Subscribe:

Tuesday, October 4, 2011

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२२.०९.२०११)


॥ हरि ॐ ॥
   

" सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणि नमोस्तुते
॥"

    ‘सर्व मंगल’ ह्याचा मराठीत अर्थ ‘सर्वच्या सर्व’ असा होतो. परंतु संस्कृतमध्ये ह्याचा अर्थ वेगळा आहे. सर्व मंगल म्हणजे qualitatively & quantitatively १०८% मंगलाला मंगल बनवणारे. १०८ ही सनातन हिंदू धर्मानुसार पूर्ण संख्या आहे. मानवी देहातही एकूण १०८ उर्जा केंद्रे असतात. म्हणून जपमाळही १०८ चीच बनलेली असते.


    एखादी गोष्ट मुळात मंगल असेल पण ती प्रत्येकासाठी मंगलच असेल नाही. उदा. देवाचा प्रसाद खाऊनही काही जणांना अपचनाचा त्रास होतो.मग देवाचा प्रसाद त्यासाठी मंगल नव्हता का? म्हणजेच कुठल्याही मंगल गोष्टीचा तुमच्यावर प्रभावही मंगलच व्हावा लागतो.
    समजा डायबेटिसच्या पेशंटने १२० मोदक खाल्ले तर त्याच्यासाठी मंगल होतील का? नक्कीच नाही. म्हणून ही ‘सर्व मंगल मांगल्ये’ असणारी आदिमाता कशी आहे? ही नुसते चांगले देत नाही तर त्या चांगल्याचा प्रभाव आमच्यासाठी चांगलाच देते. मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक घटना, कृतीमध्ये ही मंगलच परिणाम घडवून आणते.

             मी जर chemical engineer आहे व माझ्या ज्ञानाचा उपयोग मी बॉम्ब बनविण्यासाठी केला तर मी मंगल मनुष्य आहे का?
          तसेच मी जर डॉक्टर आहे व माझ्या ज्ञानाचा उपयोग मनुष्याला मारण्यासाठी केला तर डॉक्टर मंगल होणार का? नक्कीच नाही.
          परंतु, ती आदिमाता जे देते, त्याचा प्रभावही प्रत्येकासाठी मंगलच होत असतो. म्हणूनच ती आदिमाता, शिवा म्हणजेच सर्व मंगल. शिव म्हणजे परमपवित्र. आम्ही कितीही अपवित्र असू तरी ती आदिमाता एवढी पवित्र आहे की, ती आम्हाला नेहमी पवित्रच करते. अशी ही माझी (परमपूज्य बापू) आई, अनंत ब्रह्मांडाची आई. 
ती जेव्हा निर्गुण निराकार रुपात असते तेव्हा तिला आदिती म्हणतात. तीच स्पंदरुपाने असते, तेव्हा तिलाच गायत्री म्हणतात.

            गेल्या गुरुवारी सांगितले की मी तपश्चर्येला बसणार आहे.आज त्याविषयीच मी (परमपूज्य बापू) बोलणार आहे.  ह्या काळात मी जे काही हवन, जप, प्राणायाम करणार आहे, ते सगळ माझ्या बालोन्मत्त अवस्थेत करणार आहे.

मी बालोन्मत्त अवस्था स्विकारणार आहे, म्हणजे स्वत:चा ‘स्व’ माझ्या (परमपूज्य बापू) आईच्या स्वाधीन करणार आहे. ते म्हणजे सत्ययुगापासून ह्या उपासनेच्या क्षणापर्यंत माझ्या (परमपूज्य बापू) प्रत्येक जन्माचा, प्रत्येक क्षण, माझं (परमपूज्य बापू) प्रत्येक कार्य, कृती, विचार, आचार, प्रत्येक घटना ह्यांची मी आहुती देणार आहे.    तसेच, माझ्या प्रत्येक जन्मात, ह्या जन्मातही वय वर्षे ५५ पर्यंतच्या काळात ज्या ज्या व्यक्तींनी माझ्यावर प्रेम केले, त्या सर्वांचे प्रत्येक जन्म, प्रत्येक विचार, प्रत्येक कृती व घटना मी (परमपूज्य बापू) माझ्या प्रत्येक आहुती बरोबर अर्पण करणार आहे.    फक्त यासाठी, माझ्या आईची अट एकच ज्याप्रमाणात विश्वास त्याप्रमाणात फळ. हा संकल्प घेऊन मी हवन सुरु करणार आहे.

