हणून आपण टेन्शन घेतो (चूक करायच्या आधीची वेळ).
चूक करताना रिलॅक्स असतो (चूक घडत असते ती वेळ).
आणि चूक केल्यानंतर पुन्हा आपण टेन्शन घेतो.


समजा १२ तास आपण उदाहरणादाखल घेतले व ह्याचे ३ टप्पे केले (४तास + ४ तास +  ४ तास)


त्यामध्ये पहिला आणि शेवटचा पिरिअड टेन्शन असते (४ तास + ४ तास) आणि चूक करताना रिलॅक्स पिरियड असतो (४ तास). रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले जागृत मन झोपते पण अंतर्मन मात्र विचार करत असते ते जागृत असते.
आणि अशा या अंतर्मनाला रिलॅक्सेशन आवडतं आणि ते तेच धरुन ठेवते.  अंतर्मनाच्या दृष्टीने आपण एकाच गोष्टीमुळे आठ तास टेन्शन आणि चार तास रिलॅक्स झालेलो असतो. अशावेळी अंतर्मन जेवा आपण रिलॅक्स (निवांत) झालेलो ते ४ तास धरून ठेवते व त्याचे केंद्र वाढवते (म्हणजेच चुकीचे केंद्र) आणि ते ‘चुकीच्या’ केंद्राशी जोडले जाते.
तसेच चूक घडण्याआधी व चूक घडल्यावर आपल्याला जो पश्च्त्ताप होतो व टेन्शन येते (४ + ४ = ८ तास) ह्या वेळात आपण निवांत नसतो, म्हणून अंतर्मन ह्या केंद्राला (चूक ना करण्याच्या केंद्राला) कमी ताकद पुरवते म्हणजेच हे केंद्र लहान बनते.
आणि मग साहजिकच चूक न करणार्या केंद्राची ताकद कमी झाल्याने  चुकीचे केंद्र (चूक करण्याचे केंद्र)  आपल्या बाह्या मनाला भारी पडते, आणि परत परत चुका होतच राहतात.




तर अशी वेळी काय करावे?


चूक घडण्याआधीचे ४ तास टेन्शन घेण्याऐवजी स्थळ बदला, देवळात जा, ते नसेल करायचं तर पिक्चरला जा, सार्वजनिक ठिकाणी जा, मोहाच्या ठिकाणी राहू नका.
समजा तुम्ही ऑफिस मध्ये आहात. एकच रुम आहे आणि तुम्ही दोघंच आहात, बाहेर पडू शकत नाही तर अशा वेळी  ती चूक केल्यामुळे आपल्या पत्नीला किती वाईट वाटेल याचा विचार करा  म्हणजे चूक केल्यानंतरचे चार तास उगाळा. आणि जर का चूक घडली (त्यातूनपण) तर पहिले चार आणि नंतरचे चार तास अशी डबल केंद्रं मनामध्ये तयार होतात. आणि त्यामुळे अंतर्मनात चूक केल्यामुळे टेन्शन निर्माण होते.




चांगली माणसे चूक घडू नये म्हणून प्रयत्न करत असतात पण त्यांचे अंतर्मन त्यांना दुर्बल करते.    
मी चूक केली हे कुणाला कळलं नसलं तरी माझ्या देवाला ते कळतं.
चूक करण्याआधीचे चार तास तो माझ्यावर रागवला होता.
मी चूक करत असताना तो संतापलेला आणि त्याला दुःखही होत होतं आणि चूक झाल्यानंतर त्याला माझ्याविषयी सहानुभूती देखील असते.


चूक करताना सद्गुरुचे नामस्मरण करा. माझं (प.पू.  बापूंचे) नाव घ्या.तुमची चूक करण्याची वृत्ती कमी होईल आणि चांगली वृत्ती दहा पट वाढेल. तोच माझा (बापूंचा) धंदा आहे. प्रेमाने मला जे मान्य आहे ते बोलतो. ‘‘तुम्ही सामान्य माणसे आहात, तीच चूक वारंवार करत असताना, घडत असतांना, ती ओझी वाहताना मला सोबत घ्या.’’
अंतर्मन त्या सद्गुरुच्या ताब्यात द्या.
चूक करताना जेव्हा आपण ‘साई , साई’ असे म्हणतो त्यावेळी आपल्या मनामध्ये ‘साई’ नावाचे केंद्र तयार होते आणि दारु पिण्याची इच्छा होत नाही.
पण सद्गुरुतत्त्वाचेच नाव घ्या त्याच्या दुसर्‍या रुपाचे नाव घेऊ नका. रुप जरी त्याचे असले तरी त्यांची कार्य वेगळी आहेत.
‘जिस जिस पथ पर भक्त साई का, वहॉं खडा हैं साई’
तुम्ही कुठेही जाता तिथ तिथे तुमचा सद्गुरु आधी उभा असतो. तुम्ही जेव्हा पाप करताना देवाचे नाव घ्याल तेव्हा सद्गुरुतत्त्वाचेच नाव घ्या. त्याच्या दुसर्‍या रुपाचे नाव घेऊ नका कारण त्या रुपाकडे तेवढ्या प्रमाणात क्षमा नसेल. अकारण कारुण्य जेवढे सत्गुरुंकडे असतं तेव्हढ दुसर्या कुणाकडेही नसतं.


आम्ही पाप केले तर आमच्या सद्गुरुला दुःख होतं आणि जर पाप करताना त्याचे नाव घेतले तर त्याला दुःख होत नाही. ‘माझ लेकरु सुधरतयं मलाही जरा प्रयत्न करु देत’ असे त्याला वाटते.
ज्यावेळी आपल्या मनाला पश्चात्ताप होतो त्यावेळी आपला वाईट कंडिशनिंगशी संबंध संपतो.
चांगल्या माणसावर वाईट कंडिशनिंग लवकर होते तर चांगले कंडिशनिंग उशीरा होते. वाईट माणसाला कंडिशनिंग होत नाही ते सर्व दिखावे असतात.


आपल्या अंतर्मनावर जर (अंतर्मनात) परमात्मा असेल (नाम) असेल तर आपले बाह्यमन कंट्रोल मध्ये रहाते.
आपण जेव्हा प्रार्थना-आमंत्रण करतो, त्यावेळीच तो परमशिव आपल्या मनामध्ये येतो ते ही आपले आमंत्रण आहे तेवढ्यापुरतेच आणि तोपर्यंतच राहतो. त्याला पूर्णपणे शरणागत जा, तो कायमचा तुमच्या मनात राहतो.


श्रीसाईसच्चरितामध्ये एका कथेत सांगितल्याप्रमाणे एक म्हातारी साईबाबांकडे गुरुमंत्र द्या म्हणून उपोषण करते. बाबा तिला म्हणतात,‘‘काय गं आई? माझ्या गुरुने माझे कान फुंकले नाहीत तर मी काय फुंकू? तु माझ्याकडे अनन्य भावाने बघ, मी तुझ्याकडे बघेन त्याच भावाने.’’


सद्गुरुकडे प्रेमाने बघा, तुम्ही ज्या भावाने बघाल, तो त्या भावाने तुम्हाला बघेल. जर वाईट दृष्टीने बघितलं तर तो डोळे बंद करुन घेतो. त्याला काही फरक पडत नाही.
बघण्याचे प्राबल्य त्यालाच आहे ज्याचे तुमच्यावर प्रेम आहे.


आदिमाता परमात्म्याला सृष्टीचक्र आणि संहारचक्र घेऊन अवतार घ्यायला लावते.
१) राम - १०८% सृष्टीचक्र घेऊन आला आणि आवश्यकतेपुरते संहारचक्र वापरले. म्हणजेच सृष्टीचक्र प्रधान आणि संहारचक्र गौण  (उपांग)
२) परशुराम - संहारचक्र (प्रथम कालखंड) आणि सृष्टीचक्र (नंतरचा कालखंड)
३) कृष्ण - संहारचक्र (प्रधान) आणि सृष्टीचक्र (उपांग)


पण तोच परमात्मा जेव्हा सद्गुरुच्या (साई) रुपात अवतरित होतो तेव्हा ती आदिमाता त्याला दोन्ही चक्रांच्या सहीत पाठवते म्हणजेच ..........
त्याच्या उजव्या हातात सृष्टीचक्र तर डाव्या हातात संहारचक्र
उजव्या पायात संहारचक्र तर डाव्या पायात सृष्टीचक्र.
म्हणजेच त्याला पाहिजे आणि हवे तसे ‘तो’ (सद्गुरु) काळानुसार घटनेनुसार त्याचा वापर करतो. त्याच्या प्रत्येक वागण्यात, चालण्यात, हातवार्‍यांमध्ये भाव असतो आणि त्याचे कारण वेगवेगळे असते. त्याच्याकडील सृष्टीचक्र हे त्याच्यावर प्रेम करण्यांसाठी चांगल्याची निर्मिती करते, तर संहारचक्र वाईट गोष्टींचा नाश करते.


म्हणूनच सद्गुरुच्या पादुका नेहमी पूज्य असतात. त्याचे पादुकापूजन आपण करतो. त्याला आमंत्रण देतो.
तो आपल्या डाव्या पायाने चांगल्याची निर्मिती करतो तर उजव्या पायाने वाईटाचा नाश करतो.
आदिमाता परमात्म्याला का पाठवते? (सद्गुरु रुपात)
कारण - परत परत तीच चूक करणे हा परमात्म्याचा गुणधर्म आहे म्हणूनच युगानुयुगे लोटली तरी वाईट माणूस सुधारेल म्हणून तो क्षमा करतो आणि त्याचे परिमार्जन ते सर्व दुरुस्त करण्यासाठी- ती आदिमाता सद्गुरुतत्त्वाची निर्मिती करते. 



तो क्षमा करत राहतो म्हणून आई सद्गुरुतत्त्वास दोन्ही चक्रे घेऊन पाठवते. जो सद्गरुतत्त्वाचा आश्रय घेतो. त्याच्या  आयुष्यात सद्गुरु नेहमी हात व पाय यांसहित कार्य सुरु करतो. हे करण्यासाठीच .......
बाबा सांगतात,‘‘तू माझ्याकडे बघ, मी तुझ्याकडे बघेन  .......................
परमात्मा चूक करतो पण भल्यासाठी.
आईच्या आज्ञेच्या बाहेर जाऊन तो क्षमा करतो म्हणून त्याला परत परत यावं लागतं.
‘‘परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम्’’
म्हणूनच आम्हाला घट्टपणे सद्गुरुतत्त्वाचे चरण, हात , नितांत श्रद्धा आणि प्रेमाने धरुन ठेवले पाहिजेत.
हरी ॐ

Excerpts from Thursday Discourse dated 16 June 2011


हरी ॐ 
विष्णूसहस्त्र नामामध्ये "ॐ मंत्राय नम:" ह्या नावाचा अभ्यास करताना आपण बीजमंत्र बघितले.पुढे प्रवास करत करत आपण श्री गुरुक्षेत्रम मंत्रावर स्थिर झालो . 
ह्यात सर्व बाधाप्रशमनं मध्ये आपण बाधा बघितल्या किती बाधा बघितल्या? कुणाला नाही आठवत. म्हणजे पुढचे पाठ मागचे सपाट.
आतापर्यंत एकुण ८ बाधा झाल्या आणि एकूण किती बघायच्या होत्या तर ११. तर ९, १०, ११ ह्या तीन बाधा बघायच्या आहेत. आज जी ९ वी बाधा बघायची आहे ती अतिशय महत्वाची आहे, जी मनुष्याच्या जीवनात ठायी ठायी जाणवते. 
 बर्‍याच वेळा मनुष्याच्या जीवनात करायला गेलो एक आणि झाले भलतेच असे घडत असते. आमच्या हाताच्या रेषाच उलट्याच. आमच्या मीठाला चवच नाही. प्रत्येकाने अशी वाक्ये किती वेळा ऐकली असतील. म्हणजे intention  एक आहे, कृती  चांगली आहे पण response वेगळाच होतो . 
आपण ठरवतो रात्री लवकर झोपायचे व सकाळी लवकर उठायचे, पण घडते का? नाही झोपायला नेमके तेव्हाच १२-१ वाजतात आणि मग उठायला दुपार होते. जर आपण ठरवले की आता ह्याच्यापुढे अजिबात चिडायचे नाही तेव्हा लगेच पुढच्या ५ व्या मिनीटाला चिडचिड सुरु होते. असं का होते? 
दरवर्षी पहिल्या दिवशी ठरवले जाते बापुंनी सांगितलेली एक उपासना रोज अमुक वेळा करायची. पहिल्या दिवशी उपासना नीट होते, दुसर्‍या दिवशी ठीक होते, तिसर्‍या दिवशी सकाळी अर्धी,संध्याकाळी अर्धी होते. मग फक्त संध्याकाळीच अर्धी होते, पुढे एक दिवसाआड व हळुहळु पूर्ण बंद होते. 
जेव्हा अपचनाचा त्रास झाल्यावर डॉक्टर कडॆ आपण जातो. अनेकदा डॉक्टर ने अन्न चावुन खाण्यास सांगितलेले असते पण आपण तसे वागतो का? बरीच माणसे तोंड सतत बंद ठेवतात त्यांच्या तोंडाला वास येतो ह्यामागे scientific reson आहे, ह्याला ४ गोष्टी कारणीभूत असतात. ब्रश  नीट न केल्याने फक्त १०% तर
१) मुख्य म्हणजे कोठा साफ नसला तर तोंडाला वास येतो . 
२) मनुष्याच्या लाळेत अनेक bacteria  असतात त्यामुळे जर सतत तोंड बंद असेल तर अतिशय घाणेरडा वास येतो. 
३) तोंड व गुदद्वार ह्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे, जेव्हा डॉक्टर गुद्द्वाराची तपासणी करतो तेव्हा तोंड उघडुन लांब लांब श्वास घेण्यास सांगतो. कारण त्यामुळे अन्ननलिका व गुदद्वार ह्यांची आकुंचन- प्रसरणाची क्रिया होत असते ज्यामुळे अन्न पुढे सरकायला मदत होते.
४) जेवणानंतर जर नीट चुळ भरली नाही, ब्रश केला नाही  तर जे अन्न दातात अडकलेले असते ते तसेच राहिल्याने कुजते आणि असंख्य bacterias तयार होतात त्यामुळे मग घाणेरडा वास येत राहतो . 

