Subscribe:

Saturday, September 17, 2011

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१५.०९.२०११)


!! हरि ॐ!!

    ॐ मंत्राय नम: मध्ये श्रीगुरुक्षेत्रम्‌ मंत्र आपण बघत आहोत. ह्यात सर्वबाधाप्रशमनं म्हणजे काय ते बघितले. आता सर्व पापप्रशमनं व सर्वकोपप्रशमनं ही पुढची दोन पदे आहेत.
    पाप शद्ब आपण लहानपणापासून ऐकतो, ह्याची व्याख्या प्रत्येक ग्रंथात, पुस्तकात वेगवेगळी दिलेली आहे. आम्हांला पाप म्हणजे काय? हे कळत नाही, असं म्हणणारा मनुष्य नक्कीच खोटं बोलतो असे समजावे. कारण, मागे मी (परमपूज्य बापू) सांगितले होते की, ज्याला अन्न व मल ह्यातला फरक कळतो, त्याला पाप व पुण्यातला फरक नक्कीच कळतो. सर्वसामान्य मनुष्य पाप करण्याचा प्रयास कधी करत नाही, त्याची इच्छा असते नेहमी चांगलं करण्याची.
    मराठीत एक म्हण आहे, ‘वडाच्या पूजनाला निघाली आणी येड्याबरोबर पळाली’ म्हणजे काय? तर पतिव्रता बनायला गेली आणि व्यभिचारी झाली. असंच सामान्य माणसाचे होत असते. चांगल बनण्याचा प्रयास करताना नेमकं नको ते घडते.
    नको तेव्हा नको ते केलं असं घडल्यावर मनुष्य कितीही ज्ञानी असला तरी त्याच्या मनात गोंधळ तयार होतो. पूर्वी मुंबईच्या रस्त्यावर रात्री ९ नंतर फिरणारे कुणी नसायचे, आणि आता मुंबई रात्रीचीच जास्त जागी असते. आता तर पुण्यातसुद्धा हिच प्रथा सुरु झाली आहे. हे सगळे बदल कसे घडले?
    इथे बर्‍याच जणांना माहित असेल, ४ ऑक्टोबर १९९९ ला जुईनगरला जेव्हा भूमीपूजन केलं तेव्हा आजूबाजूला शेतं होती स्टेशनवरुन थेट आपली बिल्डिंग दिसायची. २००० च्या मे पासून हळूहळू चित्र बदलले, आता आजूबाजूला सगळ्याच बिल्डिंग झाल्या आहेत. हे झालेले बदल आपण सगळ्यांनी पचवले आपल्या जीवनातले देखील असेच अनेक बदल आपण पचवत असतो.
    हल्ली फास्ट फूडच्या नावाखाली चायनीज खाणार्‍यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, आमच्या मेडिकल बूक्समध्ये  चायनीज फुड सिड्रोम हा विषय आहे. चायनीज बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पदार्थांमध्ये मेंदूला irritate करणारी द्रव्ये असतात. तरी आम्ही ते आवडीने खातो. घरात पोळी भाजी करताना बायकोचे हात दुखतात. आज आम्हाला घरी जेवण बनवायला लाज वाटते.
    बर्‍याचशा पालकांची तक्रार असते की मुलं ऐकत नाहीत. पण ह्यात खरं तर आईबाबांची चूक असते. मुलांना हल्ली आई-वडिल कायम protection मध्ये वाढवतात. जे जे मागेल ते ते आणून देतात त्यामुळे मोठेपणी ह्या मुलांना कुठलीही जबाबदारी टाकली की ते संकट वाटते.
    लग्न ठरवताना मुलीची आई सांगते, ‘मुलीला जेवण बनवता येत नाही’ ह्यात त्या आईचीच चूक आहे. कारण तिने कधी मुलीला शिकवलेलेच नसते. स्त्री पुरुष कितीही समानता असली तरी स्त्रीने तिचे आईपण जपलेच पाहिजे.
    हल्लीच्या मुलांना घर साफ करणे, घरातल्या बिघडलेल्या गोष्टींची रिपेअरी करणे ही कामे माहितच नसतात. एखादा दिवस बायको आजारी असेल तर जेवण बनवायची नवर्‍यांना लाज वाटते.
    आई वडिल मुलांना लहानपणापासून मागेल ते देतात, त्यामुळे त्यांना ‘नाही’ ऐकायची सवय नसते म्हणून ही मुलं मोठेपणी agressive होतात. घरात मुलांसमोर जर नवरा-बायको भांडत असतील तर मुलांवर काय संस्कार होणार? भांडण असावं नवरा-बायकोमध्ये पण ते मुलांसमोर कधीच करु नका.
    घरात निर्णय घेताना आई-वडिलांनी एकमेकांशी विचार-विनिमय जरुर करावा. मुलांना आईच्या नजरेचा धाक असायलाच हवा तसेच ‘बाबांना सांगू का?’ असं म्हटल्यावर जी मुलं सळसळा कापतात, ती मुलं कधीच बिघडत नाहीत.
    स्त्रीने सासू-सासर्‍यांशी कितीही पटत नसेल तरी ते मुलांसमोर कधीही बोलू नका हल्ली स्त्रिया नवर्‍याला सगळ्यांसमोर काहीही बोलतात. हे ही पूर्णपणे चूक आहे.
