Subscribe:

Friday, April 20, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१९.०४.२०१२)


हरी ॐ
  
 
गुरुक्षेत्रम मंत्र गेल्या ७ दिवसात किती जणांनी किती वेळा म्हटला मला माहीत नाही. मी तुम्हांला सांगितले होते count ठेवू नका.

परंतु आपली सृष्टीच अशी आहे की ह्यात प्रत्येक गोष्टीचे एक account ठेवायची व्यवस्था आहे.

आज scientist सांगतात की अमुक अमुक वर्षापुर्वी असे असे झाले. म्हणजे काळाचे count कुठेतरी ठेवले जाते. पुर्वी हा count ओळखता यायचा नाही पण आता हा count मानव ठेवू शकतो. कुठलाही count ठेवायला ते मापणारी यंत्रे असावी लागतात.

आपल्याला माहीत आहे पृथ्वी, सुर्य युगानुयुगे सृष्टीत फिरत आहेत. मग त्यांचा speed कुठे कमी झाला का की वाढला का? नाही. ह्याचाच अर्थ  ह्या सृष्टीच्या अंर्तगत अशी काही यंत्रणा असली पाहिजे की घडणार्‍या घटनांचा count आपोआप ठेवला जातो चा speed राखणारी कुठली तरी यंत्रणा असणार.म्हणजेच सृष्टीत घडणार्‍या गोष्टींचा count ठेवण्य़ाची यंत्रणा आपोआपच घडत असते.

मग मानव म्हणुन आम्ही नेहमी करत असलेल्या गोष्टींचा count आम्ही ठेवतो का? कुणीतरी एक चित्रगुप्त असतो असे म्हणतात जो तुमच्या सगळ्या गोष्टींचा count ठेवतो... मला (प.पू.बापू) माहीत नाही.

दुसरा आहे तो यमराज.. तो मलाच पाहुन घाबरेल म्हणेल, हा कोण दुसरा रेडा आला. ह्यातील गंमतीचा भाग सोडुन द्या.
    
आपण घरी नेहमी account ठेवतो अमुक एक बिल भरले, एव्हढे पैसे दिले. देवाचा जप केला तो ही जपमाळेने मोजता येतो आता त्याचेही counter आले आहेत, त्यामुळे आपण count करु शकतो. पण आजच्या दिवसात माझ्या मनात किती विचार आले ह्याचा count ठेवता येतो का? मी दिवभरात किती बोललो ह्याचा count ठेवू शकतो का? मग माझे हे विचार, हे शब्द असेच विरुन जात असतात का? तर नाही.

आज physics आपल्याला सांगते की mass व energy ह्यांचे प्रमाण constant आहे.

म्हणजे जर आम्ही बोलतो हा एक पदार्थ आहे तर त्याचे कुठल्यातरी शक्तीत रुपांतर होतच असणार. कुठलीही गोष्ट नाश पावत नाही मग आमचे  विचार, आमचे शब्द नाश पावत असतात का? नाही.

आमचे कुठलेही विचार, कुठलेही शब्द नाश पावत नसतात.

लक्षात घ्या, एक मनुष्य A म्हणुन जन्माला आला आहे, तेव्हा त्याने जे विचार केले तो जे बोलला ते सर्व तोच मनुष्य जेव्हा B म्हणुन जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याने आधी A म्हणुन जे काही विचार केले आहेत ते त्याच्या पर्यंत येतात व पुढे तोच मनुष्य जेव्हा C म्हणुन जन्माला येतो तेव्हा त्याने आधी A म्हणुन व B म्हणुन जे काही विचार केले आहेत जे काही बोलला ते सर्व शब्द प्रत्येक वेळी त्याच्या जन्माच्या क्षणापासुन त्याच्या कडे यायला बघतात. म्हणजेच हे सर्व विचार व शब्द हे त्याच्या space(अवकाशात) मध्येच असतात.