    ह्या हवनाच्या वेळी अतिशय सुंदर गोष्ट माझ्यासमोर असणार आहे ते म्हणजे ‘प्रत्यक्ष संपूर्ण स्कंदचिन्ह’. हेस्कंदचिन्ह गुरुक्षेत्रम्‌मध्ये हवनकुंडाच्या समोर असणार आहे. मी पूर्णवेळ तिथे असेनच असे नाही. कदाचित पूर्ण दिवसही एखाद दिवशी बसेन किंवा एक तासही बसेन.
    ह्या होमाची रचना वेदोक्त आहे, ह्यात माझं असं काही नाही. फक्त आई माझी आहे. आज ऋग्वेद, यजुर्वेद वेदांमधील ह्या यज्ञाशी संदार्भेत उल्लेख आपण बघणार आहोत.

    ॠग्वेदात ९व्या मंडलात ६४ व्या सूक्ताने ह्या यज्ञाचा आरंभ होणार आहे, त्यात सांगितले आहे की, ‘मी एक सामान्य मनुष्य आहे, ह्या आमच्या यज्ञात स्तुती ऐकणार्‍या देवता कोणत्या? कोणता देव आमच मंगल करणार आहे? कोणता देव संरक्षणासाठी धावून येणार आहे? हे आम्हांला माहित नाही.
    परंतु, बुद्धीपासून आणि मनापासून मला यज्ञ करायची इच्छा आहे . बुद्धीवान लोक दिव्यत्त्वाची इच्छा करतात. पण मी सामान्य मनुष्य आहे , मी माझी मनोकामना देवापुढे व्यक्त करण्याची इच्छा करतो. कारण, मी जाणतो की देवा तुझ्याशिवाय मला कोणी सुख देऊ शकणार नाही.

    ह्या स्तोत्राने यज्ञाला गुरुक्षेत्रम्‌मध्ये सुरुवात होणार आहे.ह्या सूक्ताच्याच पुढच्या ॠचेमध्ये सांगितले आहे की, वाईटातल्या वाईट मानवासाठीसुद्धा अग्नि, सूर्य, चंद्राच्या १६ कला, इंद्र, आदिमाता ह्यांचे पूजन तसेच यमाला control करणार्‍या श्रीगुरुंची उपासना, मानवा तुझ्यासाठी फलदायी आहे.
            गायत्रीचा जप आपण मागे तीन दिवस केला तेव्हा मी तुम्हांला भर्ग म्हणजे काय? ते सांगितले,भर्ग म्हणजे परमात्म्याचे पापदाहक तेज.ॠग्वेदातच पुढे उल्लेख आहे की, ‘ह्या परमात्म्याचे कल्याणकारक भर्गनामक तेज प्रसिद्ध आहे.’
   " भर्गनामक तेज व अग्नि हे एकच आहे, म्हणून हे वैश्वानर परमात्मा, आमची घृणा न करता आमची प्रार्थना ऐक."

    वेदांमध्ये कुठेही क्लिष्टता नाही, अतिशय स्पष्ट व सुंदरपणे वर्णन आहे.  ऋग्वेदातील ७ व्या मंडलात १२२ ऋचेमध्ये सांगितले आहे की, ‘हा वैश्वानर परमात्मा यज्ञात अग्निरुपाने प्रगटतो, तेव्हा मनुष्यासाठी सर्वात जवळचा असतो प्रकाश देणारा हा अग्नि शरीर, मन व वातावरण ह्यांतील दूषित गोष्टींचा नाश करुन मनुष्याला तेजस्वी बनवतो. म्हणून हा सदैव पूजनीय आहे.

