Subscribe:

Special Discourses


Sadguru Bapu's jalgaon pravchan  
|| हरी ॐ ||

सकाळी उठल्यापासून मग ते जळगाव असो, मुंबई असो, काश्मीर असो ....... किंवा आपल्या सर्वांचा आवडता पाकिस्तान असो... सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न वारंवार येत असतो जो स्वतःच स्वतः ला विचारात असतो कि "आता काय करायचं?"  विचार करा लाखो वेळा आपण हा प्रश्न स्वतःला विचारला असेल.
बरं त्याच उत्तर मिळाले कि मग " हे करू कि ते करू?", मग ते ठरत बर हे करायचं मग "कस करायचं?" ते ठरलं कि मग दुसरा प्रश्न समोर उभा असतो कि " हे कसं होईल?" मग त्याच्या पुढचा प्रश्न कि "यातून काय होईल?" आणि हा प्रश्न आला कि मग जे उत्तर येते त्यात ज्याचे यशस्वी उत्तर येते तो "सुखी मनुष्य" असतो.
समजा तुम्ही काश्मीर किंवा स्वित्झर्लंड ला फिरायला गेला आहात, तिथे राहण्याची, खाण्यापिण्याची अगदी मस्त सोय आहे पाहिजे त्या सर्व सुखाच्या वस्तू आहेत आणि समजा (स्वित्झर्लंडला) तुम्हाला मुतखडा होऊन खूप जोरात पोटात दुखतंय.. काय उपयोग आहे त्या सर्व सुखाच्या वस्तूंचा ? तुम्हाला तेथील सोंदर्य उपभोगता येईल का? 
समजा काश्मीरला गेलात व तेथे सर्व सुखाच्या वस्तू आहेत आणि अतिरेक्यांनी हल्ला केला.. मागे बंदूक ठेवली आणि म्हटले आता फिरा. तर काश्मीर फिरता येईल का? म्हणजेच "सुखासाठी साधनांचे अस्तित्व आवश्यक नसते." 
जिथे माणसाला वरील प्रश्न आला, तिथे भगवंत / परमात्मा तिथे उभा राहतो. जे माहित नाही, जे ज्ञात नाही, ज्याचे भय वाटते तिथे चुकीचे निर्णय होऊ शकतात. ज्या गोष्टीची नीट माहिती नाही तिथे चुकीचे निर्णय होऊ शकतात.
आपला खूप चांगला मित्र, किंवा आपली आई जी आपल्याला २० वर्षांपासून सांभाळत असते तरी काही काळानंतर मुलगा आईला, बहिण भावाला, भाऊ बहिणीला, विसरतो. आपण यांना नीट ओळखतो का? नाही जर आपण त्यांना नीट ओळखत असतो तर भांडण झालीच नसती...
२०-२५ वर्षांपूर्वी मी (प. पू. बापू) दादरला राहत होतो. तिथे श्री सिद्धिविनायक मंदिराच्या समोर एक ज्वेलरचे दुकान आहे तिथे माझा (प.पू.बापूंचा) मित्र हिरे खरेदी करण्यासाठी आला होता. तो बापुंना भेटला ,तेव्हा समजले कि तो चेकबुक आणि पैसे घरीच विसरला होता. तेव्हा तो त्याच्या मामाकडे गेला आणि पैसे मागितले. मामाने विचारले "किती पाहिजेत ?" तेव्हा तो म्हणाला जास्तीत जास्त २० लाख लागतील. तेव्हा मामा म्हणाला ,"ये आणि घेऊन जा वगैरे वगैरे ."