मग हे शब्द व विचार मनुष्याकडे कसे येतात तर त्याच्या वयाची जी अवस्था असते त्यानुसार. म्हणजेच A नावाचा मनुष्य ५ व्या वर्षी जे काही बोलला जे काही त्याने विचार केले ते सर्व तोच जेव्हा B म्हणुन जन्माला येतो तेव्हा त्याच्या वयाच्या ५ व्या वर्षी त्याच्याकडे येतात. हाच मनुष्य जेव्हा C म्हणुन जन्माला येतो तेव्हा A म्हणुन ५ व्या वर्षी त्याने केलेले विचार,शब्द व B  म्हणुन ५ व्या वर्षी त्याने केलेले विचार व शब्द हे C च्या वयाच्या ५ व्या वर्षी त्याच्याकडे येत असतात.
  
आजपर्यंत इथे प्रत्येकाचे किमान ३७२ जन्म झाले आहेत म्हणजेच प्रत्येक क्षणी एकाच वेळी ३७२ जन्माचे विचार व शब्द आमच्याकडे येत असतात. आम्ही नेहमी confusion मध्ये का असतो? मनुष्य एव्हढा परावलंबी का बनतो? कारण प्रत्येक क्षणी आधीच्या जन्माच्या त्या क्षणाचे विचार व शब्द तुमच्यावर येऊन आदळत असतात. त्यामुळे आम्हांला कुठलाही निर्णय confidently घेता येत नाही. मनात सदैव आमच्या द्विधा मन: स्थिती असते.
 
समजा एखाद्या मुलाला arrange marrigae करायचे आहे व एकाच दिवशी ३० मुलीं मध्ये त्याला एकच मुलगी निवडायची आहे व सगळयाजणी गुणांमध्ये व दिसण्यामध्ये similar आहेत मग निवड कशी करणार ?

प्रत्येकी विषयी विचार करताना त्यातील एकच निवडताना confusion होणार, इथे ३० ही जणी निवडायच्या असतील तर प्रश्न नाही. बरेच जण इथे मनापासुन हसताना दिसताहेत.

पुर्वीच्या काळी राजकुमारींसाठी स्वयंवर असायचे, तेव्हा एक "पण"(अट) ठेवला जायचा तो "पण" जो जिंकेल त्याच्याशी राजकुमारीचे लग्न होत असे.

आपल्याला ही आपल्या जीवनात असे स्वयंवर करता आले पाहीजे, ह्याचा अर्थ हा नाही की उद्यापासुन तुम्ही राजकुमारी-राजकुमारांसारखे वेष घालुन फिरा, शब्दश: अर्थ घ्यायचा नाही त्याच्या मागचा अर्थ/concept इथे आपल्याला समजायला हवा.

लक्षात घ्या आपला निर्णय हे स्वयंवर आहे व आपल्या  मनातील असंख्य विचार हे राजे आहेत. अश्या स्वंयवरासाठी एक "पण" ठेवला आहे तर त्यातील एक राजा तो "पण" जिंकणार. ह्यासाठी "पण" हा उचित असला पाहीजे.

समजा एखाद्याने पण ठेवला की त्याला कॅब्रे डान्स करणारी बायको हवी तर हा पण उचित नाही, इथे पावित्र्य हे प्रमाण नाही.

द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी पण काय होता आठवा. छताकडॆ फिरणार्‍या माश्याच्या डोळ्याचा अचुक वेध पाण्यात प्रतिबिंबाकडे बघुन घ्यायचा होता.

ह्या पणामधुन काय लक्षात येते तर इथे हा स्वयंवराच्या वेळी आमंत्रण फक्त राजांनाच होते. ह्यात भाग घेणारा हा expert धनुर्धर असला पाहिजे, त्याला ज्या गोष्टी दिसत नाहीत त्याचा वेध घेता आला पाहीजे. पाण्यात प्रतिबिंब बघतोय. म्हणजे प्रतिबिंब कसे असते हे त्याला ओळखता आले पाहीजे कारण प्रतिबिंब हे फसवं असते ह्यात प्रतिमा उलटी दिसत असते left चं right दिसतं आणि right चं left. दिसत. अशी व्यक्ती जेव्हढी पाण्याच्या जवळ जाणार तेव्हाढा त्या व्यक्तीचा श्वास पाण्यावर आपटुन पाणी हलेल तरंग उमटतील व प्रतिमा धुसर दिसेल, त्यामुळे पण जिंकणे कठीण जाईल म्हणजेच ह्यासाठी त्याचा श्वासावर control असयला हवा. त्याचे concentration देखील excellent हवे कारण मासा सतत फिरतो आहे म्हणजे त्याला गतीचेही ज्ञान हवे.व त्यानुसार बाणाची व माश्याची गती समजुन त्याला बाण सोडता आला पाहीजे. जो मनुष्य हे करु शकेल तो नक्कीच स्थिरबुद्धी व कर्तबगार असला पाहीजे.