    वेदांमध्ये विष्णुसच त्रिविक्रम म्हटले आहे.
    " हे त्या मूळ पुरुषाचा पुत्र असणार्‍या परमात्म्या, ह्या पार्थिव जगताचा तू स्वामी आहेस, म्हणून तू आम्हांला परमासिद्धी मिळवून देणारे ऐश्वर्य दे."  सिद्धि म्हणजे कुठलेही साधन वापरण्याची शक्ति.
    उदा.- बंगला हे सुख नाही तर सुखाचे साधन आहे. त्याच बंगल्याला जर आग लागली तर ते सुख होऊ शकत नाही.
    म्हणूनच, " हे परमात्म्या, अश्याप्रकारचे ऐश्वर्य आम्हांला दे की, जे घातक नाही. असे ऐश्वर्य आम्हांला नीटपणे वापरण्याची बुद्धी दे." असे ऐश्वर्य देणारी ती राधा, आल्हादिनी म्हणजेच आमच्या चांगल्या कार्याच्या आड जे काही येते त्यांचा नायनाट करण्याची शक्ति.
    हे परमात्म्या, असं ऐश्वर्य आम्हांला दे की, जे सुखकारक असेल, ज्याच्यामुळे आमच्यावर पाप चढणार नाही.
    ऋग्वेदातच १५ व्या सूक्तात माझा परमपूज्य बापू आवडता मंत्र आहे तो म्हणजे,
    ‘हे वैश्वानरा, परमात्म्या, माझा जो त्रिदेह आहे, त्याचे सामर्थ्य व ऊर्जा कमी न होऊ देणार्‍या तुला हव्य म्हणून वाहून नेण्यासाठी त्या आदिमातेने धारण केले आहे.म्हणून तू आमच्या सामर्थ्याचा र्‍हास होऊ देत नाहीस.’

    ‘एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरु ऐसा ’

    ह्याच सूक्तातात पुढे सांगितले आहे, की ‘हे परमात्म्या तू आम्हांला दिलेले धन, धान्य शक्ति कायम राहू दे व तुझ्याच इच्छेने त्यांचा वापर होईल. ह्याची काळजी घे, आम्हांला सुरक्षित ठेव.’
    ‘जे कोणी आपले प्रेम ह्या यज्ञाग्नीत अर्पण करतील त्या प्रत्येकाला तू संरक्षित ठेव’, ही आदिमातेला केलेली प्रार्थना आहे.
    " इथे प्रेमाने बसून जे स्तोत्र ऐकतील, त्यांना तू सुशक्ति कर. तू तुझ्या सर्व आयुधाने माझ्या संघाचे कल्याण कर."
    ह्याच्या पुढच्या ऋचेत सांगितले आहे की, ‘ह्या यज्ञामध्ये परमात्मा व त्याच्यावरचे किरातरुद्रीय स्वरुप त्यांचे सामर्थ्य देत राहोत.’
    इथे विश्वामित्र स्पष्ट शब्दात सांगतात की, " यज्ञाबद्दल माहित असूनही जो देव स्तुती करणार नाही, तो सृष्टीच्या रचनेचे पालन करणार्‍या देवांकडून कुठे जाईल, हे सांगता येत नाही. म्हणून हे परमात्म्या, आमचा बुद्धीभेद करणार्‍यांपासून आमचे संरक्षण कर."
    ‘जो यज्ञ करत नाही, पुण्य कर्मे करत नाही परमात्म्याची पूजा करत नाही, त्याला दुर्गति प्राप्त होऊ शकते.’
    भयगंडामुळे नेहमी चांगली माणसेसुद्धा जास्त मनाने खचतात. पूर्ण शुद्ध कोण आहे? मला सांगा एवढं पाप केलेल्या वाल्याकोळ्याचा वाल्मिकी होऊ शकतो, मग आम्ही का नाही सुधारणार? नक्कीच सुधारु शकतो. सुधारताना चूक झाली तरी आपण परत सुधारण्याचा प्रयत्न करु.