तोच मित्र बापुना पुंन्हा एकदा भेटला तेव्हा त्याने आपल्या मामाबद्दल खूप काही सांगितले.त्याला म्हटले कि आता एक काम कर मामाकडे जा...मामाकडे रडायला सुरुवात कर. कि माझा बिझनेस नीट चालत नाही, गाडी विकायला काढली आहे, वगैरे वगैरे .  आणि म्हण कि "मामा मला २० लाख पाहिजे आहेत." तसा तो मामाकडे गेला .तेव्हा मामा म्हणाला "नाही". मी नुकतीच एका प्रोजेक्ट मध्ये investment केली आहे. ठीक आहे बरं मग १० लाख तरी दे, मामा बोलला," नाही ते शक्य नाही. "बर मग ५० हजार तरी," मामा बोलला," नाही शक्य नाही," मग तो बोलला मामा ५ हजार तरी देरे. मामा बोलला "नाही ते शक्य नाही. "तेवढ्यात मामाची मुलगी जिला काहीच माहित नव्हते कि या दोघांमध्ये काय संभाषण चालू आहे ,ती आली आणि बोलली "दादा हा बघा डायमंड नेकलेस आजच घेतला ११ लाखांचा."
तेव्हा बापू त्या मित्राला म्हणाले . "बघितलंस, तुझ्या घरात पैसे आहेत माघारी देऊ शकतोस म्हणून मामाने त्या वेळी तुला मदत केली आणि आता तुला द्यायला त्याच्या कडे ५ हजार पण नाही आहेत. " ही जगाची नीती  आहे."
आपण माणसाला ओळखत नाही त्या वेळी भगवंत हवा असतो. आपली कितीही चांगली मैत्रीण असली तरी देखील आपल्या माघारी ती आपल्याला नावेच ठेवत असते. कितीही चांगला मित्र असला आणि जर दोघांना हि एकच मुलगी आवडली तर त्यांच्यामध्ये भांडण होतेच.. ते वाली सुग्रीव बनतात. "सर्व नात्यांना संदर्भ असतो, संदर्भ बदलला कि सगळं बदलतं". असे का ? असे प्रश्न जीवनभर पडतच असतात.
कोणाच्या मनात नेहमी येते मी माझ्या सासुचं सगळं केलं पण माझी सून काही करत नाही... यात चूक कुणाची?
एक चोरी करतो तर दुसरा लुटला जातो - चूक कुणाची? या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत आणि मिळालीच तर त्या प्रमाणे वागता येत नाही. आम्हाला 'नाही' म्हणता येत नाही. आपल्याला जमत नाही - भिडेपोटी ते आपल्याला जमत नाही. आपल्याला स्वतःला पण 'नाही' म्हणता येत नाही.
डॉक्टर ने सांगितले आहे वजन कमी करा, समोर मोदक दिसत आहेत गणपती २१ मोदक खातो तर आम्ही ४२ खातो.  चुकीच्या व्यक्तीला आपल्याला नाही म्हणता येत नाही आणि त्यामुळे आपल्यावर संकट ओढवते. हे कुठून येते तर आतून येते , आत्मविश्वास आतून येतो. "आत्मविश्वास" का कमी पडत आहे? 
या प्रश्नाचे उत्तर त्या प्रश्नातच आहे. प्रश्न जिथे उत्पन्न होतात तिथेच त्याचे उत्तर असते...बरयाच वेळा लोक विचारतात ," आत्मविश्वास कशाने वाढतो ?" तर "पैशाने"...
पण काही वेळा पैशाने देखील तो वाढत नाही.  एका भगवंताशिवाय याची guaranty कोणीच देत नाही. आत्मविश्वास money, youth, masti मधून येत नाही. आमचा आत्मविश्वास वाढत नाही.. वाढणं म्हणजे काय?