म्हणजे बघा किती गोष्टी ह्या एका पणात द्रौपदीने मांडल्या होत्या म्हणुन तिला अर्जुन मिळाला... The Best.

तुम्हांला आता प्रश्न पडेल की बापू आम्ही आमच्या जीवनात कुठला पण लावायचा? आणि मुख्य म्हणजे पण decide कसा करणार? खरा problem आपला इथेच असतो .

कारण प्रत्येक क्षणी आमच्या वर आधीच्या जन्माचे विचार येऊन आदळणार व त्यामुळे आमचा काहीच निश्चय होऊ शकणार नाही. आणि ह्यातुन माणसाची सुटका नाही... सगळे नाही म्हणताहेत... मग संपले प्रवचन चला घरी जाऊया आता.. बरोबर

लक्षात ठेवा आपण आपले  प्रश्न सोडवायचेच म्हणुन जन्माला आलो आहोत. गुरुक्षेत्रम‍ मंत्रातील हा जो त्रिविक्रम आहे त्याच्या घरात जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्या आधीच्या कुठल्याही जन्मातील कुठलेही विचार किंवा शब्द हे तुमच्यावर येऊन आदळत नाहीत. त्यांचा स्पर्श ही तुम्हांला होऊ शकत नाही.

म्हणजे आता पण करणे अधिक सोपे आहे आम्हांला जास्तीत जास्त वेळ त्रिविक्रम निलयं मध्ये बसता आले पाहीजे .

त्रिविक्रम म्हणजे जो तुमचा भुतकाळ, वर्तमान काळ व भविष्य काळ ह्यांना स्वत:च्या पराक्रमाने काबुत ठेवतो तो. तुमच्या प्राणमय, मनोमय आणि भौतिक देहावर ज्याचा विक्रम चालतो तो. तुमचा आधीच जन्म, आताचा जन्म व पुढचा जन्म ह्या तिन्हीवर कार्य करतो तो त्रिविक्रम. तुमच्या मन, प्राण व प्रज्ञेला ताकद देणारा हा त्रिविक्रम.

हरिहराचं एकरुपत्व म्हणजे त्रिविक्रम. निर्णय शक्ती व निरिक्षण शक्ती ह्याचे एकरुपत्व म्हणजे त्रिविक्रम.

आपण उदाहरण पाहुया. रस्त्याने तुम्ही चालला आहात, वाटेत केळ्याची साल दिसतेय साल समोर दिसताच कळते सालीवर पाय ठेवू नये. निरिक्षण शक्ती आणि निर्णय शक्ती एकरुप झाले की हे घडत.

म्हणजे इथे निर्णय शक्ती हीच निरीक्षण शक्ती बनलेली असते तर निरीक्षण शक्ती हीच निर्णय शक्ती बनते. म्हणजे नक्की  काय? तर हे समजणे फार सोपे आहे. समजा समोर साप दिसला की आपण असे म्हणत बसतो का? की,

१) हा साप आहे २) हा मला चावु शकतो ३) आता तु घाबर ४) व इथुन पळ काढ. नाही तर आपण काय करतो तर साप दिसला रे दिसला की  direct  तिथुन पळतो. जो अनुभवी असेल तो त्याला पुढे काठीने मारेल. हे जे आहे साप दिसल्याबरोबर direct तिथुन पळणे ह्याचा अर्थ इथे निर्णय शक्ती हीच निरीक्षण शक्ती बनते तर निरीक्षण शक्ती हीच निर्णय शक्ती बनते.