    फालतू गोष्टी मनात ठेवून स्वत:ला दोष देण्याची काहीच आवश्यकता नाही.समजा एक आडदांड मनुष्य हातात काठी घेऊन उभा आहे, आणि समोर एक अगदी लुकडा मनुष्य आहे पण त्याच्या हातात एके-४७ आहे,तर काय उपयोग त्या आडदांड मनुष्याच्या ताकदीचा ?

        हे कलियुग आहे. कुणी तुमच्या कानफटात मारली, तर दुसरा गाल पुढे करा हे सांगणारा मी नाही, ते माझं sicence नाही. उलट जर तुमच्यात ताकद असेल तर जरुर त्याच्या चार कानफटात मारा. उगाचच लाचार होऊ नका.

    जर कुणी तुमच्या बहिणीवर बलात्कार करायला आला तर हातात मिळेल त्या गोष्टीने तुम्ही त्याला प्रतिकार केलाच पाहिजे.

    अध्यात्म्यात आलो म्हणजे लोकांकडून फसून घ्यायचे असे बिल्कुल नाही. बावळटपणा मला (परमपूज्य बापू) आवडत नाही. मी एकच गोष्ट मानतो clean, clear and precise जगातील माणसं कशी आहेत, त्यानुसारच आपला व्यवहार हवा.
अध्यात्म म्हणजे चांगलं वागण्याचा प्रयास करायचा.आपण कुणाकडूनही फसवून घ्यायचं नाही. वाईट माणसांना फसवलं तर वाईट होत नाही.
    गुरुक्षेत्रम्‌मध्ये आपण यज्ञकुंड बनवणार आहोत. हा कुंडप्पाय यज्ञ आहे ह्याचे प्रत्येक मनुष्याने नुसतं दर्शन घेतलं तरी परमात्मा स्वत: त्यांच्यासाठी सूर्यकिरणांच्या सहाय्याने सहाय्यक पाठवतो पण ह्यात जे मन लावून भाग घेतात, त्यांच्यासाठीच.


    ह्या यज्ञाच्यावेळी सिद्ध कुंजीका स्तोत्र अर्चन म्हणून आपण घेणार आहोत. कुंजी म्हणजे किल्ली.
    केवळ ह्या कुंजिका स्तोत्राचा पाठ केल्याने सप्तशती पाठ केल्याचे पुण्य प्राप्त होतो. ह्या कुंजिका स्तोत्राचे श्रवण केल्याने जारण, मारण, अशा गोष्टींचे स्तंभन केले जाते. ह्यांचा प्रभाव होऊ शकत नाही.

    ह्यात विच्चेकार असणार्‍या चामुण्डेला आवाहन केले आहे. ह्यात सांगितले आहे की,
    ‘अखिल ब्रह्मांडाचे बीज रुप असणार्‍या आदिमाते, तुला नमस्कार असो. आमच्या जीवनात अभाव उत्पन्न करणार्‍या गोष्टींचा तू नाश कर. हे भैरवी, भद्रा भवानी तुला वारंवार नमस्कार असो. भैरवी भद्रा म्हणजे पाप-पुण्याचा विचार न करता केवळ प्रेमाने सहाय्य करणारी ती भैरवी.

    पर्ववती पार्वतीची जी अष्ट रुपे आहेत. त्यांच्या बीजांना ह्या कुंजिकास्तोत्रात आवाहन केले आहे.
    ‘हे भक्तमाते पार्वती, आमच्याकडे हे स्तोत्र म्हणण्याची ताकद नाही, म्हणून आमच्यावतीने तू गा.’
   
 अशा ह्या कुंजिकास्तोत्राने आपण हवन करणार आहोत. छांदोग्न्य उपनिषद व श्वेताश्वेत उपनिषद ह्यांच्या साहाय्याने हा यज्ञ संपन्न होईल.