त्यामुळे गप्प गप्प राहण्यापेक्षा मिळूनमिसळून राहा, आनंदी राहा, गप्पा, विनोदात सहभागी व्हा.
इथे किती जण ३२ वेळा चावुन खातात? कोणी सांगितल्यावर १ दिवस खातील परत मग नेहमी सारखे घाईघाईत खाणे सुरु होते. जास्तीत जास्त आपण सात ते आठ वेळा घास चावतो. काही जण तर घास चावण्याच्या फंदातच पडत नाहीत गिळूनच टाकतात.
कधी वजन कमी करायचे ठरवले की नेमकी तेव्हाच जास्त भुक लागते. कोणाला वजन वाढवायचे असेल तर भूकच लागत नाही. असे का नेहमी घडत असते ? 
आपण ग्रंथराज मध्ये बघितले की प्रत्येक मनुष्याच्या देहात ४ केंद्र असतात आहार, मैथुन, निद्रा व भय. अशीच ४ केंद्रे प्रत्येकाच्या मेंदुतही असतात ती म्हणजे -
१) Reward center ( बक्षिस केंद्र ) 
2) Punishment center ( शिक्षा केंद्र )
3) Pleasure center ( सुखाचे केंद्र ) 
4) Displeasure center ( दु:खाचे केंद्र ) 
ह्या ४ केंद्रांच्या माध्यमातुनच मनुष्याचे  मन घडत असते.  मनुष्याच्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ही ह्या ४ केद्रांशी संबधित असते. आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक घटनेचा ही केंद्रे अभ्यास करतात व त्यानुसार त्यांची व्याप्ती ठरत असते. इथे हा अभ्यास कशाच्या आधारे केला जातो हे महत्त्वाचे आहे.
उदाहरणार्थ आई बाबांनी सांगितलेली गोष्ट ही मुलांना pleasure वाटते की, displeasure  ह्यावर त्याची व्याप्ती ठरते. जेव्हा मनुष्य अनुचित गोष्टीला displeasure  व उचित गोष्टीला pleasure  समजतो तेव्हा त्याचे मन समर्थ बनते. 
मुलांचे मन काय ठरवत असते? तर ते pleasure गोष्टीला displeasure समजते. आई वडिलांनी काय शिकवले हे नक्कीच महत्वाचे असते परंतु मनुष्य हा स्वत: काय निर्णय घेतो हे अतिशय महत्वाचे असते. जेव्हा मन शिस्तीला  displeasure समजते तेव्हा ते मनुष्याचे जीवन बेशिस्त, अनुशासनहिन बनवते. 
आपण शाळेते एक law  शिकतो, की जर एका बंदिस्त द्रव पदार्थाला pressure  दिले तर ते सर्व बाजुने समानपणे पसरते, कुठला law आहे हा? कुणाला नाही आठवत? ह्याला Pascal's law  म्हणतात. 
आपला मेंदु solid, liquid व gases  ह्याने बनलेला आहे. आपलं मन, भावविश्व हे fluid प्रमाणे आहे 
Pascal's law प्रमाणे जसा द्रव पदार्थ pressure दिल्यामुळे सर्वत्र पसरतो तसेच आपल्या मनावर जे जे संस्कार होत असतात ते सर्व मन भर पसरतात. आपण जर बेशिस्त वागत राहिलो तर आपल्या मनातही तिच अनुशासनहिनता पसरते. 
म्हणून जीवनात आनंदी राहाण्यासाठी, आनंद येण्यासाठी आनंदी वृत्ती  असणे आवश्यक असते. आनंदाचे डोही आनंद तरंग तर जे लोक नेहमी किरकिर करतात, नेहमी दु:खी असतात त्यांच्या जीवनात सुद्धा मग कायम दुख:च राहते.
कामावरुन नवरा घरी आल्यावर बायकोने, मुलांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्याची चिडचिड करायची सवय असते. त्यामुळे तो कधी बायकोचे कौतुक करु शकत नाही, किंवा मुलांना प्रेमाने विचारु शकत नाही. अश्या मनुष्याच्या जीवनात आनंदाचे तरंग कधी उठूच शकणार नाहीत, त्याच्या जीवनात नेहमी दु:खच राहणार. ही बाधाच अशी आहे, ह्याला अतिशय सुंदर नाव आपल्या प्राचीन आचार्यांनी दिले आहे, जे अतिशय समर्पक आहे ते म्हणजे स्वमन बाधा.
 स्वमन बाधा म्हणजेच स्वत:च्या मनाने स्वत:लाच केलीली बाधा. तुमच्या मनाला तुम्ही लावलेले वळण तुमच्या आड येत असते. आपल्याला हिंदी पिक्चरचे गाणे किती लवकर पाठ होते पण शाळेतील एखादी कविता पाठ व्हायची का? नाही. हे असे का घडते तर आपल्या मनाचे वळण तसे असते म्हणुन. तुम्ही म्हणाल आम्ही चांगले वागलो तरी लोक आमच्याशी वाईट वागतात हे कसे काय?
तर हे सुद्धा आपल्या मनामुळेच घडत असते. आपल्या प्रत्येकाच्या देहाभोवती एक aura (प्रभामंडल) असतो जो दिसत नाही. तुमच्याशी संबंधित व्यक्ती जे जे काही वागते ते ते सर्व modified  करायचे काम तुमचा aura  करत असते. 
समजा तुम्हांला एखाद्या व्यक्तीला मारायचे आहे व तुमचा aura  चांगला आहे तर तेव्हा काय घडते की, ती व्यक्ती आपोआप कुठेतरी पाय घसरुन आपटते किंवा पडते व तिला भरपुर मार लागतो.
एक उदाहरण इथे सांगतो, ७-८ वर्षापुर्वी माझ्याकडे एक जोडपे आले होते, दोघेही स्वभावाने चांगले पण बायको लग्नानंतर काही महिन्यांनी सतत गप्पगप्प रहायला लागली. तिला प्रचंड acidity चा त्रास होत होता.  मी (प.पु.बापू)  घरातले वातावरण कसे आहे हे विचारल्यावर कळले की, त्या घरात ३ नणंदा, सासु, आत्या मिळुन एकूण ८ बायका होत्या. त्या सगळ्या ह्या नवीन नवरीला सतत टोमणे मारु लागल्या. तिच्या मनाला ही गोष्ट लागत राहीली. मी (प.पु.बापू) तिला सांगितले आता त्या काहीही बोलल्या तर आनंद व्यक्त कर, त्यांना टाळी दे. तिने तसे वागायला सुरुवात केल्यावर १-१/२ महिन्यात एक नणंद वेडी झाली, दुसरी नणंद लग्न करुन पळुन गेली तर तिसरीने तिच्याशी जुळवुन घेतले. कारण हिने प्रत्येक गोष्टीत आनंद व्यक्त केल्यावर घरातल्या बाकीच्या बायकांना हिला त्रास दिल्याचा आनंद मिळणे बंद झाले. म्हणजे जीवनात आनंद आणणे ही गोष्ट पुर्णपणे त्या नवीन नवरीच्या मनावर अवलंबुन होती. 
कोणी कितीही त्रास दिला तरी मी त्रास करुन घ्यायचा की नाही हे माझ्या मनावर अवलंबुन असते. तुमचा aura  बळकट असेल तर तुमच्याशी माणसे कृतज्ञच वागतात.ते कृतघ्न वागु शकत नाहीत.तेच जर aura   कमकुवत असेल तर मग कितीही आपण चांगले वागलो तरी आपल्याला वाईट अनुभव येतात. 
असे का घडते? तर जर माझे प्रभामंडल weak असेल तर माझ्या मेंदुतील चार केंद्रेही weak होतात. जर ही चार केंद्रे बळकट करण्याचा प्रयत्न केला तर आपण ही स्वमन बाधा टाळु शकतो . 
जर तुमच्या मनाला पटले की आपण चुकीच्या मार्गाने pleasure  मिळवतो आहोत, की आपोआप तुमचे मन मग चांगल्या मार्गाने pleasure मिळवण्याचे काम करु लागते . 
जर मी (प.पु.बापू) म्हटलेले लाथ घालीन कंबरड्यात हे जर समोरच्या व्यक्तीला pleaure वाटले तर त्याचे pleasure centre वाढेल पण तीच जर समोरच्या व्यक्तीला शिक्षा वाटली तर त्याचे  punishment centre वाढेल . 
जो मनुष्य प्रत्येक सजा / अडचण ही सुधारण्याची संधी समजतो त्याचे pleasure centre  वाढत जाते. आणि  pleasure centre  वाढणे म्हणजे मनुष्याकडुन चुक न होणे. ज्याचे  pleasure व reward centre मोठे त्याच्यावर कोणी अन्याय करु शकत नाही, त्याच्या आयुष्यात  कधी दु;ख येऊ शकत नाही.
म्हणुन ही pleasure व reward ही दोन केंद्रे वाढवण्यासाठी प्रयत्न करा. ह्यासाठी लहान-सहान गोष्टीतही आनंद साजरा करण्याची सवय करा. 
कोणी विरोध केला तर आनंद माना, चार माणसे भेटली तर गप्पा मारा, जी माणसे कोणी भेटले तर नुसती गप्प राहतात त्यांचे  displeasure centre वाढते. म्हणून स्वत:च्या तसेच दुसर्‍याच्याही छोट्या छोट्या चांगल्या गोष्टीत आनंद मानायला शिका. 
काही दिवसापुर्वी एक पिक्चर घरी बघितला, घरातल्या सर्व स्त्री वर्गाने त्या पिक्चरला नावे ठेवली कारण त्या पिक्चरमध्ये कशाचा कशाला संबंध नव्हता की त्याला काहीही story  नव्हती. तरी मला तो पिक्चर अतिशय आवडला. पिक्चरमध्ये काहीही घडले तरी आपल्याला काही त्याचा फरक पडतो का? नाही. पिक्चर कितीही बेकार असला तरी तो परिवारासोबत एकत्र बघताना आनंद व्यक्त करता आला पाहिजे.
बरेच जण मी बघतो राणीच्या बागेत गेल्यावर किती घाण वास येतो म्हणतात, आता तिथे जनावरे आहेत म्हणजे वास येणारच. त्या खराब वासामुळे चि्डचिड करत तुम्ही तुमचा का आनंद घालवता?
जर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत आनंद मानला नाही तर pleasure centre  वाढणार कसे? 
बायकोला  नवर्‍याने आणलेल्या साडीपेक्षा जावेची साडी जास्त आवडते, अशी तुलना करत राहिल्यावर pleasure centre  कसे वाढू शकेल?
एक मध्यमवयीन जोडपे मला सांगत होते आमची आई पटकन गेली पण तीच जेव्हा त्यांचे म्हातारे वडील १ -१/२ महिना बिछान्याला खिळले  तेव्हा ह्याच जोडप्याला मनात विचार असायचा की अजुन किती दिवस राहणार? 
म्हणजे माणसाला नक्की काय हवे आहे?
अश्या वृत्ती मुळे आमची ही  pleasure व reward ही दोन केंद्रे वाढु शकत नाहीत. ह्यासाठी आमची सुखाची वृत्ती व शिस्त वाढवली पाहिजे. व चांगल्या गोष्टींना शिक्षा मानणे ही वृत्ती व दु:खाची वृत्ती कमी केली पाहिजे.
आणि ह्यासाठी लागणारी ताकद येते कुठुन तर गुरुमंत्रातुन. आपल्या सगळ्यांचा एकच गुरुमंत्र तो म्हणजे गुरुक्षेत्रम मंत्र. तुमच्या aura मध्ये हस्तक्षेप करण्याचा, तुमचे प्रभामंडल बदलण्याचा अधिकार फक्त गुरुक्षेत्रममंत्रालच आहे. 
आनंदी वृत्ती वाढवायची असेल तर सद्‌गुरुला शरण जा. गुरुची आज्ञा पाळायला शिका. गुरुने लाथ घातली शिवी घातली तर त्याचा ज्याला आनंद वाटतो, गुरुची शिवी हा अशिर्वादच आहे अशी ज्याची खात्री असते त्याचेच pleasure centre वाढते जाते. 
बापु ओरडले तर राग येणारच असे किती जणांना वाटते (सगळे नाही म्हणतात). अरे हो म्हणा काही जणांचे हो तर काही जणांचे नाही ऐकु आले, दोघांच्या भावना योग्यच आहेत, त्यामुळे हो आणि नाही म्हणणार्‍या सगळ्यांना  " I Love You " . बापु ओरडले म्हणुन दु:ख नको तर मी चुकलो म्हणुन बापु ओरडले ही जेव्हा जाणीव असेल तेव्हा  pleasure centre वाढत जाईल. 
आपल्या मेंदुतील ह्या चार केंद्रातील स्वमन बाधा दुर करण्याची क्षमता ह्या गुरुमंत्रामध्ये आहे . 
" एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरु ऐसा " 
" सर्वबाधा प्रशमनं श्री गुरुक्षेत्रम" स्वमन बाधा ही जन्मापासुन मृत्युपर्यंत जीवनाला व्यापुन उरणारी बाधा आहे. जे करायचे असते नेमके त्याच्या उलटेच होत असते. ही बाधा टळण्यासाठी नित्य स्वत: जागृत राहुन गुरुच्या चरणांशी शरणागत राहायला हवे. 
एक गोष्ट इथे आठवते स्वामींनी (स्वामी समर्थ) माझ्या (प.पु.बापू) खापर पणजोबांना एका शारीरिक व्याधीसाठी हत्तीची विष्ठा लावायला सांगितली त्यांनी पुर्ण विश्वास ठेवुन ती नियमित लावली व त्यामुळे अनेक औषधांनी सुद्धा बरे न झालेले दुखणे कायमचे बरे झाले. ह्यावरुन लक्षात येईल की गुरुच्या शब्दांची काय ताकद असते. जेव्हा गुरुवर संपुर्णपणे विश्वास असतो तेव्हाच गुरुची कृपा प्राप्त होत असते, गुरुवर जर विश्वास नसेल तर गुरुचे सामर्थ्य, त्यांची कृपा प्राप्त होऊ शकत नाही.  आज आपण स्वमन बाधा शिकलो.
गुरुचा शब्द, गुरुचे चरण, व गुरुने दिलेला मंत्र ह्या तीनही गोष्टी जर घट्ट आयुष्यात धरुन ठेवल्या तर प्राण जाण्याची कधी वेळ येणार नाही, मुख्य म्हणजे प्राण जाणारच नाही. कारण ह्या तिन्ही गोष्टींपुढे यमाचीही ताकत चालत नाही. मग स्वमन बाधा तर त्याच्यापुढे खुपच छोटी आहे. 
हरी ॐ