"आत्म-विश्वास" म्हणजे स्वतःचा स्वतःच्या आत्म्यावरचा विश्वास, माझ्या मधील 'मी'- आत्मा - म्हणजेच देह जो मेला तरी माझ्या बरोबर येतो तो. म्हणजेच परमात्म्याचा अतिशय लहानसा अंश. जसे समुद्रातील एका थेंबामध्ये अख्या समुद्राचे गुणधर्म असतात तसेच . समजा त्या समुद्रातील ग्लासभर किंवा विहीरभर पाणी काढून घेतलं व त्यातील सर्व क्षार/ सत्व काढून घेतलं तर ते समुद्राचे पाणी समुद्राचे उरतच नाही. त्याच प्रमाणे आत्मा जरी परमात्म्याचा अंश असला तरी ज्या काही गोष्टी, कृत्य, संस्कार (चुकीच्या) आपण त्या वर करतो त्यामुळे तो परमात्म्याचा उरतच नाही.
ज्या वेळी आपला परमेश्वरावरचा विश्वास वाढतो त्यावेळी आपला आत्मविश्वास वाढतो. लोक म्हणतात कि तो नास्तिक आहे त्याच्या कडे खूप आत्मविश्वास आहे.
समजा एखाद्या नास्तीकाने आपल्या आईकडे पैसे मागितले २० च्याऐवजी ४० दे असे तो म्हणाला आई नाही देऊ शकली म्हणून आईच्या कानफडात मारली. काही चुकले म्हणून मास्तर छडी घेऊन मारायला लागला आणि त्याने दुसर्या छडीने मास्तरला फोडून काढले. ह्याला आत्मविश्वास म्हणतात का ? मुळीच नाही.
"आत्मविश्वास म्हणजे माझी स्वतःची उन्नती करण्यासाठी लागणारी शक्ती- मनाचे सामर्थ्य.. मन:सामर्थ्य... तुम्ही श्रीगुरुक्षेत्रमला आला आहात का कधी?
तिथे एका बाजूला अनसूया माता आहे कि जी तिच्या तीन बाळांचे लाड करत आहे आणि तिच्याच बाजूला हि महिषासुरमर्दिनी-महाकाली उभी आहे. या दोघी एकच आहेत, हे कसे पटणार? त्या एकच कशा काय ? उदा. - एक आई बाळाला दुध पाजत बसली आहे म्हणजेच - अनसूया रूप - "माझ्या सोनुल्या रे " आणि त्याच वेळी शत्रू आला आणि तो तुमच्या (आईच्या) बाळाला जीवे मारण्यासाठी आला आहे तर ती हातात भेटेल त्या वस्तूने त्या शत्रूचे मस्तक फोडून टाकेल.. तेच ते महाकालीचे स्वरूप . त्यामुळे आईच्या या रुपाला घाबरायची काहीच गरज नाही. नको त्या समजुती करून घेऊ नका. तुम्ही देवी शप्तसती, दुर्गापाठ, त्रिपुरा रहस्य हे बघा त्यात सुद्धा तेच सांगितले आहे.
जर मी देवीची भक्ती करते/ करतो तर तिची सर्व रुपं मला सहाय्य करणारच.. आज काल सर्व जण bodyguard ठेवतात. मग विचार करा साक्षात महाकाली जर माझी bodyguard , mindguard , संपत्तीguard , धनाचा-कीर्तीचा guard असेल तरत्या साठी त्या परमेश्वरीची भक्ती करा. पहिलं भगवंताला घाबरा, घाबरा म्हणजे घाबरून जाऊ नका, त्याचा धाक ठेवा.

बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा ते लाथ मारत, म्हणून ती चिडत नाही उलट ती सुखावते कि माझं बाळ हालचाल करतंय, उलट ती हालचाल बंद झाली तर ती घाबरते कि माझ्या बाळाला काही झालं तर नसेल ना.. विचार करा जर सामान्य आईची हि क्षमा - तर त्या जगदंबेची काय क्षमा - माया असेल. बाळ आईच्या पोटात शी-सु करत तरी देखील ती बाळाला अन्नच देते विष देत नाही.
एवढाच काय तर जी नाळ असते म्हणजेच ज्याने आई आणि बाळ जोडले गेलेले असतात, त्यातूनच प्राणवायू अन्न सगळं काही बाळाकडे जातं पण म्हणून cancer / T.B. / Breast cancer बाळाला होत नाही. एवढ चांगल कवच आई आपल्या बाळाला देत असते...(This is scientifically proven)  कधीही कितीही  मोठ संकट आले तरी एक लक्षात ठेवा "आहे माझा देव माझ्या पाठीशी".. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा...
"माझ्यावर कितीही  संकट आलीकितीही मोठी संकट आली.. हिमालय एवढी तरी माझा देव माझ्या संकटानपेक्षाही मोठा आहे." मी जरी रस्त्यावर आलोसर्वांनी माझ्यावर नको नको ते आरोप केलेगुन्हेदाखल केले तरी मला घाबरायचं नाही कारण जर मी माझ्या देवच नाव घेतो तर माझा देव माझ्या चारही बाजूनी असणारच... हाच 'आत्मविश्वास"....
आणि या गोष्टीची साक्ष माझी (प. पू. बापू) आई - महिषासुरमर्दिनी आहे.. रोजच्या काळज्या मिटवायच्या  असतील तर हा आत्मविश्वास हवाच.
जे नवरा बायको भांडत नाहीत ते नवरा बायको नसतातच. लग्नाच्या आधी वाजंत्री का वाजवतात? तर ते आधीच सावधान करत असतात, की बघ बाबा लग्नानंतर सगळं असच असणार आहे. पती-पत्नीच्या भांडणात एक गोडवा असायला हवा म्हणजेच ते कारणाशिवाय सुरु झाले पाहिजे आणि कारणाशिवाय संपले पाहिजे. त्यात चूक कोण? बरोबर कोण? कशाला हवं? कुणीही सॉरी बोलले तर काय बिघडतं?
"FAMILY WHICH PRAYS TOGETHER STAYS TOGETHER."

