Subscribe:

Thursday, November 10, 2011

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०३.११.२०११)


  • ॥ हरी ओम॥
    आषाढ पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा ह्या पौर्णिमा वेगळ्या नावाने ओळखल्या जातात. आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा, अश्विन पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखल्या जातात.
     
    ह्या त्रिपुरारीच्या आईचं नाव महिषासूरमर्दिनी आहे, ज्याला तिने मारला त्या नावाने ओळखली जाते त्याप्रमाणे ह्याने त्रिपुरासुराचा नाश केला म्हणून त्रिपुरारी म्हणतात.
     
    साध्या गोष्टीत छान शोधणं, छान बनवणं म्हणजे चिंतन. मूल जेवत का नाही ह्याबद्दल आई विचार करते म्हणजे चिंतन करते. नंतर ती लहान मुलाला कुठले पदार्थ आवडतात ह्याचा शोध घेते आणि मग निरनिराळ्या भाज्या भातांमध्ये, पराठ्यामध्ये घालून मुलाला आवडेल असं खायला बनवते हा तीचा अभ्यास म्हणजे सराव असतो. साड्या घेताना बायका चांगल्या साड्या कुठल्या, कुठल्या साड्या माझ्या मैत्रिणीकडे नाहीयेत ह्याचं चिंतन करतात, नंतर त्या साड्या कुठल्या दुकानात कमीत कमी किंमतीत मिळतात ह्याचा शोध घेतात आणि नंतर ते कितीही लांब असलं तरी त्या ठिकाणी जाऊन साडी घेतात अशा प्रकारे आपल्या आयुष्यात चिंतन, शोध आणि अभ्यास आपोआप चालूच असतो.
     
    आधी चिंतन नंतर शोध नंतर अभ्यास म्हणजे पुरुषार्थ त्यानंतर यश मिळते यशानंतर तृप्ती येते तृप्तीतून शांती मिळते. स्मशान शांती नव्हे समाधानकारक शांती मिळते. आम्हांला यश मिळालं तरी तृप्ती आणि शांती मिळतेच असं नाही. कारण आमच चिंतन, शोध आणि अभ्यास ठरवून केलेला नसतो. नित्य कर्म असो, नैमित्तिक कर्म असो प्रत्येक कर्मात चिंतन, शोध, अभ्यास सुरुच असतो. वाईट माणसांचा मुद्दामहून प्रतिस्पर्धकांबद्दल चिंतन, शोध आणि अभ्यास करत असतात. चिंतन, शोध, अभ्यास ह्या तीन गोष्टी चांगल्या मार्गाने, पवित्र मार्गाने, परमेश्वराचं स्मरण करुन केल्या तर पुढील यश, तृप्ती आणि शांती ही मिळते.
     
    मातृवात्सल्यविन्दानम्‌ मध्ये घडणारी सगळी युद्ध ही शरीरातील नऊच्या नऊ चक्रात चालू असतात आणि प्रत्येक पातळीवर देवीचा, दैवी शक्तीचा म्हणजेच तुमचा विजय होतो आणि तुम्हाला अपयश देणार्‍या गोष्टींचा पराजय होतो. लढणं हा देवी तत्त्वाचा प्रमुख गुणधर्म आहे म्हणून लढाईसाठी लागणारी ताकद मातृवात्सल्यविन्दानम्‌ पासून मिळते. चिंतन, शोध आणि अभ्यास ह्या गोष्टी शिव बाणाने वापराव्या लागतात. शिव म्हणजे पवित्र मार्गाने. त्रिपुरारीला एका रेषेत येऊ न देण्याची जी शक्ती होती तिचा नाश शिवगंगागौरी व किरातरुद्रांनी केला.
     