    family prays together, stays together  जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते, ते नेहमी एकत्र राहते.दिवसातून एकदा तरी थोडावेळ का होईना सर्व कुटुंबाने एकत्र प्रार्थना करायला हवी. हल्ली privacy च्या नावाखाली सगळं हातच राखून असते.
    आजच्या काळात लग्नात बघा, जेवणाच्या वेळात सगळी मंडळी येतात. अक्षता टाकल्या की सगळे जेवणाकडे धुम ठोकतात. तसेच तिरडीवर ठेवताना पण हल्ली पाच माणसं पण येत नाहीत. एवढी आमची माणुसकी आज मेली आहे.
    स्त्रियांच्या झिम्मा-फुगडीच्या खेळात एक गाणं आहे, ‘गरे बाई गरे, फणसाचे गरे, खाईल त्याची म्हातारी मरे, मेली तर मेली कटकट गेली, उद्या मरायची ती आजच मरे’ बघा, खेळातल्या गाण्यात म्हातारीच्या मरणाची इच्छा असं का?
    कुटुंबात वयस्कर व्यक्ती असणं खूप आवश्यक असतं. भारताला एकत्र कुटुंबपद्धती मुळेच बळ प्राप्त झाले आहे. पूर्वी संस्थानांचे एकत्र विलिनीकरण केल्याने भारत तयार झाला. म्हणून ह्याला आधी भारतवर्ष (हिंदुस्थान) म्हटले जायचे. ह्याच मातीत तुम्ही जन्मल्यामुळे तेच भारतमातेचे genes तुमच्यात आहेत.
    म्हणून कितीही पापे तुमच्याकडून घडली तरी तुम्हांला मार्ग मिळू शकतो. तुम्ही टिकून राहू शकता बाकीच्यांचे मला माहित नाही. त्यामुळे बाकीच्यांची मी (परमपूज्य बापू) गॅरंटी देऊ शकत नाही.
    जो माझ्यावर (परमपूज्य बापू) प्रेम करतो, त्याची मी काळजी घेतो. भारताची जी ही २५०० वर्षाची genes आहेत ती तुम्हां प्रत्येकात आहेत व ही genes (गुणसुत्रे) तुमच्यात कशी वाढवायची हे arrange करणारा मी कॅटरर आहे. मी डॉक्टरकी करतो, रोगांवर उपचार करतो, म्हणजे मी डॉक्टर आहे, मी नवीन गोष्टी घडवतो, construction  घडवतो म्हणजे मी इंजिनीअरही आहे. कॅटररही आहे, तुम्ही केलेला कचरा मी साफ करतो म्हणजे मी भंगीही आहे. तुमची पापं धुण्याचं मी काम करतो म्हणजे मी धोबीपण आहे. मी बलविद्या शिकवतो म्हणजे मी शिक्षकही आहे. किर्तनरंगात मी नाटके, नृत्ये ह्यांचे दिग्दर्शन केले होते, म्हणजे मी डायरेक्टर पण आहे.
    ह्यासोबत मी सगळीकडे फिरत असतो. तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या घरात मी फिरतो, म्हणजे मी भटक्यापण आहे. म्हणजे मी (परमपूज्य बापू) किती धंदे करतो बघा!
    ह्यासोबत मी उत्तम शिकारसुद्धा करतो. मला शिकार करायची असेल तर मी फक्त मि.किरातरुद्रांना सांगतो, ते शिकारी आहेत. त्यांच्याकडून मीही शिकलो. माझा नेम अगदी अचूक आहे. आपल्याकडे म्हण आहे, १२ गावचं पाणी प्यायला आहे. पण मी (परमपूज्य बापू) १२ लाखं गावचं पाणी प्यायलो आहे.
    तुमच्या भौतिक, मनोमय देहाची मी काळजी घेतो. जर तुम्ही माझ्यावर खरोखर प्रेम करता, तर एकच कृपा करा, ते म्हणजे, ‘चिंता करायची सोडून द्या.’ तुम्ही एवढ्या कायम चिंता करता की, बापरे बाप!    ‘तुम्ही काळजी करायचं सोडून द्या, त्याऐवजी काळजी घ्या.’
    तुमच्या सततच्या चिंता करण्यामुळे ज्याची तुम्ही चिंता करता त्याची मूर्ती तुमच्या मनात कोरली जाते. त्यामुळे ‘भक्ति-भावापासून’ दूर जाता. म्हणून एवढचं कायम लक्षात ठेवा. ‘माझा बापू आहे....आहेच’.
    आजपासून एक वाक्य कायम मनात ठेवा, ‘‘आमचा बापू हळूहळू आमच्यासाठी सगळं काही नीट करत आहे.” हे नुसतं वाक्य नाही, हा बापूचा मंत्र आहे हे लक्षात ठेवा. ह्यातले हळूहळू म्हणजे जाच्यासाठी जो speed  आवश्यक आहे, तो speed.
    हे वाक्य आजपासून मनापासून चिंतन करा. तुमच्या सगळ्या चिंता आपोआप दूर होतील तुम्ही हे वाक्य विसरलात तर माझ्या (परमपूज्य बापू) डोक्याला चिंता वाढतात. 
    मला द्यायचं असेल तर तुमचं पाप द्या, त्याबदल्यात तुम्हांला कधीच दुप्पट पाप मिळणार नाही.

"एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरु ऐसा"

    माझं काम सोपं व्हावं म्हणून मी तुम्हांला सांगतोय. हे वाक्य (बापूमंत्र) प्रत्येकजण आपापल्या भाषेत म्हणू शकतात. पण माझ्यावर (परमपूज्य बापू) प्रेम करणार्‍या प्रत्येकाच्या मनात हे वाक्य (बापूमंत्र) रुजलं पाहिजे. हे वाक्य म्हणजे बीज आहे, ह्याचा मनात वृक्ष व्हायला पाहिजे.
    हे वाक्य म्हणजेच बापूंचा खरा मंत्र आहे. चण्डिकाकुलाची व्याख्या तुम्हांला प्रत्यक्षमधून सांगितली. गुरुक्षेत्रम्‌चा लाभ जास्तीत जास्त घ्या. तिथे दर्शन घ्या, अर्पण करा. गुरुक्षेत्रम्‌ ही अशी जागा आहे की कुठल्याही श्रद्धावानाने केलेली प्रार्थना ही त्या षटकोनात येते व त्या त्या भक्ताच्या प्रारब्धानुसार चण्डिकाकुल कार्यरत होते म्हणून गुरुक्षेत्रम्‌शी नातं जास्तीत जास्त जवळ घट्ट करा. हा बापूंचा मंत्र जास्तीत जास्त जवळ केला तर, तुमच्या चिंतेलाच चिंता करावी लागेल.

!! हरि ॐ !!
 प्रवचनानंतर परमपूज्य बापूंनी एक सूचना केली -
    आपण इथे ‘रामोराजमणि’ म्हणतो, त्यात बर्‍याच जणांकडून ‘भझे’ म्हटले जाते. ते ‘भझे’ नाही तर ‘भजे’ आहे. चुकून चूक झाली तर काही पाप लागत नाही पण ह्यापुढे म्हणताना लक्षात ठेवायचे ‘रामं रमेशं भजे’.
!! हरि ॐ!!

0 comments:

Post a Comment