आजकाल कोणी एकत्र पार्थना करत नाही, मूल परीक्षेला जाताना त्याच्या पेनाला उदी लावावी ,त्याला उदी लावायला द्यावी, जाताना हातावर दहीसाखर ठेवायची हि पद्धत आता हळू हळू मोडत चालली आहे. आज काल पेपरला जाताना बाय बाय टाटा... एव्हढेच म्हणतात.नवीन काळानुसार fashion  करावी. पण परीक्षेला/ प्रवासाला जाताना दहीसाखर देण्याची पद्धत मोडली आहे. परीक्षेला जाताना आई वडिलांना नमस्कार करावा, जेवताना "वदनी कवळ घेता..." म्हणावे. परीक्षेला पण त्याचीच आवशक्यता खूप असते. त्यामुळे मोठा फरक पडतो. नामस्मरणा मध्ये जास्त शक्ती आहे.
सायन्स देखील आज मान्य करते कि या विश्वाच्या सुरुवातीला मोठा स्फोट झाला त्यातून ध्वनी, कंपने आणि प्रकाशाची निर्मिती झाली. त्यांच्या मिश्रणातूनच विश्व निर्माण झाले. प्रकाश आणि ध्वनी यांचे रिलेशन आहे. कंपने तर आहेतच. (बरोबर प्रोटोन, न्युट्रोन, इलेक्ट्रोन) परमेश्वराच्या नामाची उत्पत्ती ऋषींनी प्रगटवलेली आहेत. नाम म्हणजे त्या त्या भगवंताची जीवनात बदल घडवून आणण्याची शक्ती- नामस्मरण केले पाहिजे-  का? 
एकच नाम एव्हढं सगळं कसं करणार? प्रत्येकासाठी (प्रत्येक गोष्टीसाठी) वेगळा देव...... आपण कित्येकदा म्हणतो.. ३३ कोटी देव - पण कोटी म्हणजे 'क्लास' - ३३ प्रकारच्या दैवी शक्ती आहेत. तर यात आपण confuse असतो कि हा देव कि तो देव? कसं कळणार.?
उदा. - Electricity A.C. मध्ये पण जाते आणि फ्रीज मध्ये पण... A.C. मध्ये ती हवा गार करते तर फ्रीजमध्ये पाणी थंड करते. हिटर मध्ये तेच पाणी गरम करते, ROOM WARMER मध्ये तीच हवा गरम करते. म्हणजेच काय ELECTRICITY एकच पण त्या त्या मशीन मध्ये जाते आणि तसं तसं उत्पन्न बाहेर येते. त्याचप्रमाणे महाप्राण हा देखील एकच असतो पण वेगवेगळ्या इंद्रियांमध्ये वेगवेगळे काम करत असतो. त्यामुळे एकच नाम विविध समस्यांवर उपयुक्त असते.
"एक विश्वास असावा पुरता..."आपल्या विश्वासाच्या प्रमाणातच आपल्याला फळ मिळत असते.म्हणून काही दिवसभर देव देव करत बसायचे का? मुळीच नाही, संन्यासी वगेरे व्हायचे का? त्याला हेच हवे असते तर त्याने नर मादी असा फरक ठेवलाच नसता.  भगवंताची आपण आनंदात राहावे अशीच इच्छा असते .
जीवनातल्या प्रत्येक समस्येकडे CHALLENGE म्हणून बघा. हि गोष्ट भगवंताने आपल्या चांगल्यासाठीच घडविली आहे असा विश्वास असू द्या. गोष्ट लहान असो कि मोठी देवाला विसरायचे नाही. म्हणू देव देव करायचे का? देव कोपला तर?
२४ तासातील २४ मिनिटे देवाला द्यावी.२४ मिनिटे म्हणजे १ घटिका. आणि जो ३ घटिका देतो त्याला कुठलेही दु:ख उरत नाही. २४ मिनिटे नीट द्या जास्त मोठ्या मोठ्या गोष्टींची आवश्यकता नाही.
मला (प.पू.बापू) जादू येत नाही. जो लोकांसमोर चमत्कार करतो त्याला प्रसिद्धी हवी असते. जो खरा "सद्गुरू" असेल त्याला लोकांच्या मनाप्रमाणे वागायची गरज नसते . १०० ग्रम कष्टाची गोष्ट आज आपल्याला १ ग्रम कष्टामध्ये हवी असते.
चमत्कार घडवायचं सामर्थ्य स्वतःमध्येच आहे आणि जर तुमच्या जीवनात तुम्ही "सद्गुरू तत्वावर" खरं खुरं प्रेम कराल तेव्हाच हे POSSIBLE (शक्य) आहे.
तुम्ही म्हणाल बापू आम्ही एवढ्या चुका केल्या, पाप केली ? मग काय झालं ? आम्ही वाल्या कोळी एवढे पापी आहोत का? त्याने २९ वर्षे दररोज १० खून आणि ३ बलत्कार केले, एवढे पाप करूनही जर वाल्या कोळ्याच्या मागे भगवंत/ सद्गुरू तत्व नारद रूपाने उभे राहिले तर आमच्या का नाही राहणार ?
"अनिरुद्ध" आमचा आहे. स्वतःला तुच्छ समजायचं थांबवा. काहीही झाल तरी मी माझ्या "बापूचा" आहे.मी (प. पू. बापू) त्याच्यापाठ्चा हलत नाही. त्याच्या १०० चुका मी माफ करतोच, पार्शलिटी करतोच, आणि हे सांगताना मला (प पू. बापू) आधीही लाज वाटली नाही, आताही वाटत नाही आणि कधी वाटणारही नाही. तुमची जी जात आहे तीच माझी (प पू. बापू) जात आहे .
माझा धंदा एकच - "लढायचंय जा तू जीपमध्ये बस मी जीप चालवतो" मी पुढे असेन आणि माझा स्पीड प्रचंड आहे."