    त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस प्रत्येक मनुष्याला चिंतन, शोध व अभ्यास ह्याच्यातून जास्तीत जास्त यश, तृप्ती, शांती मिळवून देतो. ह्या दिवशी जो कोणी चांगल बनण्यासाठी चांगला प्रयास, चांगल चिंतन करेल त्यांना मी यश देईन असा परमशिवाचा वर आहे. त्याने वरदान दिलं नाही तरी भक्तांना problem  येतो आणि दिलं तरी ही भक्तांनाच problem  येतो कारण तो वर इतर कसे वापरतात depend असतं. जे शुभमार्गीय आहेत त्यांचे संकल्प पूर्ण होण्याची शक्ती वाढते, जीवनातलं नैराश्य, अशांती झटकून टाकण्यासाठी ह्या दिवसासारखा दिवस नाही. ह्या दिवशी परमशिव, पार्वती, किरातरुद्र आणि शिवगंगागौरी हे चारही जणं प्रत्येक श्रध्दावानांसाठी चिंतन, शोध आणि अभ्यास त्याचबरोबर यश, तृप्ती आणि शांती ह्यांचा balance करण्यासाठी टपलेले असतात. 
     
    मला चांगलं बनायचं आहे असा संकल्प करा, मी जे काही चांगलं करत नाही ते चांगलं करण्यासाठी चांगले संकल्प करा. १०० संकल्प करा ९९ विसरलात तरी एक तरी लक्षात राहील. त्या त्रिपुरारीचं कुठलही नाव घेत घेत आपल्या जीवनाचं चिंतन करा. कमीत कमी त्याच्या नामाचं, त्याच्या गुणांच चिंतन करायला पाहिजे. maximum त्याचं चित्र, त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणता आली पाहिजे.
     
    ह्या दिवशी जो कोणी परमात्मात्रयीचं स्मरण करतो, परमात्म्याचं नाम, भजन, चिंतन सुरु करतो स्वत:साठी केलेलं चिंतन परमात्म्याच्या चिंतनाशी जोडतो त्याला यश मिळतं अशी योजना मोठ्या आईने केलेली आहे. हा दिवस वर्षातून एकदाच येतो.
     
    ह्यावर्षी ह्या दिवशी आपण किरातरुद्राचं पूजन करणार आहोत. ह्या पूजनासाठी किरातरुद्राची सुंदर मूर्ती तयार केली गेली आहे जी पूजनानंतर विसर्जन केली जाईल.
     
    ह्या पूजनासाठी पोस्टकार्ड सारखे तीन पेपर दिले जातील त्यावर ठिपक्यांनी किरातरुद्राची आयुधे काढलेली असतील - शृंगी, धनुष्यबाण आणि त्रिशूल.
     
    प्रथम मंगलाचरण होईल नंतर ही आयुधं हळद व पाणी ह्यांच्या सह्याय्याने कागदावर उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूच्या बोटाने (अनामिकाने) चित्र काढायचं ते ताम्हणात आधी शृंगी त्यावर धनुष्य आणि बाण आणि त्यावर त्रिशूलचा कागद ठेवायचा. मग दुसरे स्तोत्र म्हटलं जाईल त्यावेळी सफेद फुलं अर्पण करायची नंतर विशेष नामाचं पठण होईल तेव्हा त्यावर बिल्व पत्र अर्पण करायचं. सगळी स्तोत्रं माझ्या (परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या) आवाजात आहेत. त्यानंतर किरातरुद्राला प्रिय असणारा नैवेद्य अर्पण करायचा आहे. सुक्या खोबर्‍याची वाटी आणि एका पिशवीत यवाचं पीठ असेल. ते अर्पण करायचं.
     