Excerpts from Thursday Discourse dated 07 April 2011

हरि ॐ

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (०७-०४-२०११)


"जयंती मंगला काली ,भद्रकाली कपालिनी 
   दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते " 

स्वाहा बघितली आता ११ वे नाव स्वधा बघायचे आहे. पहिल्याच दिवशी मी (प.पू.बापू)सांगितले कि ही नावे विशिष्ट क्रमाने येतात. अहंकार विरहित असे परमेश्वराला अर्पण करायचे रुप म्हणजे स्वाहा, त्यापुढे येते ती स्वधा. पितरांना अर्पण करताना स्वधा चा उच्चार होतो. मृत्यू नंतर उच्चारले जाते म्हणून हे नाव अपवित्र होते का? बिलकुल नाही. मुळ शास्त्राला बाजुला ठेवुन परंपरेनुसार चालत आलेल्या रुढींमुळे मृत्यू नंतरच्या विधिंना अपवित्र समजले जाते. 
मी(प.पू.बापू) ग्रंथराज मध्ये सांगितले आहे श्राध्द म्हणजे आई वडिलांची जिवंतपणी केलेली सेवा. त्यांच्या म्रुतुनंतर त्यांच्यासाठी केलेली प्रार्थना हे मृत्यू नंतरचे श्राध्द. 


श्राध्दाच्या वेळी पिंड ठेवले जातात. हे पिंड म्हणजे नक्की काय? हे आपल्याला माहिती पाहिजे. पुर्वीच्या वेळी मनुष्य संन्यास घ्यायचा त्यावेळच्या विधिच्या वेळी पिंड केले जातात.पिंड म्हणजे देहाचे प्रतिक. हे पिंड म्हणजे तीन भाताचे गोळे असतात.अन्नमय देहाचे प्रतिक म्हणुन हे ठेवले जातात. आधीच्या दोन जन्माच्या पाप - पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे दोन पिंड तर जे unknown आहे त्याचे प्रतिनिधित्व करणारे एक पिंड असते. 
संन्यास घेताना मनुष्य शपथ घेतो की, मी संन्याशाप्रमाणॆ जगेन. संन्यासाची भिक्षा घेताना आधीच्या जन्मांमधुन स्वत:ची मुक्तता करण्यासाठी हे विधी सांगितले आहेत. 
म्रुत्युनंतर विशिष्ट दिवस सुतक पाळावे असा कुठेही उल्लेख नाही.व्यापारी वर्गात ४ दिवसच सुतक पाळले जाते, त्यांना व्यवसाय जास्त दिवस बंद ठेवता येत नाही, तर ज्या लोकांकडे आराम आहे अश्यांमध्ये ४० दिवस पण सुतक पाळले जाते.पुर्वीच्या काळी सर्व नातेवाईक दुर राहयचे. लगेच कोणाच्या म्रुत्युनंतर येणे त्यांना जमायचे नाही त्यामुळे मग १० वे, १३ वे अश्या विधिंची सोय करण्यात आली. कुठल्याही शास्त्रात अमुक दिवशीच असे करावे असा उल्लेख नाही. 
अनेकांचा समज असतो कि, म्रुत्युनंतर आत्मा घराभोवती फिरतो .म्हणुन सगळे जोर-जोरात रडतात. का? तर फिरणार्या आत्म्याला वाटले पाहिजे की त्याच्या म्रुत्युमुळे सर्वांना खुप दु:ख झाले आहे.मग तो तिथे न थांबता निघुन जातो. त्याचप्रमाणे १० व्या दिवशी तो आत्मा वास येईल इतक्या अंतरावर घराच्या वरुन फिरत असतो असं समज असतो. मग तो कावळ्याच्या शरीरात शिरतो आणि त्याला आवडणारी गोष्ट खावुन जातो. अश्या प्रकारचे गैर समज अजुनही आहेत. 
आपण विधि का करतो त्या मागचे शास्त्र कोणी ही नीट जाणून घेत नाहीत. ह्याचेच एक उ.दा. म्हणजे एक मुलगा आपल्या आजोबांचे श्राध्द करत होता. त्या वेळी त्याचे वडिल जिवंत होते.तरिही दोन पिढ्यांच्या पिंडाचे पुजन करायचे अश्या समजुतीमुळे त्या मुलाच्या वडिलांचे ते जिवंत असतानाही त्यांच्या नावाचा पिंड ठेवुन पुजन केले गेले. ही घडलेली घटना आहे. 
शास्त्रामागील अर्थ समजुन न घेतल्याने आपण असे आचरटासारखे वागत असतो.मग मनुष्य जिवंत असतानाही त्याचे पिंड ठेवुन पुजन केले जाते. ज्योतिष शास्त्र वाईट नाही पण त्याच्या आहारी जावु नका. अजुनही कोणी घरात वारले की कुठले नक्षत्र लागले ह्यासाठी पंचांग बघितले जाते. पंचंक लागले की मग घरातील पाच जण मरणार म्हणुन ते टाळण्यासाठी विधी सांगितले जातात. आपण ते अज्ञानामुळॆ घाबरुन करत असतो. 


मी(प.पू.बापू)  श्राध्दाबद्दल ग्रंथातही सांगितले आहे, की जिवंतपणी आई-वडीलांची काळजी घेतली नाही, त्यांना कसेही वागवले आणि त्यांच्या म्रुत्युनंतर महाजेवण वाटले तर त्याला काही अर्थ नसतो. तुमच्या गावात ज्या काही प्रथा असतील त्याप्रमाणे जरुर श्राध्द करा पण हे श्राध्द का करायचे असते ते नीट समजुन घ्या. 
घरातील व्यक्तीच्या म्रुत्युनंतर घरात निर्माण होणार्या negative स्पंदनातुन बाहेर येण्यासाठी आपण श्राध्द करत असतो .  म्रुत्युनंतर आत्मा कुठेही फिरत नसतो. प्रत्येक मनुष्याचा लिंगदेह म्रुत्युनंतर त्रिमितितुन चतुर्मितीत जातो. आपण श्राध्द विधी घरात श्रध्देने करायचे असतात ते घरात पवित्र वातावरण निर्माण करण्यासाठी. अश्या दु:खाच्या प्रसंगी आप्तांना बोलवल्यामुळे मन आपोआप दुसर्या गोष्टीत रमते. 
हल्ली नातलगच नको असतात किंवा कमी असतात .त्यामुळे माणसाच्या म्रुत्युनंतर एक स्मशानातला माणूस ambulance मधली २-३ माणसे,अशी मोजकीच लोक असतात. पुर्वीच्या काळात अगदी आजुबाजुच्या घरात जरी कोणी वारले तरी २-४ नातेवाईक कायम घरी राहायचे.हल्ली प्रत्येकजण privacy maintain  करायला बघतो, अचानक कोणी पाहुणे घरी आले तर त्यांना manner less समजले जाते. पुर्वीच्या काळी घरात अचानक कोणी नातलग आले तर त्यांचे आनंदाने स्वागत केले जायचे. हल्ली लोकांना कोणी घरी आलेले नको असते. ही सगळी सध्याची परिस्थिती शास्त्राच्या विरोधात आहे. 
शास्त्र आपल्याला काय शिकवते? तर सांघिकी व्रुत्ती. "धा" हा शब्द म्हणजे धारण करणे. संन्यस्त वृत्तीची दीक्षा  घेताना प्रार्थना केली जाते की, आजपासुन मी स्वत:ला फक्त परमेश्वराशी जोडले आहे. मी संन्यस्त वृत्तीला स्वत: भोवती धारण करत आहे . 


स्वधा म्हणजे स्वत:च स्वत:चा आधार असणारी, स्वत:च स्वत:ला धारण करणारी. संन्यस्त व्रुत्ती म्हणजेच स्वधा व्रुत्ती. ज्यामध्ये फक्त परमेश्वर हवा आहे हे एकच मागणे असते बाकी कश्याचीही आवश्यकता नसते.  हे जे ११ वे नाव आहे ती स्वत:च स्वत:ला धारण करणारी आहे. 


हे एक circle  आहे ज्यात स्वधा शुन्य अंशावर आहे तर जयंती ३६० अंशावर आहे. म्हणजेच जोपर्यंत मनुष्य स्वकर्तुत्वाने पाऊल टाकत नाही तोपर्यंत तो विजयी होऊ शकत नाही. self dependent  बनायचे असेल तर आधी स्वाहाकार अंगीकारणे आवश्यक आहे. स्वाहाकार म्हणजेच स्वत:ला भगवंताच्या चरणी अर्पण करणे, रोजच्या कामाव्यतिरीक्त असलेला प्रत्येक क्षण भगवंताच्या नामस्मरणात घालवणे. असे जेव्हा घडेल तेव्हा स्वत:च स्वत:ला धारण करण्याची शक्ती प्राप्त होते. आधी स्वधाकार आणि मग स्वाहाकार(आधी स्वकर्तुत्व आणि मग अर्पण करणे) असा उलटा क्रम होऊ शकत नाही.  म्रुत्युनंतर परत जन्म घ्यायचाच असतो पण तो हाच जन्म नसतो (म्हणजे म्रुत्युनंतर परत त्याच जन्मात २० वर्षा़चे होऊन येता येत नाही) त्याच प्रमाणे स्वधाकार हा स्वाहाकारच्या आधी प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी प्रथम त्याच्या चरणी स्वत:ला अर्पण करता आले पाहिजे. 