             छांदोग्न्य उपनिषदातील पंचाग्नि विद्येच्या साहाय्याने यज्ञ होईल तर श्वेताश्वेत उपनिषदातील हंसविद्येच्या साहाय्याने तपश्चर्या संपन्न होईल.   

विश्वामित्रांनी रामाला दिक्षा देताना जो मंत्र दिला, तोच मंत्र ह्या तपश्चर्येतील आवाहन मंत्र असेल. ज्यात वर्णन आहे की,
   ‘स्वत:च्या तेजाने प्रकाशणार्‍या, भक्तांवर कृपा करणार्‍या, सत्कर्म असो की नसो तरीदेखील ज्याचे हृदय हळहळते, प्रत्येक मनुष्यामधील अंतराग्नी अधिकाअधिक प्रज्वलित करणार्‍या किरातरुद्रा, तुला आश्वासन देतो की, विश्वामित्राचे ब्रह्मगान भारतातील श्रद्धावानाचे रक्षण करेल.’
    ऋग्वेदातील तिसर्‍या ऋचेतील २९ व्या स्तोत्रात सांगितले आहे.
    ‘ज्याप्रमाणे आदिमाता प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील प्राणाग्नी प्रज्वलित ठेवते, त्याप्रमाणे श्रद्धावानांचे अग्नि विश्वामित्राचे ब्रह्मगान प्रज्वलित करतो.’

    मी (परमपूज्य बापू) डॉक्टर योगिन्द्र जोशींना विनंती करतो की, त्यांनी ह्या माहितीचे एक booklet तयार करावे. ह्या सहा महिन्याच्या काळात सहोपासना ज्यांना जमेल त्यांनी जास्तीतजास्त करावी व तुमची उपासना विश्वकल्याणासाठी अर्पण करा. जर मनापासून दुसर्‍याचं कल्याण व्हावं म्हणून प्रार्थना केलीत तर त्याच्या दसपट तुम्हांला फायदा मिळेल.

    मला (परमपूज्य बापू) विवेकानंदाची दोन वाक्य खूप आवडतात -
१)    स्वत:ची घृणा कधीच करु नका. परमात्मा तुझाच आहे व तो कधीच तुला टाकत नाही.

२)   भय हाच अभाव आहे. असर्मथता आहे. कमजोरी ही जगातल्या सर्व दु:खांचे, अपराधांचे मूळ कारण आहे.म्हणून जे काही तुम्हांला कमजोर बनविते ते विष म्हणून बाजूला ठेवा जर पूर्णपणे ते टाकू शकला नाहीत तर प्रमाण तरी कमी करा. भीती कधीच असता कामा नये. 

    आपण प्रसन्नोत्सवात अष्टादशभुजा महिषासुरमर्दिनी बघितली भीती वाटली का तिची? आई एकच आहे जी महाकाली, महालक्ष्मी तीच अनसूया.

    तुम्ही भक्तीमार्गावर असाल तर माझं (परमपूज्य बापू) आश्वासन आहे की, ही महाकाली उग्ररुपाने तुमची bodygaurd म्हणून असेल.

    ज्याप्रमाणे प्रेमाने प्रसन्नोत्सव केला त्याच प्रेमाने मी(परमपूज्य बापू) तपश्चर्या  करणार आहे. किती दिवस तपश्चर्या चालणार हे तुमच्यावर अवलंबून आहे. ह्या सहा महिन्याच्या काळात रस्त्यात कधी दिसलो आणि ‘हरि ॐ’ नाही म्हटलं तर रागवू नका. मी (परमपूज्य बापू) आतापर्यंत कधीच कुणाचा द्वेष केला नाही. मला पापाची घृणा वाटते, पापियाची नाही.
    ह्या अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते शुभकंरा नवरात्रीच्या नवव्या दिवसापर्यंत मी तपश्चर्या करणार आहे. ह्या काळात तुम्हांला सांगितलेल्या उपासना मनापासून प्रेमाने करा.

All The Best To You For Everything.

॥ हरि ॐ ॥

0 comments:

Post a Comment