असेच दुसरे उदाहरण मित्राच्या घरी गेलात व त्याने दारुची बाटली काढली तर ती बाटली बघितल्याबरोबर साप दिसल्याप्रमाणे तिथुन लगेच बाहेर पडले पाहीजे. म्हणजेच इथे निरीक्षण शक्ती हीच निर्णय शक्ती झाली पाहिजे. जेव्हा असे घडते तेव्हा कधीच घाबरण्याचे कारण उरत नाही.

त्रिविक्रामाच्या घरात राहीले की आपला प्रश्न कसा सुटतो ते आपण पाहीले आता ह्याच्या घरात राहायचे कसे ते पाहुया.

ह्याच्या घरात राहण्यासाठी आधी ह्याचे घर शोधावे लागेल. हा राहतो कुठे हे मला माहीत असले पाहीजे.

ह्याला शोधणार कुठे कारण हा तर स्वत:च भटक्या आहे, हा कधी अंतरिक्षात असतो तर कधी पृथ्वीवर ऋषी सांगतात हा तर चराचरात व्यापुन आहे मग ह्याला शोधणार कसे ?

समजा साईप्रसाद बिल्डिंग, रुम नं१३, शिरगाव असा पत्ता असेल तर ह्यातील रुम नं.,घराचे/बिल्डिंगचे नाव, गावाचे नाव किती ठीकाणी common  असेल. उदा. शिरगाव घेतले तर फक्त महाराष्ट्रात २७ शिरगाव आहेत, त्यात प्रत्येक ठीकाणी साईप्रसाद बिल्डिंग, रुम नं१३ असतील बरोबर.

म्हणजे आले confusion... पत्ता शोधताना ह्या सगळ्या ठीकाणी आपल्याला फिरायला हवे नेहमी अश्यावेळी जे आपल्याला हवे असते ते सगळ्यात शेवटी मिळते. ह्यासाठी त्या पत्त्यावर जो राहतो त्याच्या नावासकट सगळी माहीती असली पाहीजे .

ह्या पत्याच्या ज्या ७ महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व गुरुक्षेत्रम मंत्राच्या .

"ॐ ऎं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चे-त्रिविक्रमनिलयं-श्रीगुरुक्षेत्रम्‌"
 ह्या पदामध्ये आहेत.

१) ॐ - म्हणजेच प्रणव प्राणाचा प्राण. हा प्राणयुक्त मंत्र आहे. चैतन्य युक्त. हा अचेतन, निष्प्राण अपवित्र मंत्र असुच शकत नाही. ह्या मंत्रात पुर्ण पावित्र्य, पुर्ण शुध्दता आहे.

२) ऎं - हे महासरस्वतीचे बीज आहे, तुमच्या प्रज्ञेला बळ देणारी ताकत, स्पंदन, बुद्धीचा विकास म्हणजे ऎं

३) र्‍हीं - हे महालक्ष्मीचे बीज आहे. महालक्ष्मी म्हणजेच मन तुमच्या मनाला सौंदर्य देणारी, त्याचे चित्त बनवणारी, मनाचा सांभाळ करणारी  शक्ती.

४) क्लीं - म्हणजे महाकाली. काळ व्यय करण्याची शक्ती. तुमची संरक्षक शक्ती, काळ उपयोगात आणणारी शक्ती म्हणजे महाकाली... तुमचा सर्वांत.. best body guard. म्हणजेच जेव्हा साक्षात महाकाली तुमची रक्षक बनून फिरत असेल कुणाची हिम्मत होईल का तुम्हाला काही करण्याची?

५) चामुण्डायै - तुमच्या आयुष्यातील  blocks  अडथळे दुर करणारी शक्ती

 ६) विच्चे - म्हणजे संपुर्णता, परमेश्वराला आवडेल असे जीवन घडवणारी शक्ती.

 ७) त्रिविक्रम्‌ - ह्या विश्वातील सद्गगुरुतत्त्व.


जेव्हा  सद्गगुरुतत्त्व तत्वाचे प्रेम मान्य करुन प्राणांचा प्राण स्वीकारुन आपली बुद्धी त्यानुसार वागवुन "त्या" च्या रुपाचे सौंदर्यं मनाला आवडु लागते  तेव्हा  सर्व अडथळे दुर करुन मनुष्याचे जीवन परमेश्वराला आवडु लागेल अशी साधन सामुग्री पुरवली जाते आणि हे  जिथे आहे तिथे त्रिविक्रम आहेच.