ह्यासाठी आपल्याकडे तेव्हढी ताकद असते का ? समजा १ हजार किलो सोन्यावर तुमच्या नावाचा stamp  आहे, पण ते सोने आहे थरच्या वाळवंटात जिथुन तुम्हांला ते सोने आणण्यासाठी कुठेलेही साधन उपलब्ध नाही. मग तुमची capacity  आहे का ते सोने आणण्याची? म्हणजेच एव्हढे सोने आहे पण ते नेता येत नाही.असेच देवाच्या भांडाराचे असते. देवाने त्याच्या भांडाराला कधिच कुलुप लावलेले नसते. पाप्यांसाठी व पुण्यांसाठी हे भांडार समानपणे कायम खुले असते. फक्त हा परमात्मा श्रद्धावानांसाठी नेहमी partiality  करत असतो.तो तुमच्या मालकीचा असलेला खजिना उचलुन नेण्यासाठी वेगवेगळ्या वाटा सुचवतो. 
तो तुमच्यासाठी (श्रद्धावानांसाठी) extra चे काम करतो. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये जास्त मेहनत हिरो पेक्शा त्याच्यासाठी काम करण्यार्या extra ची असते, तसे extra चे काम तो परमात्मा करत असतो . आपण मात्र ते स्वत: केले असे समजुन स्वत:ला extra ordinaory  समजत असतो. 
परमात्मा गुपचुप तुमच्या ओझ्याला काठी लावत असतो.असे असतानाही आयुष्यात जेव्हा वाईट घटना घडतात ,अपघात होतात तेव्हा समजायचे जर नामस्मरण नसते केले तर अधिक वाईट घडले असते.  परमात्मा श्रद्धावानांना नेहमी दुप्पटीने देत असतो. जर तुम्ही १ ग्रम बळ दिले तर तो २ ग्रम बळ देतो. "तुम्हरे प्रेम राम के दुना"
म्हणुन आधी स्वाहाकार अंगिकारायला हवा. त्यामुळे पुण्य करण्याची ताकद वाढते व वाईट गोष्टींची ताकद कमी होते. रोजच्या जीवनातील उ.दा. म्हणजे चांगला ग्रुहस्थाश्रम करण्याची ताकद वाढते व व्यभिचार करण्याची ताकद कमी होते. पण आपल्याला हे नको असते. मनुष्य आधीच limited पुण्य घेवुन जन्माला आलेला असतो अश्यावेळी जर आधी स्वाहाकार नसेल तर ते पुण्य लगेच संपुन जाणार. 
स्वाहाकार हा अनेक मंत्रांमधुन उच्चारला जातो तसा स्वधाकार उच्चारला जात नाही. मग हा स्वधाकार करतात कसा ? ह्यासाठी सर्वांत श्रेष्ठ मंत्र पंचमुखहनुमान कवचामध्ये आहे तो म्हणजे ,
"ॐ हरिमर्कट मर्कट मंत्रमिदं ,परिलिख्यती लिख्यती वामतले , 
    यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं ,यदि मुन्चति मुन्चति वामलता "
वाम म्हणजे डावा. हनुमंताच्या चित्राच्या खाली डाव्या बाजुला रोज हा मंत्र ११ वेळा लिहायचा. 
ह्या मंत्रात सांगितलेली वामलता ही ३ गोष्टींनी बनलेली असते -
१) प्रत्येक मनुष्याचे दोन जन्माचे पाप
२) कलिचा प्रभाव 
३) शनिचा प्रभाव 
ह्या तिघांनाही वामलताच म्हणतात. ह्या वामलतेचे (लता म्हणजे वेल) बंधन मनुष्याच्या जन्मासोबत वाढत जाते व त्याला हालचाल करण्यापासुन रोखते.त्याला चांगल्या गोष्टींपासुन दुर नेते. 
म्हणुन ह्या वरील तीन गोष्टींपासुन बाहेर पडण्यासाठी हे बंधन तोडले पाहिजे, ह्यासाठी आवश्यकता असते ताकदीची. ही वामलता कापल्यावरच सर्व सुख उत्पन्न होते. आणि ही वामलता कापता येते ती "ॐ हरिमर्कट मर्कट.." ह्या मंत्रामुळे.
तुम्ही ज्यांना सद्गुरु मानता त्यांनी दिलेला कुठलाही मंत्र हा नेहमी स्वाहा, वषट,फट,हुं, ह्यांनीच बनलेला असतो मग तरीही  "ॐ हरिमर्कट मर्कट.." ह्या मंत्राची आवश्यकता का असते ?
नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही संकंटांनी ग्रासलेले असता तेव्हा ३ गोष्टींचा आश्रय घ्यायचा. 
१) पवित्र क्षेत्राचा म्हणजे गुरुक्षेत्रमचा आश्रय.
२) गुरु शब्दाचा आश्रय 
३) गुरु मंत्राचा आश्रय 
ह्या तीन गोष्टी असताना घाबरायचे काही कारणच नाही. मग "ॐ हरिमर्कट मर्कट.." ह्या मंत्राचा उपयोग काय? असा प्रश्न पडेल.
ह्या वरदा चंण्डिका प्रसन्नोत्सवापासुन "ॐ हरिमर्कट मर्कट.." ह्या मंत्राची वही उपलब्ध होणार आहे. ह्यात प्रत्येक पानावर उजव्या बाजुला हनुमंताचे एक विशिष्ट चित्र असणार आहे व डाव्या बाजुला ११ वेळा "ॐ हरिमर्कट मर्कट.." हा जप लिहायचा मग डोळे बंद करुन ११ वेळा म्हणायचा.  
प्रसन्नोत्सवापासुन रामनामाच्या वहीसोबत अजुन काही वह्या मिळणार आहेत त्यात ही हनुमंताचे विशिष्ट चित्र वही देखील सगळ्यांना उपलब्ध होणार आहे. 
"ॐ हरिमर्कट मर्कट.." ही वामलतेचा नाश करणार्या मंत्राची वही मी(प.पू.बापू) स्वत: तयार केली आहे. ही वहीच तुम्हांला तुमच्या आयुष्यात स्वधाकार आणण्यासाठी उपयोगी ठरेल.
"प्रत्येकाने मी कितीही चुकलो, कितीही पापी असलो तरी आमचा बापु कायम आमच्यासोबत आहे ही खात्री कायम बाळगा ." परमात्म्याच्या दोन शक्ती असतात.
१) अंजना शक्ती - स्वधा शक्ती (परमात्मा प्रगट रुपात असतो) म्हणजेच प्रयास. 
२) व्यंजना शक्ती - स्वाहा शक्ती (परमात्मा भाव रुपात असतो).
ह्यातील स्वाहा शक्ती म्हणजे अनसुया माता तर स्वधा शक्ती म्हणजे अंजनी माता.(हनुमंताची माता)
आतापर्यंत एकच वही होती आता १ + १० म्हणजे ११ वह्या सगळ्यांना प्राप्त होणार आहेत. ही अंजना वही पण रामनाम बँकेतच. हनुमंत हा ११ व्या दिशेचा स्वामी आहे. मनुष्याला जन्मापासुन बांधुन ठेवणारी वामलता तोडण्यासाठी ही अंजना वही आहे. 
"ॐ हरिमर्कट मर्कट.." हा मंत्र असलेली वही श्री वरदा चंण्डिका प्रसन्नोत्सवामध्ये तुम्हा सर्वांसाठी सिद्ध होणार आहे. ह्या वहीची परीक्षा घ्यायला जावु नका, काही उपयोग होणार नाही. 


जयंती पासुन प्रवास सुरु झाला होता आणि आता स्वधापर्यंत येवुन परत जोराने प्रवास सुरु झाला आहे. इथे प्रत्येक नामानुसार ताकद वाढत जाते. कुठलेही प्रयास करताना भक्तीने सुरुवात केली तर आपोआप थकवा कमी होईल व स्वत:च स्वत:ला धारण करणारी स्वधा शक्ती तुमच्याकडे येईल. 
हरी ॐ 
----------------------------------------------------------------------- 
* प्रवचनानंतर बापूंनी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ---
१) श्री वरदा चंण्डिका प्रसन्नोत्सवातील महापुजनात म्हणण्यात येणारे सर्व मंत्र हे माझ्या (प.पू.बापू) आवाजात रेकोर्ड केले जात आहेत व त्यानुसारच सर्व पुजन केले जाईल. 
अतिशय प्रेमाने माझ्या(प.पू.बापू) लेकरांसाठी माझ्या आईकडे साकडे घालतोय .त्यामुळे पुजन करताना प्रत्येकाने मनात हाच भाव ठेवा. ज्यांना रक्तदंतिकेचे पुजन करता येणे शक्य नाही त्यांनी आपले नाव, पत्ता लिहुन द्यायचे, त्यांच्या पुजनाचे पैसे माझ्याकडुन (प.पू.बापू) भरले जातील.तुम्हांला नंतर जसे शक्य होईल तसे प्रामाणिकपणे पैसे आणुन द्या.पैसे नाहीत म्हणुन पुजन नाही असे कोणाबाबतीत होता कामा नये.त्यामुळे निश्चिंतपणे प्रत्येकाने रक्तदंतिकेच्या पुजनाला बसा. ह्यात आईची स्तुती, स्तवन रुपाने मी(प.पू.बापू) स्वत: माझ्या आईला साकडे घालणार आहे. 


२) ह्या राम नवमी पासुन रेणुकामातेचे सहस्त्राधारा पुजन होणार आहे. २००१ पर्यंत आपण हे पुजन करायचो पण नंतर मी(प.पू.बापू) हे थांबवले होते. रेणूकामातेचे मुख असलेली शिळा ज्या घरात नेहमी पुजली जाते त्या घरातुन इथे रामनवमीच्या दिवशी येणार आहे.विश्वात प्रगटलेले मातेचे प्रथम रुप म्हणजे रेणूकामाता. ह्या रामवरदायिनीचे दर्शन आपल्याला ह्यापुढे नेहमी रामनवमीच्या दिवशी मिळणार आहे. 

Excerpts from Thursday Discourse dated 24 March 2011


हरि ॐ
सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन ( २४-०३-२०११)

"जयन्ति मंगला काली, भद्रकाली कपालिनी, 
दुर्गा क्षमा शिवा धात्री ,स्वाहा स्वधा नमोस्तुते"

धात्री ह्या शब्दावर आपण आज बोलणार आहोत ..ह्या नामावर बोलायचे झाले तर अविरत बोलता येईल. धात्री ह्या शब्दाचा सरळ अर्थ धारण करणारी, आधार देणारी, भरण - पोषण करणारी. 

पृथ्वी जिच्यावर मानव उत्पन्न झाला तीही धारण करते, आधार देते, भरण - पोषण करते. म्हणुन धरित्री हे मातेचे अतिशय जवळचे स्वरुप म्हणुनच पृथ्वीला भूमाता म्हणतात. पृथ्वी जशी सर्वांचेच भरण-पोषण करते, सर्वांनाच आधार देते तशी आदि माता पण धारण करणारी असली तरी सर्वांनाच आधार देत नाही.

म्हणुनच कुठे ती धात्री म्हणुन active  असते तर कुठे ती तटस्थ असते, कुठे आधार देते हे आम्हांला माहिती पाहिजे. ही आदिमाता कशी आहे तर "शिवा धात्री". शिवा म्हणजेच अत्यंत पवित्र. म्हणजेच ही धारण, भरण - पोषण, आधार फक्त पवित्रतेलाच देते. पृथ्वीचे तसे नाही, ती सर्वांनाच आधार देते.

पण जी शिवा धात्री आहे, दुर्गती हारीणी म्हणुन जी आहे ती फक्त पवित्र तत्वांनाच आधार देते. पण त्याचबरोबर ज्याला आपण चुकतो हे मान्य आहे व ज्याला पवित्र बनायचे आहे, अश्यांना पण ती आधार देते. समजा दोन बिंदु आहेत एक 'अ' जो maximum अपवित्र आहे व दुसरा 'ब' जो पवित्र आहे. अश्यावेळी जर 'अ' चे तोंड 'ब' बिन्दुकडे जरी असले म्हणजेच पवित्रतेकडे असले तरी ही आदीमाता त्यांना क्षमा करते. पवित्र बनवते आणि आधार देते. हीच जर सर्वांचीच धात्री असती तर असुरांना ही आधार देणारी असती पण ही असुरांचा महिषासुरमर्दिनी बनुन नाशच करते .