 साई चरित्र मध्ये सांगितले आहे .."मी पापी अभागी दैवहीन, या वृत्तीची खाण अविद्या..."  माझे नशीबच फुटक, पाहिजे ते मला मिळत नाही. असा दोष का देता? हि गोष्ट परमेश्वराला आवडत नाही. देवाला ते संमत नाही परमेश्वराची भक्ती करणाऱ्या भाक्तामाढेच शक्ती आहे. आता मी (प पू. बापू) काही प्रश्न विचारेन त्या प्रश्नांची उत्तर द्या..
शिवाजी महाराजांनी एवड्या मुसलमानांना लढा दिला ते माझ्या (प पू. बापू) आईचे निस्सीम भक्त होते...ते दुबळे होते का?

सुभाषचंद्र बोस - आईच्या महाकाली रूपाचे भक्त होते- ते दुबळे होते का?

लोकमान्य टिळक- ज्यांनी सरकारची अक्कल ठिकाणावर आहे का? असा प्रश्न इंग्रज सरकारला केला ते गणपतीचे भक्त होते - ते दुबळे होते का?

म. गांधी - ज्यांनी दांडीयात्रा केली ते रामनामाचे निस्सीम भक्त होते - ते दुबळे होते का?

महाराणा प्रताप - शिवाचे भक्त होते-ते दुबळे होते का ? बुद्धिमत्तेचा उच्चांक ALBERT EINSTAIN रोज बायबल वाचल्याशिवाय झोपत नसे-ते दुबळे होते का ? देवाची भक्ती करणारे हे दुबळ्या मनाचे नसून शूर वीर आहेत.
हिटलर हा नास्तिक होता त्याने स्वतःची पण वाट लावली आणि देशाची पण वाट लावली. भक्ती करताना भीती बाळगू नका.  दिवा विझला, चुकून देवाला पाय लागला तर भगवंत चिडणार नाही. 
भक्ती भीती दूर करण्यासाठी करा.चांगल्या मार्गाने'  जीवनाचा उपभोग घ्या. हे कलियुग आहे चुका या होणारच. म्हणूनच १० चांगल्या गोष्टी करा. म्हणूनच सेवा कार्यात भाग घ्यायचा, भक्ती करायची....
१८ वर्षांपूर्वी एक नवरा बायकोचे जोडपे त्याच्या ८ वर्षाचा मुलगा आणि १० वर्षांची मुलगी यांना घेऊन फिरायला निघाले त्या बाईने रस्त्यात खाण्यासाठी पुरी आणि बटाट्याची भाजी घेतली होती, ती भाजी खायला निघाली तर ती आंबलेली तिने ती मुलांना नाही दिली मुलांना दुसरे खायला देऊन तिने ती पुरी भाजी एका गरीब माणसाला न तिच्या मुलाला दिली आणि ते मुंबईला आले.
त्या दिवसापासून तिच्या आयुष्यात फक्त दु:ख आणि दु:खच झाले. कारण झाले असे कि तिने ज्या गरीब माणसाला पुरी भाजी दिली ते लोक आधी ३ दिवस जेवले नव्हते आणि त्यांनी ती आंबलेली भाजी खाल्ली त्यामुळे त्यांना जुलाब सुरु झाले आणि डॉक्टर कडे नेईपर्यंत ते दोघेही मेले. त्या बरोबर घरातील ५ स्त्रिया आणि ४ महिन्यांचे मुल उघडे पडले. त्या ५ बायकांनी अक्षरशः भिक मागून त्या मुलाला मोठे केले. त्याच वेळी या बाईला पण इकडे तिकडे ५-१० रुपये मागून पोट भरावे लागत होते. नंतर ते ४ महिन्याचं मुल १८ वर्षांचे झाले आणि तो कमवू लागला तेव्हा त्या बाईचा संसार सुरळीत चालू लागला.तर तात्पर्य काय त्या बाईने तिच्या मुलांना खाण्यास योग्य नाही असे अन्न त्यांना दान केले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.... जे तिने करायला नको होते.
म्हणूनच आपण अशा नकळत होणार्या चुकांपासून दूर राहण्यासाठी नेहमी भगवंताच्या चरणांशी रत असले पाहिजे. मला (प पू. बापू)  सर्वच जण नेहमी प्रश्न विचारतात "बापू, तुम्ही कधीच काहीही घेत नाही " इथे तुम्ही काय देऊ शकता तर ?
जर माझ्या वर खरंखुरं प्रेम करत असाल तर त्या प्रमाणात मला तुमचं पाप द्या." त्या भगवंताला कधीही विसरू नका." "दत्तगुरू आणि माझ्या आईशिवाय काहीही अस्तित्वात नाही..." 

                                                         ||हरी ॐ||
Special Shreeram To Nainaveera Shelar For taking Pravchan's Notes