    ते तीन कागद आणि अर्पण केलेला नैवेद्य आपल्याबरोबर घेऊन जायचा. घरी जाताना पूजनाचे १००% व्ह्यायब्रेशन्स्‌ आपण बरोबर घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणून ह्या कागदांबरोबर १०८% व्ह्यायब्रेशन्स्‌ बरोबर घेऊन जाऊ शकतो. हे कागद कमीत एक रात्र आणि जास्तीत जास्त सात दिवस तुमच्या घरी ठेवू शकता त्यानंतर ते कागद पाण्यात विसर्जन करावेत किंवा तुळस, केळी किंवा औदुंबराच्या झाडाखालील मातीत पुरावेत म्हणजेच भूमातेला अर्पण करावेत. घरातील कोणी व्यक्तीने किंवा मित्रमंडळींमधील कोणी पूजन केलेले नसेल तर ज्या व्यक्तीने हे पूजन केले आहे त्या व्यक्तीने ते कागद त्यांच्या मस्तकाला लावावेत त्यामुळे त्यांनाही पूजनाचे व्हायब्रेशन्स्‌ मिळू शकतील.
     
    खोबरे जेवणात वापरावं व्हेज-नॉनव्हेज कशातही वापरा मला(परमपूज्य बापूंना) फरक पडत नाही. यवाच्या पिठात दूध व पिठी साखर मिक्स करुन ते प्रसाद म्हणून द्यावा.
     
    त्यानंतर मार्गशिर्ष महिन्यात गुरुक्षेत्रम्‌मध्ये किरातरुद्र आणि शिवगंगागौरी ह्यांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यावेळी आपल्या गुरुक्षेत्रम्‌च्या उदीमध्ये जी गोविद्यापिठम्‌ मध्ये तयार होते त्या उदीत मी(परमपूज्य अनिरुद्ध बापू) करत असलेल्या यज्ञाचे भस्म मिक्स केले जाते. त्यातच आता परशूरामाला किरातरुद्राकडून मिळालेले भस्म मिसळण्यात येणार आहे. हे भस्म म्हणजे माझी (परमपूज्य बापूंची) रेणूका माता सती गेली त्यावेळी तिच्या चितेचे भस्म जे दत्तात्रेयांनी किरातरुद्राकडून परशूरामाला दिले होते ते आहे. त्याच बरोबर उदीच्या बाजूला एका पात्रात हळद ठेवली जाईल ही हळद म्हणजे रेणूका माती सती जाताना  तिच्या मळवटातील तीने जी हळद काढून दिली होती ती परशूरामाला शिवगंगागौरी कडून मिळाली होती ती हळद गुरुक्षेत्रम्‌मध्ये ठेवण्यात येईल आणि ती पूर्णपणे विनामूल्य असेल. ह्या मी(परमपूज्य बापू) माझ्या गोष्टी तुम्हाला देतोय ह्या विकून दिल्या जात नाहीत. मी(परमपूज्य बापू) माझ्या आईबापाला विकू शकत नाही.
     
    ही हळद घरातील कुठल्याही मंगलकार्याला, पूजनाला वापरु शकता, हळदी-कुंकवाच्या समारंभासाठी वापरु शकता, शत्रू घरी आला तरी शत्रुला लावू शकता (पुरुषांनाही हळद लावतात), लग्नकार्यातील हळदी समारंभात वापरु शकता, कोणी तुमच्यावर ब्लॅक मॅजिक केलेलं असेलं आणि तुम्ही ही हळद लावलेली असेल तर ते ब्लॅक मॅजिक ज्याने केलेयं त्याच्यावरच उलटेल. अशी ही हळद आणि हे भस्म ह्या जन्मात आम्हाला प्राप्त झालयं मग ह्याचा पूर्ण उपयोग करुन घ्या.
     
    त्रिपुरारी पौर्णिमा १० तारखेला असली तरी आपण ती १२ तारखेला साजरी करणार आहोत म्हणून आपल्यासाठी अनिरुद्ध पौर्णिमा १२ तारीखच चंद्राचं चंद्र बघून घेईल मी (परमपूज्य बापू) सांगितलेल्या तारखेला आपली अनिरुद्ध पौर्णिमा असेल. त्यामुळे आता पासूनच उत्सवाला तयारी करा.
     
    ॥ हरि ॐ॥