जेव्हा मनुष्याची चांगले बनण्याची इच्छा असते तेव्हा कितीही वेळा जरी तो fail  झाला तरी ती आदिमाता त्याचे भरण पोषण करत राहते. पण ती मानवाच्या वाईट भावनांचे भरण-पोषण करीत नाही, तर वाईट इच्छांना चांगले करण्याचा प्रयत्न करते. म्हणुन वाईट माणसांना देवीची पुजाच नको असते. एखादा दारुडा मनुष्य दारु न पिता देवीसमोर बसला तर तिच्या पवित्रतेमुळे त्याची दारु सुटणारच. त्यामुळे वाईट मनुष्य देवीसमोर येतच नाही.

जिथे पुर्ण पवित्रता आहे तिथे अपवित्र गोष्ट येवुच शकत नाही. गुरूक्षेत्रम मध्ये दत्तगुरु, आदिमाता चंडिका आणि त्रिविक्रम अचलपणे उभे आहेत त्यामुळे तिथे कुठलीही वाईट गोष्ट राहुच शकत नाही.
वाईट मनुष्य तिथे restless  होणारच. त्याला ती महिषासुरमर्दिनीची मुर्ती भयंकरच वाटणार.गुरूक्षेत्रम मध्ये समोर ती उभी आहे तर बाजुला त्रिविक्रम उभा आहे.हा त्रिविक्रम बनला आहे वज्रापासुन.सर्व शस्रे एकत्र येउन बनते ते वज्र. म्हणुन गुरूक्षेत्रम ठिकाणी वाईट व्यक्ती comfortably बसुच शकत नाही.

आदीमातेचा पवित्रतेला धारण करणे हा गुण श्रद्धावानांपर्यंत पोचावा म्हणुव तिने त्रिविक्रमाला जन्म दिला.
त्रिविक्रम म्हणजे सद्गुरुतत्वाचे संपुर्ण प्रतिक. एखादा श्रद्धावान जर दत्तात्रेयांचा भक्त असेल तर त्याच्यासाठी तो त्रिविक्रम दत्तात्रेयांचेच रुप असतो. एखादा भक्त जर साईनाथांना मानत असेल तर त्याच्यासाठी तो त्रिविक्रम साईनाथच असतो.

सदुरुतत्वाचे कार्यकारी स्वरुप म्हणजे त्रिविक्रम. तुम्ही ज्यांना मनापासुन मानता त्यांचे तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार पेलेल असे स्वरुप म्हणजे त्रिविक्रम. समजा एखा्द्या भक्ताची capacity ९०% ची आहे तर तो त्रिविक्रम त्या भक्ताजवळ ९०% च्या capacity नेच उभा राहतो , व नंतर ती ९१,९२ अशी वाढवत नेतो. समजा एखा्द्याची capacity शुन्य आहे, ०.००००१ % पण नाही ,काही क्षमताच नाही पण काहीतरी भाव आहे तर त्याच्यासाठी तो त्रिविक्रम क्षमतेचेच बीज बनुन येतो .

म्हणुन त्रिविक्रमाचे पुजन आमच्यासाठी सर्वांत सोपे असते. कारण त्रिविक्रम आमच्यावर कुठल्याही क्षमतेचा ताण पडू देत नाही. आणि अशी रचना केली आहे ती आदीमातेनेच ..तिच्या सर्व शस्त्रांनी बनलेला हा त्रिविक्रम मानवाच्या सर्व Spectrum वर (वेगवेगळ्या श्रेणी स्तरांवर..अगदी अल्प ते सगळ्यात उत्तम) त्या त्या आवश्यकतेनुसार कार्य करतो. एखाद्या साडीच्या दुकानात गेल्यावर दुकानदार सांगतो कि, २०० रुपये ते २ लाख रुपयापर्यंत साड्या आहेत हा जो श्रेणी स्तर असतो तो म्हणजे Spectrum. त्रिविक्रम अश्या सर्व स्तरांवर कार्य करतो.

सद्गुरु तत्व (सर्व दैवते,सर्व सद्गुरु स्वरुपे) ते दत्तात्रेया पर्यंत जे जे स्वरुप ते ते म्हणजे त्रिविक्रम. असे हे सोपे स्वरुप माझ्या (प.पू.बापू) आईने बनवले आहे.तिची १८ शस्त्रे एकत्र करुन ,पवित्रतेचे स्वरुप एकत्र करुन श्रद्धावानांसाठी हा त्रिविक्रम तिने उत्पन्न केला आहे.

आपण मात्रुवात्सल्यविंदानममध्ये वाचतो, जेव्हा विश्वाची उत्पत्तीच झाली नव्हती, काहीच अस्तित्वात नव्हते त्यावेळी ब्रम्हदेवाच्या पहिल्या प्रज्ञापराधा मधुन मधु-कैटभ हे दोन असुर निर्माण झाले.ते पाहुन ब्रम्हदेवाने मदतीसाठी महाविष्णूकडे धाव घेतली .महाविष्णूने त्यास आदीमातेचे स्तवन करण्यास सांगितले .तेव्हा अशुभ नाशनाच्या कार्यासाठी आदीमातेने  प्रथम अवतार धारण केला .मग आदीमातेच्या आज्ञेने  महाविष्णूने  मधु- कैटभांचा वध केला .अश्या प्रकारे त्या परमात्म्याकडून ही आदीमाता कार्य करुन घेते.

जेव्हा पृथ्वी उत्पन्नही नव्हती झाली तेव्हा असुरांशी लढणारे होते ते हे माय-लेकच. मधु-कैटभांशी लढण्यासाठी स्वत:च्या हातातील चक्र आदीमाता महाविष्णूला देते.सर्व असुरांशी लढताना जी काही शस्त्र-अस्त्र आहेत ते म्हणजे त्रिविक्रम.

जो ज्या प्रमाणात तपश्चर्या करेल त्या प्रमाणात फळ देणे हे त्या परमात्म्याचे काम. रावणाने परमात्म्याची उपासना केली व अजिंक्यत्वाचा वर मिळाल्यावर तो परमात्म्यावरच उलटला हे पाहुन त्या आदीमातेचे हृदय कळ्वळले.तेव्हा तिने त्रिविक्रमाचे स्वरुप उत्पन्न केले.

जेव्हा वाईट माणसे उपासना करतात तेव्हा हा त्रिविक्रममध्ये आला की, होते काय तर ...परमात्म्याचा असुरांसाठीचावर modify  होतो. म्हणजेच त्याचा वर सफळ संपुर्ण होत नाही.

रावणाने ब्रम्हदेवाकडे वर मगितला की, कोणापासुनही मृत्यु नको, मानवाला तो क्षुल्लक समजत होता त्यामुळे मानवापासुन मृत्यु नको असा वर मगितला नाही. म्हणुनच तो परमात्मा मग संपूर्ण मानव बनून आला व रावणाचा वध केला. ही जी योजना असते ना...असुरांच्या वरामध्ये अशी एक गोष्ट ठेवुन द्यायची की जी असुरांचा नाश होण्यास सहाय्यभुत ठरेल, ही योजना म्हणजे धात्री स्वरुप.

आपण रुद्र वाचतो. रुद्र म्हणजे कोण? हे आपल्याला माहिती पाहिजे. रुद्र म्हणजे एक अतिशय घोर असुर ज्याचा वध वैदिक इंद्र रुपाने केला. ह्या रुद्राभोवती त्याची आई सतत कवच म्हणुन फिरत असे त्यामुळे त्याचा वध करणे इंद्राला शक्य होत नव्हते. तेव्हा इंद्राभोवती आदितीने कवच निर्माण करुन त्याच्या आईला निष्प्रभ केले आणि मग इंद्राने त्याचा वध केला.

श्रद्धावानांसाठी त्रिविक्रमाची रचना तेव्हा आदितीकडून झाली. आदिती म्हणजे अस्पंद रुप, निश्चल रुप.
रुद्राला मारण्यासाठी तिने इंद्राला जे कवच म्हणून धारण केले ते स्वरुप म्हणजे धात्री.

रुद्र म्हणजे मोठा अंध:कार ,सगळ्यात मोठा अडथळा. त्याची आई म्हणजे रुद्री. ह्यांच्याविरुध्द लढताना इंद्राला असहाय्य होताना बघितले ,तेव्हा इंद्राला कवच आवश्यक होते. म्हणुन त्या काळात अस्पंद रुपाने असणारी आदिती इंद्रासाठी धात्री बनुन आधार देणारी, इंद्राचे प्रभामंडल(aura) बनुन कवच रुपाने धावुन आली व रुद्रासुराचा नाश केला. म्हणुन धात्रीचे मुर्ती स्वरुप कुठे दिसत नाही.

अश्या ह्या कवच रुपिणी धात्रीचा पुत्र त्रिविक्रम.म्हणजेच धात्री हे त्या परमात्याचे कवच आहे.
ह्याच धात्री रुपाने प्रत्येक श्रद्धावानासाठी तयार केलेले कवच म्हणजे त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह. हे चिन्ह जेव्हा आपण धारण करतो तेव्हा ते आपल्या सर्वांगाचे कवच बनते.

रुद्रासुर व इंद्र ह्यांचा न संपणारा संग्राम धात्रीने एक क्षणात  कवच रुप धारण केल्याने संपला. म्हणुनच ह्या कवच रुपिणी धात्रीने उत्पन्न केलेला त्रिविक्रम हा सर्व श्रध्दावानांचे कवच आहे. असा हा त्रिविक्रम गुरूक्षेत्रम मध्ये उभा आहे.

तुम्ही कितीही चुकलात तरी कुठल्याही मानाची अपेक्षा न ठेवता मनात चांगला भाव ठेवा , मग ही धात्री तुमचे कवच बनणारच. देवाचे नाव घेताना कुठल्याही अपेक्षेशिवाय मदत करण्याचे प्रयास करा मग त्रिविक्रम व धात्री तुमच्यासाठी कवच रुपाने धावुन येणारच .

धात्रीचाच दुसरा अर्थ होतो त्वरेने धावुन येणारी.म्हणूनच हीचे दुसरे नाव आहे शुभ त्वरा, तारिणी त्वरा.तारण्यासाठी जी धावत येते ती तारिणी त्वरा. तारण्यासाठी जी त्वरेने म्हणजे fastest  speed ने धावुन येते ती धात्री. मुळ रुपात अस्पंद रुपातुन मधली गायत्री, महिषासुरमर्दिनी अशी कुठलीही स्वरुपे न जुमानता ती direct कवच बनुन आली. म्हणजे नक्की काय ? तर समजा एखादे बीज घरातल्या भांड्यामध्ये आहे त्यात वृक्षाच्या सगळ्या capacities  आहेत. पण जेव्हा ते बीज मातीत लावले जाते तेव्हाच त्याला अंकुर फुटतो मग रोप वाढते त्याला कळी येते, त्यातुन मग फुल व फळ प्राप्त होते. ही normal stage झाली.

तर अस्पंदापासुन direct  कवच म्हणजे बीजापासुन मधल्या सगळ्या अवस्था न जुमानता direct फळ ही अवस्था . अशी ही धात्री म्हणुन तिचा पुत्र त्रिविक्रम हा धाता. कधीही गुरूक्षेत्रम मध्ये आलात की लक्षात ठेवा  तिथे ही अनसुया, महिषासुरमर्दिनी धात्री रुपाने व तिचा पुत्र त्रिविक्रम धाता रुपाने उभे आहेत.
जर कोणी व्यक्ती अपवित्र माणसाकडे जात असेल आणि त्या व्यक्तीने तिथे त्रिविक्रमाला नमस्कार केला की आपोआप त्रिविक्रम त्याला वाईट गोष्टींपासुन लांब करतो, त्या वाईट माणसापासुन लांब ठेवतो.
हे धात्री स्वरुप मानवासाठी सगळ्यात जवळचे आहे  कारण धात्री हे अनसुयेच्या सासरचे नाव. अत्रिची पत्नी म्हणुन तिचे नाव धात्री. तिचाच पुत्र जेष्ठ धाता दत्तात्रेय व कनिष्ठ धाता महाविष्णू.
कलियुगाच्या आरंभाला अत्रि व अनसुया स्थुल स्तरावरील अवतार समाप्त करुन आपल्या मुळ स्थानी परत निघून जातात . गुरूक्षेत्रम मध्ये त्रिविक्रम प्रगटवताना ही धात्री अनसुया रुपाने परत आली आहे. गुरूक्षेत्रम मधले अनसुया स्वरुप हे तेच धात्री स्वरुप आहे.तिच्या फोटोत आपण बघतो ती तिच्या बाळांना कशी सांभाळते ते.

आज फोटो एव्हढ्या जवळुन बघायला मिळतो आहे काही काळाने लांबुनच दर्शन घ्यावे लागेल एव्हढी गर्दी होईल. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेमाने जेव्हढे दर्शन घेता येईल तेव्हढे घ्या. अनसुयेच्या फोटो मध्ये जी गाय आहे तिच त्या दत्तगुरुंच्या फोटोत आहे. ही गाय धात्री स्वरुपच आहे. मानवाचे जन्मापासुन भरण-पोषण गायीच्या दुधानेच होत असते.

असे हे गुरूक्षेत्रम कोणासाठी आहे? ही महिषासुरमर्दिनी, अनसुया, त्रिविक्रम हा सगळा spectrum  कोणासाठी आहे? तर माझ्यासाठी. नेहमी प्रत्येक गोष्टीत माझे..माझे करता ना ते माझेपण इथे येवु देत. गुरूक्षेत्रम हे माझ्यासाठी आहे ...माझे म्हणायचे ते फक्त इथेच. हे माझेपण एकदा तुमच्याकडे आले ना की, ही अष्टादश भुजा धात्री तुमचे भरण-पोषण सर्वांर्थाने करणारच. 
 हरी ॐ
------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रवचनानंतर प. पू. बापूंनी एक अतिशय महत्त्वाची सुचना केली. 

सुचना : १ जुन पासुन प्रत्येक श्रद्धावानाला गुरूक्षेत्रम मध्ये सेवा करता येईल.ह्या सेवेसाठी सकाळी ६ ते ३ व दुपारी २ ते १० अश्या दोन shifts  असतील. सेवेसाठी श्रद्धावानांची नावे lottary  पध्दतीनेच काढली जातील.

जर सेवेच्या दिवशी एखाद्याला येणे जमु शकणार नसेल तर सेवेसाठी परत form  भरावा लागेल. दर गुरुवारी श्री हरीगुरुग्राम येथेच ह्या सेवेसाठी form  उपलब्ध असतील .आज धात्री ह्या नामाविषयी सांगताना ह्या सेवेबद्द्ल सांगण्याची संधी माझ्या(प.पू.बापू) आईने दिली आहे .गुरूक्षेत्रम मध्ये सेवा करताना प्रत्येक क्षण नामस्मरणात घालवा.जे काही काम मिळेल ते अतिशय प्रेमाने करा. तिथे येणार्या  प्रत्येकाशी प्रेमाचे वागा. खरोखर हे सेवा करायला मिळणे हे एक अतिशय पवित्र व सुंदर गोष्ट आहे .
हरि ॐ

Excerpts from Thursday Discourse dated 17 March 2011


हरि ॐ
(नुकतीच डॉ. पौरससिंह ह्यांना औस्ट्रेलियातील Edith Cowan युनिव्हर्सिटी कडुन मास्टर्स ओफ जिरयाट्रिक मेडिसिन ही पदवी प्रदान करण्यात आलीडॉ. पौरससिंह हे भारतातील सर्वांत पहिले जिरयाट्रिक मेडिसिन स्पेशालिस्ट आहेतप्रवचनाच्या आधी ह्या सोहळ्याची सी.डीसर्व बापु भक्तांना दाखवण्यात आली.)

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (१७ - ०३- २०११)


आता आपण सगळ्यांनी एक सी.डी. बघितली.त्यात एक सुंदर गोष्ट दिसते ती म्हणजे त्यात समारोहाच्या आधी धर्मोपदेशक येतात, पवित्र मंत्र म्हणतात आणि मग समारंभ सुरु होतो. आपण परदेशातील लोकांचे अनुकरण करायला जातो पण त्यांच्या चांगल्या गोष्टींचे कधी अनुकरण करत नाही. ते त्यांच्या आध्यात्मिक गोष्टी कधीच सोडत नाहीत.
प्रत्येकाचा अध्यात्माचा मार्ग वेगळा असला तरी base  एकच असतो.हा संपूर्ण सोहळा बघताना एक जाणवले की, चान्सलर, वोईस-चान्सलर हे तिथे आधी गदा घेवुन येतात. त्या आधी तिथे कोणी स्टेज वर येवुन बसलेले नाही. एव्हढ्या मोठ्या युनिव्हर्सिटी च्या समारंभाच्यावेळी प्रथम त्याचा धर्मोपदेशक येतो पवित्र मंत्रांचे उच्चारण करतो आणि मगच कार्यक्रम सुरु होतो.आपण त्यांचे बाह्य स्वरुप स्विकारतो, त्यांचे अंतरंग कधीच बघत नाही.
ह्या सोहळ्या वरुन परत आल्यावर पौरसने सांगितले की, "बाबा, I promise, माझे संपुर्ण आयुष्य मी ह्या कार्याला वाहुन घेईन व हे करताना कुठलाही स्वत:चा फायदा न बघता वृद्धांची  व अपंगांची सेवा करेन." बरयाच  जणांना माहीत नसेल की, नंदाई ब्रेल लिपीत expert आहे.नंदाईने अंधांच्या शाळेसाठी काम केले आहे.पौरसने त्याच्या आईला लहानपणापासुन अपंगांसाठी काम करताना बघितले आहे.


 आज आपण नाव बघणार आहोत ते आहे शिवा.शिव म्हणजे पवित्र.
जर १ मि.ग्र.शिव असेल व त्यात १० अब्ज अपवित्र गोष्ट घातली गेली तर त्यालाही ते १ मि.ग्र.शिव पवित्र बनवते. शिवा म्हणजे अश्या शिवत्त्वाच्या, पावित्र्याच्या कार्याची,अपवित्राचा लय घडवणारी कार्य प्रणाली.
परम शिवाचे शिवत्व जिच्यामुळे अशी ती आदिमाता शिवा (शिवा म्हणजे परमशिवाची पत्नी नव्हे)
प्राचीन वैदिक परंपरेत तीन प्रमुख संप्रदाय होते,विष्णू,शिव, व ब्रह्मा ह्यांची पुजा करणारे अनुक्रमे वैष्णव,शिव,ब्रम्ह हे तीन संप्रदाय. ह्या तीन्ही संप्रदायांनी त्यांचे जे जे स्वरुप (ब्रम्हा, विष्णु, शिव)प्रधान मानले त्यानुसार त्यांनी ह्या आदीमातेला नावे दिली.वैष्णव संप्रदायाने नारायणी,शिव संप्रदायाने शिवा,तर ब्रम्ह संप्रदायाने तिलाच आदिती म्हटले.
जी, गायत्री, तिच अनसुया, तिच शिवा. आदिती म्हणजे जी दिती नाही ती, जिच्यात संहार धर्म अजिबात नाही अशी. जेव्हा व्यासांनी हे वेगवेगळे संप्रदाय बघितले तेव्हा त्यांनी ह्या सगळ्य़ांच्या पलिकडे जावुन दत्तगुरु व गायत्री ही नावे त्या मूळ स्वरुपांना दिली.त्यामुळे हे तीन्ही संप्रदाय एकत्र आले.
शिवा म्हणजे अपवित्रतेला पवित्र करणारी ताकद  ,पवित्र करणारी basic शक्ती. 
"सर्व मंगल मांगल्ये , शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते "
हा श्लोक तिचा सगळ्यात जवळचा मानला जातो कारण ह्यात तीन्ही संप्रदायांचा उल्लेख आहे. मंगलाचे मंगलत्व सांभाळणारी, सर्व पुरुषार्थ साध्य करुन देणारी अशी ती आदिमाता. इथे गौरी तीच आदिती.
पण ही कधी अपवित्रतेला पवित्र करते ह्याचे उत्तर तुलसीदासांनी दिले आहे .." होत न आज्ञा बिनु पयसा रे, सब सुख लहे तुम्हारी सरना,तुम रच्छक कहु को डरना"
जेव्हा मनुष्य सहा पुरुषार्थ पैकी कुठल्याही एका पुरुषार्थाचा हात धरुन पुढे जायला बघतो, तेव्हा त्याला ती तिन्ही पातळीवर म्हणजेच सूक्ष्म, स्थूल आणि तरल या तीनही पातळीवर  सर्व बाजुंनी शिवा सहाय्य करते.आमच्या वर्तमान काळात घडणाऱ्या तसेच भुतकाळात घडुन गेलेल्या अपवित्र गोष्टींनाही ती पवित्र करते. त्याचेच उदाहरण म्हणजे श्वासोच्छवासाची क्रिया.
प्राणायामात आपण अनुलोम-विलोम क्रिया बघतो.ह्यात श्वास आत घेण्याच्या क्रियेला संस्कृत मध्ये पुरक म्हणतात तर श्वास बाहेर टाकण्याच्या क्रियेला रेचक म्हणतात.श्वास आत घेवुन बाहेर टाकण्याच्या मधल्या काळाला अंतर कुंभक तर श्वास बाहेर टाकल्यावर परत आत घेईपर्यंतच्या मधल्या काळाला बाह्य  कुंभक म्हणतात. ही श्वासोच्छवासाची क्रिया तीन पातळींवर घडते.स्थुल पातळी म्हणजे शुद्ध प्राण वायु फुफ्फसांकडुन हृदयाकडे  जातो, हृदयामार्फत सर्व शरीरात पसरतो तेव्हाच शरीरातील अशुध्द प्राण वायु हृदयाकडुन फुफ्फसांकडे पाठवला जातो व उच्छवासावाटे बाहेर टाकला जातो. सुक्ष्म पातळी म्हणजे हा श्वास शरीरातील प्रत्येक पेशींना प्राणवायुचा पुरवठा करतो.तर तरल पातळी म्हणजे हाच प्राणवायु प्रत्येक पेशींच्या enzymes,structure पर्यंत पोचवतो.
तसेच आपण पाणी पितो त्यातीलही शुध्द द्रव्ये शरीरात शोषली जाते व अशुध्द द्रव्ये किड्नी द्वारे मुत्रामधुन शरीराच्या बाहेर टाकली जातात.
म्हणजेच इथेही अपवित्रतेला पवित्र करण्याची क्रिया घडत असते.आपण अन्न घेतो त्याच्या बाबतीत सुद्धा हिच गोष्ट लक्षात येते. अन्नातील चांगले घटक शरीरात शोषले जातात व अनावश्यक घटक मलावाटे बाहेर टाकले जातात. काही जणांना constipation चा त्रास होत असतो इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते कि, मनुष्य जेव्हढा त्याचे ओठ घट्ट बंद करुन ठेवतो तेव्हढा तो constipated असतो.डॉक्टर नेहमी गु्दद्वाराची तपासणी करताना सांगतात , "लंबा,लंबा सांस लो" , कारण त्यामुळे गु्दद्वाराच्या मांस पेशींची हालचाल चांगली होते.व शरीराकडुन आलेले अनावश्यक घटक मलाद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते.जे बिल्कुल हसत नाहीत त्यांना विविध अपचनाचे विकार होत असतात.काही जणांना सवय असते प्रत्येक गोष्टीत खोट काढायची , त्यामुळे जीवनातला आनंद त्यांना शोधताच येत नाही.
दैनंदिन जीवनातील ह्या ज्या तीन घटना बघितल्या, ह्या मध्ये शिवा तत्वाची, ह्या आदीमातेच्या शिव स्वरुपाच्या आशीर्वादाची नितांत आवश्यकता असते.शिवा तत्व म्हणजे चांगला भाग स्वीकारुन वाईट भाग बाहेर टाकण्याची क्रिया.
श्वासाच्या क्रियेतुन अशुध्द प्राण वायु बाहेर टाकला जातो , अन्न ग्रहणाच्या क्रियेतुन मल बाहेर टाकले जाते,जलप्राशनाच्या क्रियेतुन मुत्र बाहेर टाकले जाते.
दिवसातुन एकदा जिला नमस्कार करायला आपल्याला त्रास होतो ती दिवसातुन कितीवेळा आपल्यासाठी झटत असते. १ मिनिटाला आपण १८ वेळा श्वास घेतो,१ तासाला १०८० वेळा म्हणजेच २४ तासात कमीत कमी २५००० वेळा आपली श्वासोच्छवासाची क्रिया घडत असते. श्वासोच्छवासाची क्रिया म्हणजे चांगला भाग स्वीकारुन वाईट भाग बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजेच शिवा तत्व .ह्याचाच अर्थ जन्मापासुन म्रुत्युपर्यंत रोज एव्ह्ढ्या वेळा ती आपली आठवण ठेवत असते.पण आपण दिवसातुन एकदा तरी तिची आठवण ठेवतो का?
१०८ वेळा मंत्र म्हणायला घेतला की , पहिले आणि शेवटचा  मंत्र फक्त मनापासून असतो. मधल्या १०६ वेळा जगातल्या इतर सर्व गोष्टींची आठवण होते, पण तिचे रुप आपल्याला आठवत नाही.डोळे बंद करुन काही जण श्लोक म्हणतात,त्यात सुरुवातीच्या ओळी सोडल्या तर नंतर श्लोक कुठच्या कुठे म्हटला जातो. त्यापेक्षा जप करताना डोळे उघडे ठेवत जा, समोर दत्तगुरुंचा, त्रिविक्रमाचा फोटो ठेवा.मी (प.पू.बापू) तुमची exam  घेणारा नाही तर exam च्या वेळी copy  पुरवणारा आहे.डोळे मिटुन जप करणे म्हणजे exam  देणे. exam  द्यायला जावु नका. ध्यान लावुन बसायला आपण कोणी साधु नव्हे.आपण सामान्य माणसे आहोत म्हणुनच सोप्या मार्गांनी आपण जावु.काही जणांचे म्हणणे असते सुचित दादांनी खुप गोष्टी वाचायला दिल्या आहेत.काय काय वाचायच्या? तर त्यातल्या जेवढ्या जास्त करता येतील तेव्हढ्या करा.
पुरातन काळापासून दिवसाचे ३ भाग आहेत सकाळ,दुपार व संध्याकाळ.दिवसाच्या या प्रत्येक भागात कमीत कमी२४ मिनिटे नामस्मरण/उपासना करण्यास सांगितली आहे.तेव्हढी नाही जमली तरी कमीत कमी एकदा तरी २४मिनिटे उपासना करा.एव्ह्ढे रोज करणे म्हणजे फक्त passing , काठावर पास होणे.जर हे ३ वेळा केले तर first class व ह्या व्यतिरीक्त जर इतर वेळी रामनामाची वही लिहिली तर distiction.आणि जर हेच सगळे जीव ओतुन केलेत तर गोल्ड मेडल पेक्षाही मोठे मेडल मिळेल ज्याची कशाशी तुलना नसेल.जी गोष्ट दादांनी नेमुन दिली आहे त्यात जे जास्त आवडते ते करा. जे आवडते ते जर गुरुने दिले असेल तर ते करणे अधिक उत्तम.पण त्याच बरोबर जर ते जमत नसेल तर मी पठण  करत नाही म्हणून मी फालतू आहे असा विचार मनात आणु नका.
ज्यांचे माझ्यावर प्रेम नाही ,त्यांना ओरडायला, विनंति करायला मी(प.पू.बापू) जात नाही. रोज मात्वात्सल्यविंदानचा १ अध्याय, ग्रंथराज मधील २ पाने, आन्हीक,गुरुमंत्र हे म्हणणे पुरेसे आहे,एव्हढे रोज म्हणणे म्हणजे passing. ह्या सोबत रामरक्षा , दत्तबावनी म्हटल्यास अधिक उत्तम.पण आज सोमवार तर शिव पंचाक्षर म्हणेन,मंगळवार तर गणपतिचे स्तोत्र म्हणेन असे करायला जावु नका.नित्य उपासना महत्वाची आहे.
शाळेच्या संमेलनात सगळ्यांना माहीत असेल वर्षानुवर्षे एकच स्वागत गीत चालु असते,किती boring वाटते ते!!..तेच चेहरे तेच गाणे !!.देवाला पण bore होत नसेल का आपल्या त्याच त्याच चुकिच्या वागण्यामुळे?
ही शिवा दिवसातुन कमीत कमी २१,६०० वेळा रोज तुमचे शरीर पवित्र करण्याचे कार्य करते. मग आम्हांला तिची आठवण ठेवायला नको का?
आम्ही म्हणतो देवा आम्हांला प्रचिती दे...दर मिनीटाला ७२ वेळा हृदयाच्या स्पंदनामधुन दत्तगुरु अज्ञान रुपात प्रचिती देतच असतात. तर दर मिनीटाला १८ वेळा श्वासच्या क्रियेमधुन ती आदिमाता ज्ञान रुपात प्रचिती देत असते.हृदयाची गती समजण्यासाठी डॉक्टरला  pulse बघावी लागते म्हणजेच ज्ञान मार्गाची आवश्यकता असते.श्वासाची क्रिया मात्र आपण सहजपणे जाणु शकतो.म्हणुनच क्रुष्णाने सांगितले आहे की,ज्ञान मार्ग सोडुन द्या , भक्तीमार्ग स्विकारा. श्वास आत घेताना उच्चार होत असतो  "सो" तर श्वास सोडताना उच्चार होतो "हं"म्हणजेच प्रकृतीने आपल्याला जन्मतः च "सोहsम" हा जप दिला आहे.
आपण ॐ म्हणतो तेव्हा हवा आत घेतली जाते, इतर कुठलेही अक्षर म्हणताना हवा बाहेर फेकली जाते. हा ॐ कसा बनला आहे तर ओ,उ,म पासुन म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश.व त्यांच्यावर असणारी अर्धकोर,तुर्यावस्था,नित्यानंदाची अवस्था म्हणजेच "आदिमाता" आणि वरचा बिंदू म्हणजेच मूळ बिंदू "दत्तगुरू" . म्हणजेच ॐ च उच्चार करताना आपण ह्या पाचही शक्ती आत घेत असतो,म्हणजेच पवित्र गोष्टी आत घेतो, तर तांत्रिक ॐ म्हणताना हवा बाहेर टाकतात,पवित्र गोष्टी बाहेर टाकतात.
आपण हरी ॐ म्हणतो हे हरी ॐ म्हणजेच शिवत्व आत घेण्याची प्रक्रिया.समजा यात  ॐ म्हणताना चुकून हवा बाहेर टाकली गेली तर  त्यासाठी हरी आधी म्हणायला मी (प.पू.बापू) सांगितले आहे. चुकीचे हरण करणारा तो हरी म्हणूनच "ॐ" च्या आधी "हरी" म्हणायचे. हरी ॐ म्हणजे पवित्र गोष्ट स्विकारण्यासाठी सद्गुरुनी दिलेले साधन.
हरी ॐ म्हणताना काही चुक झाली किंवा मनात वाईट विचार आला तर शांत पणे माझे नाव घ्या.जे काही वाईट असेल त्याची मी(प.पू.बापू) काळजी घेईन
"तुमचा मी भार वाहीन सर्वथा | नव्हे हे अन्यथा वचन माझे" असे साईनाथांनी सांगितले आहे .


त्यामुळे ह्याच्या पुढे तरी हरी ॐ म्हणताना हा पवित्र भाव आठवायचा प्रयत्न करा.ह्यात हरी जोडल्यामुळे जी पवित्र गोष्ट आत घेण्याची प्रक्रिया आहे त्यात काही mistake होण्याचा चान्सच नाही.

Excerpts from Thursday Discourse dated 03 March 2011



हरि ॐ

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (
०३ - ०३- २०११)
  

"दुर्गा क्षमा शिवा धात्री..."
दुर्गा स्वरुप आपण बघितले.."दुर्गा दुर्गति हारिणी".अनेक जण गोंधळून जातात. दुर्गति म्हणजे नक्की काय ? दुर्गतिचे उ.दा. द्यायचे झाले तर दलदलीत पडणे एक टोक तर गटारात पडणे दुसरे टोक आहे. 
दलदल म्हणजे चिखल, ह्यातुन माणुस जेव्हढे बाहेर यायचा प्रयत्न करतो, तेव्हढाच तो आत रुतत जातो व शेवटी जीव गमावुन बसतो. तर गटारात पडल्यावर सर्वांगाला घाण लागते.इथे जीव जात नाही, पण अंग सगळे घाणीने, दुर्गंधीने माखुन जाते.अश्या प्रकारच्या दुर्गति पासुन वाचवणारी ती दुर्गा. 
एका सामान्य स्त्रिची तिच्या पुर्ण आयुष्यात वेगवेगळी रुपे बघायला मिळतात. तिच्या पित्यासाठी ती कन्या असते, तिच्या पतीसाठी पत्नी, भावासाठी बहिण, मुलासाठी आई, सुनेसाठी सासू अशी वेगवेगळी रुपे दिसतात. अशीच सत्तेची सुद्धा वेगवेगळी रुपे दिसतात. सत्ता हे सुद्धा स्त्रीलिंगीच आहे. जी मुळ आध्यात्मिक वैश्विक सत्ता आहे ती म्हणजे आदिमाता. जी असंख्य ब्रम्हांडे आहेत त्या सर्वांवर सत्ता चालते ती फक्त आदिमातेचीच.

अश्या ह्या आदिमातेला प्राप्त करुन घेण्यासाठी भक्तिमार्ग व तंत्रमार्ग ह्या दोन मार्गांनी उपासना करतात. वैदिक मार्ग व तंत्र मार्ग ह्यांच्या मध्ये भक्ति मार्ग असतो. तंत्र मार्गात आपला फायदा कसा होईल एव्ह्ढाच विचार असतो.
 इथे फरसाणवाल्याचे उ.दा. आठवते. फरसाणवाला नेहमी कागद खाली ठेवून त्यात फरसाण घालुन वजन करतो..ह्यात त्याचा नेहमी कितीतरी फायदा होत असतो,कारण त्या कागदाचे वजन पण त्या फरसाणच्य वजनात add होते, आपल्याला हे समजु शकत नाही. अशी गणिते सामान्य माणसाला कळत नाहीत. वैदिकमार्गातील तंत्रांमधुन अशी अनेक रुक्ष गणिते निर्माण झाली व तंत्रमार्ग तयार झाला.  असे हे तंत्र शास्त्र ह्या आदिमातेला आदिमाता न मानता केवळ आदिसत्ता मानतात.

ह्या तीन मार्गातील फरक आपल्याला बर्फाची फ़क्टरी व हिमालय पर्वत ह्यांच्या उ.दा.वरुन लक्षात येईल. वैश्विक सत्तेच्या गणितामध्ये बर्फाचे पाणी किती अंशाला गोठते ह्यावरून बर्फाच्या फ़क्टरी मध्ये बर्फ तयार होतो.हिमालयावर पण बर्फ दिसतो, कदाचित बर्फाची फ़क्टरीमधुन हिमालयापेक्षा जास्त बर्फ तयार करता येईल.मग ह्या दोघांत फरक काय ? तर हिमालयामधुन गंगा तसेच अन्य बारामास नद्या वाहत असतात. ज्यामुळे अनेक पवित्र तिर्थक्षेत्र आम्हांला मिळतात.
तांत्रिक बर्फाची फ़क्टरी काढतात, त्यातुन बर्फ विकता येतो पण लोकोपयोगी नद्या आम्हांला मिळू शकत नाही.आम्हांला पवित्र करणारी तिर्थक्षेत्रे मिळू शकत नाहीत .
तिथे फक्त रोकडा व्यवहार चालत असतो. म्हणजेच इथे आपल्या लक्षात येते की,
  • तंत्र मार्ग म्हणजे बर्फाची फ़क्टरी 
  • वैदिक मार्ग म्हणजे हिमालय व
  • भक्ती मार्ग म्हणजे त्याच हिमालयाच्या आश्रयाने वाहणारी बारामास नदी गंगा, जी सर्व लोकांना पातकातुन मुक्त करण्याचे कार्य करत असते. 
ही गंगा आली कशी? तर, त्या आदिमातेने आपल्या क्षमेचा एक छोटासा अंश महाविष्णूच्या चरणकमळातून निघणार्या ह्या त्रिपथगामिनी मध्ये घातला.हीच गंगा .म्हणुन आज ही त्या क्षमेच्या अंशामुळे सगळ्यांच्या पापाचा नाश करु शकते. इथे अंश म्हणजे नक्की काय? हे आम्हांला कळले पाहिजे. अध्यात्माचा मुलभूत नियम आज समजावुन घ्यायचा आहे.
जसे पाणी हे जलतत्त्वाचा अंश आहे, मग तो एक पाण्याचा छोटासा थेंब असो कि पुर्ण समुद्र असो . उ.दा.एक व्यक्ती पुर्ण आयुष्य भर जे काही बोलते ते त्याच काळातील बाकिचा समाज जे बोलतो त्या सर्वांचा एक अंश असते. ह्याचाच अर्थ अंश ही लहानशी किंवा मोठी गोष्ट नसुन जे काही संपूर्ण त्याचे एक परिमाण म्हणजे अंश. ह्याची अतिशय सुंदर व्याख्या मला (प.पू.बापू) एका सामान्य आदिवासी व्यक्तीकडुन शिकायला मिळाली. त्या आदिवासींनी त्यांच्या गाण्यातुन हे तत्त्च खुप सुंदररित्या समजावले, की, हा सुर्य जो आम्हांला प्रकाश देतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर केव्हढी मोठी जागा दिसते, ती डोळ्यासमोर दिसणारी सर्व जागा म्हणजे भगवंत, व आपल्या डोळयाची जेव्हढी size त्यातुन आत जाणारा सुर्यप्रकाश म्हणजे माणुस. जी गोष्ट मोठ्या द्न्यानी लोकांना नीटपणे समजू शकली नाही ती ह्या प्रेमळ आदिवासींना सहजपणॆ कळली. म्हणून स्वत:ला  द्न्यानी समजु नका.त्यांमूळे गर्व येतो आणि मग पतन निश्चित असते.
क्षमा समजुन घ्यायचे असेल तर अंश व अंशी समजुन घ्यायला पाहिजे. तिच्या क्षमा ह्या नावावर मी (प.पू.बापू) युगानुयुगे बोलु शकतो. कारण तिचे खरं नाव क्षमा हेच आहे. बाकीची तिची नावे ही त्या क्षमेचा अंश आहेत. म्हणुन प्रत्येक स्त्रीकडे क्षमेची खुप मोठी शक्ती असते, ही शक्ती कधीच विसरु नका. ह्याचा अर्थ वाईटाला क्षमा करा असा नाही. मात्रुवात्स्ल्यविंदान मध्ये आपण बघतो वाईटाचा नाश करण्यासाठी ह्या आदीमातेने रक्तदंतिकेचे स्वरुप घेतलेच. पण वाईटाचा नाश करून, पापांचे डोंगर कमी करुन ती क्षमाच करत असते हे लक्षात घ्या. क्षमा हे नाव देविच्या पुजनात कधीच सापडत नाही.पण मी (प.पू.बापू) सांगतो म्हणुन आजपासून लक्षात ठेवा, तिचे खरे नाव क्षमा हेच आहे. प्रत्येक स्त्री कडे ही क्षमा उपजतच असते. मुल कितीही वाईट वागले तरी आई क्षमाच करत असते, कलियुगात मात्र ह्याला अपवाद दिसुन येतात.
एकदा एक ओळ्खिचे नवरा- बायको दिसले खुप हताश वाटत होते, घाबरत होते. त्यांच्याशी बोलल्यावर कळले. त्यातील Mr.X ची आई विधवा होती व Mrs.X  चे वडिल विधुर होते. त्या दोघांनी पळुन जावून लग्न केले.त्यामुळे हे नवरा- बायको आता एकमेकांचे बहिण- भाऊ झाले होते. प्रसंग खरंच खुप बिकट होता.ह्या Mr.& Mrs.X ची मुले सुध्दा आता लहान नव्हती. तेव्हा शांतपणे त्यांच्या मामाला बोलवुन त्यांना Mr.x  ला दत्तक घ्यायला सांगितले, ह्यामुळे आता हे दोघे नात्याने आतेबहीण- भाऊ होत होते, व आतेबहीण- भावांचे लग्न होते. अश्या तर्हेने परत लग्न लावुन दिले..किती मोठ्या प्रसंगातुन त्यांची सुटका सहजपणे झाली. कलीयुगात काहिही घडू शकते ह्याचे हे उ.दा.आहे, असे exception देखील असतात .
प्रत्येक स्त्रीकडे जी क्षमा असते ती तिने हृदयात धारण करायला पाहिजे.ह्या क्षमेमुळेच युगानुयुगे स्त्रीचा सन्मान केला गेला आहे. पतीने जर १०० ग्रुम पुण्य मिळत असेल तर पत्नीला आपोआप त्यातले ५० ग्रम पुण्य मिळते. तिचे जेव्हढ्या प्रमाणात पतीवर जास्त प्रेम तेव्हढे तिला जास्त पुण्य.
तुम्ही सगळ्या माझ्या(प.पू.बापू) लेकी आहात.म्हणुन प्रत्येक स्त्रीला आज सांगावेसे वाटते.प्रत्येक पत्नीसाठी तिचा पती हा देव असलाच पाहीजे. जो वाईट नाही व जो तुमच्यावर मनापासुन प्रेम करतो अश्या पती- पत्नीच्या नात्यात पती हा पत्नी साठी देव असलाच पाहीजे. मग पतीचीही जवाबदारी येते की त्याने देवासारखे वागलेच पाहीजे. म्हणजेच त्याने पत्नीचा आधार बनलेच पाहीजे. पतीचा आधार आहे,ह्या खात्रीवर स्त्री जगात कुठल्याही संकटांना सामोरी जावु शकते.कारण स्त्री मध्ये  क्षमा तत्व असते . पृथ्वीकडे पण हीच  क्षमा असते ... तिचे नावच मुळी क्षमा आहे... आपण तिला लाथा मारतो, तिच्यात नांगर खुपसतो  पण तरीही ती आपल्याला क्षमाच ती आपल्याला नेहमी चांगलेच अन्न, जल देत असते .
पुरुषाचा आधार गुणधर्म शिवाकडुन आला आहे. परमात्मा हा महाविष्णू रुपाने नेहमी गती देत असतो तर शिव रुपाने नेहमी आधार देत असतो.आधाराशिवाय गती असु शकत नाही. प्रुथ्वी व सुर्याची गती आपण बघतो ती गुरुत्वाकर्षणाच्या आधारावरच असते. सगळ्या गोष्टी एकमेकांपासुन योग्य अंतरावर ठेवुन आधार देणे हा गुरुतत्त्वाचा प्रमुख गुणधर्म. प्रत्येक पुरुषाने हे लक्षात ठेवले पाहीजे, त्याने आपल्या पत्नीचा आधार बनलेच पाहीजे.
स्त्रीची क्षमा व पुरुषाचा आधार हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा कितिही संकटे आली तरी संसार सुखाचाच होतो.
क्षमा हाच मोठा आधार आणि खरा आधारच क्षमा करु शकतो. म्हणूनच  शिवाने अर्धनारीनटेश्वराचे रूप धारण केले.ब्रह्मा- सरस्वती, विष्णू-लक्ष्मी, शिव- पार्वती ही तीन आद्य पति- पत्नीची जोड्पी आदिमातेने उत्त्पन्न केली.  ह्या आदीमातेने स्वत:ही अनुसुया रुपात स्वत:च्याच अत्रि रुपाशी विवाह करुन संसार केला व तिला पुत्रही झाले.
ह्या आदीमातेने प्रत्येक गोष्ट स्वत: आधी करुन दाखवली.तिच्या क्रुतीतुन तिने आम्हांला आध्यात्मिक क्षमा दिली. मला (प.पू.बापू) तिचे सगळ्यात आवडणारे स्वरुप हेच आहे..क्षमा.तिच्याएव्हढी क्षमा कोणाकडेही नाही.
एक साधे उ.दा.घ्या. डोळे बंद करुन गुरुच्या फोटोसमोर शांतपणे बसा व आयुष्यामध्ये लहानपणापासुन काय काय चुका केल्या त्या आठवा. १० मिनीटे पण तुम्हांला बसवणार नाही. स्वत:च्याच चुका आठवुन वेड लागेल.
मग कळेल की एव्हढ्या चुकांच्या सजा मला मिळाल्याच नाहीत.ही क्षमा त्या जगन्माऊलीकडूनच आली.
दिवसभरात किती चुका करतो, कितीवेळा धावत्या गाडीतुन उतरतो , कितीवेळा एखाद्या विषयाचा अभ्यास करायला आळ्स करतो, आणि नेमका तोच विषय पेपरला येतो,कितीवेळा रागाच्या भरात नको ते बोलून जातो.कोण सावरते ह्यावेळी ? ती आदिमाताच..
हे बघितल्यावर लक्षात येते की ह्या सर्व चुकांना क्षमा तिनेच केली.तिने मला (प.पू.बापू) जे पाठवले आहे ते मी क्षमा करावी म्हणुन नाही तर तिची क्षमा तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी, प्रवाहीत करण्यासाठी.. मला(प.पू.बापू) पाठवले आहे.
मी (प.पू.बापू) पोस्टाची पेटी आहे एव्हढंच लक्षात ठेवा.बापु म्हणजे त्याच्या आईची पोस्टाची पेटी. मी (प.पू.बापू) क्षमा करत नाही ... माझा तो गुणधर्म नाही.... माझा गुणधर्म आहे आधार. क्षमा फक्त माझी आईच करू शकते....तिच्या क्षमेची अनेक उ.दा. आहेत.
सत्ययुगाच्या शेवटी वैखानर नावाचा एक राजा होता.त्याने बलवान होण्यासाठी परमशिवाची तपश्चर्या केली आणि खूप ताकद मिळवली. नंतर त्याला वाटले परमशिवा  पेक्षा जास्त ताकद आदिमातेची आहे  मग तिच्या एवढी ताकद मिळवण्यासाठी त्याने आदिमातेची  तपश्चर्या करायला सुरुवात केली. आदिमातेला माहित होते,हयाची इच्छा जरी राक्षसी असली तरी मुळात तो चांगला आहे.म्हणुन त्याची तपश्चर्या पूर्ण होण्या आधीच आदिमाता त्याच्या वर प्रसन्न झाली. त्याने आदिमातेकडे वर मागितला कि मला तुझ्या एव्हढे तुल्यबळ व्हायचे आहे. त्यावर आईने सांगितले ,"तुझी जेव्हढ्या प्रमाणात तपश्चर्या तेव्हढे बळ तुला प्राप्त होईल".त्याच्या लक्षात आले आपली तपश्चर्या कमी प्रमाणात झाली आहे ,त्यामुळे आदिमाते एव्हढे बळ अजुन मिळाले नाही, म्हणुन परत तपश्चर्या सुरु केली, आदीमाता पुन्हा प्रकट झाली व त्याला थांबवले.पुन्हा त्याने आदीमातेकडे ,"मला तुझ्या एव्हढे तुल्यबळ व्हायचे आहे" हेच मागितले, आईने त्याला समजावले व विचारले," तुला माझी जागा घ्यायची आहे का?"     
तेव्हा त्याने उत्तर दिले नाही... मला तुझ्याही पुढे जायचे आहे...वैखानर आता दत्तगुरूंची जागा घ्यायला बघत होता.आदीमातेने त्याला समजावुन बघितले पण त्याने ऐकले नाही,. त्याने परत तपश्चर्या सुरु केली. तेव्हा आदिमातेने त्याला सांगितले, एका दिवसापुरता व एका रात्रीपुरता माझी सर्व ताकत तुला प्राप्त होईल.तिची ताकत आली म्हणजे तिचे पावित्र्य पण आले. तिच्या पवित्र्याच्या द्रुष्टीमुळे तो प्रत्येक वाईट गोष्टिंचा नाश करत जातो..शेवटी त्याच्या लक्षात येते सर्व वाईट म्हणुन त्याने संपुर्ण जगाचाच नाश केला.हे लक्षात येताच त्याला पश्चाताप होतो व तो स्वत:चाच नाश करायला तयार होतो, तेव्हा आदिमाता त्याला थांबवते,व सांगते "सर्व जग आहे तसेच आहे, काहिच घडले नाही, हा सर्व एक भास होता.हे असे का घड्ले ?कारण क्षमा नाही, म्हणुन तु सर्वांचा नाश केलास ह्यासाठीच आधी क्षमा मिळवावी लागते आणि मगच सामर्थ्य."
उत्सवात आपण इथे शत्रुघ्नेश्वरीचे पुजन करणार आहोत,त्यावेळी आपल्याला हेच आईकडे मागायचे आहे की,   
"आई, तू आमच्या शत्रूंचा अशा रीतीने नाश कर कि त्यांच्यापासून आम्हाला त्रास होणार नाही आणि त्यांचे पण चांगले होईल.त्यांच्यापण जीवनात बदल घडुन येईल." सध्याच्या काळात हे शत्रुघ्नेश्वरीचे पुजन अत्यंत आवश्यक आहे.
जयन्ति मंगला काली ..अशी तिची लाखो नावे असली तरी ती सर्व तिच्या क्षमा ह्या एकाच नावाची अंश आहेत.ती क्षमाशील आहे हे जाणायला कधिच चुकू नका.ह्या आईचा खरा गुणधर्म क्षमा हाच आहे , हे सदॆव काळजात धारण करा. बापूंचा हा शब्द कधीच विसरु नका. ही आदीमाता म्हणजे Ultimate  क्षमा आहे. ही अंशी आहे आणि बाकीचे तिच्या ह्या नामाचे अंश आहेत.
हरी ॐ


सुचना: पुढील गुरुवारी संध्या.६-३० वाजता उपासना सुरु होईल. नंतर प्रत्येकाला वालुकेश्वरावर बेल पत्र अर्पण करुन दर्शन घेता येईल.(प्रत्येकाने येते वेळी बेल पत्र स्वत: घेवुन यायचे आहे.)