बापू एव्हढं सगळं आम्ही कसं करणार असा तुमचा प्रश्न असेल तर ह्या पुढचे पद त्यावर उत्तर आहे .

"‍सर्वसमर्थ, सर्वार्थसमर्थ श्री गुरुक्षेत्रम्‌"

ह्या ७ stages मध्ये जर तुमची capacity कमी पडत असेल तर तिथे तुम्हांला सर्वसमर्थ बनवणारे गुरुक्षेत्रम आहे. फक्त तुम्ही मनाचा एकदा असा निश्चय केला तरी जरी तुमचे गुरुक्षेत्रम मंत्र म्हणताना लक्ष नसेल तरी तुम्ही आपोआप सर्वसमर्थ बनलेले असता.

हा मझ्या गुरुने दिलेला मंत्र आहे हा सर्वस्वी माझे कल्याण करणाराच आहे, मला सर्वसमर्थ बनवणारा आहे .

समजा मी एखाद्या हॉटेल  मध्ये गेलो व मला तिथे चांगले जेवण मिळाले तर त्याचे कारण माझ्याकडे असणारा हा गुरुमंत्रच आहे म्हणून .

ह्या सात दिवसात का हा मंत्र म्हणायला सांगितला? तर जेव्हढी अशांतता असते तेव्हढं निर्णय घेणे कठीण जाते. आणि आता हा अशांततेचा काळ सुरु होतोय अगदी उद्यापसुन हा कठीण काळ सुरु होतोय. जे काही घडणार आहे तेव्हा शांतता देणारा हा गुरुमंत्रच आहे. हे लक्षात ठेवा.

मला बरं वाटत नसेल तर तात्पुरता उपाय म्हणुन मी औषध घेईन, चालायला जाईन, पण हे सगळे secondary आहे ह्यात main आहे तो फक्त गुरुमंत्रच .

ज्यांनी गेल्या ७ दिवसात हा विश्वास ठेवुन गुरुमंत्र म्हटला त्यांच्या मनात हा निश्चय झालेलाच आहे.

ह्यापुढे माझ्या आधीच्या जन्मातील विचार, शब्द ह्यांना गुरुक्षेत्रम मंत्राच्या भिंती छेदुनच यावे लागेल. शक्य आहे का या भिंती छेदणं?  नाही आज तुमच्यासर्व नातेवाईकांना, मित्रांना कळवा तुम्ही आधीच्या सर्व जन्मातील विचारांपासुन, शब्दांपासुन मुक्त झालात. मग फक्त दोन जन्मातील पाप- पुण्य सोडवणं खुप सोप्पे.

आज हे त्रिविक्रम निलयं तुमच्या मनात बांधले गेले आहे. तुमची इच्छा असो वा नसो तुमच्या मनात एकदा ह्या त्रिविक्रमाने घर बांधले की ती जागा तो कधीच सोडुन जाणार नाही. कारण हा जगातला सर्वांत मोठा हुकुमशहा आहे.

अट एकच आहे. आता ९.२५ वाजले आहेत उद्या सकाळी ९.२५ पर्यंत तुम्ही फेर विचार करु शकता. तुम्हांला ह्याची सत्ता नको असल्यास तुम्ही सांगु शकता, "बाबा रे तु मला नकोस." पण ह्या १२ तासात हा हलणार नाही त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तो राहील नाहीतर निघुन जाईल.

ह्या १२ तासात तुम्ही मागे फिरु शकता पण त्यानंतर मात्र बापजन्मात तुम्ही कधी मागे फिरु शकणार नाही, तुम्ही ह्याची सत्त्ता नाकारु शकणार नाही.

ह्या १२ तासानंतर तुम्ही जाल तिथे हा असेल तुमची सोबत हा कधीच सोडणार नाही.

म्हणुन सांगतो कशाला कट्कट मागे लावुन घेता, हा( त्रिविक्रम) एक तर कधी गोड बोलत नाही मग कशाला पाहेजे ह्याची गुलामी?

बघा विचार करा.. उद्या ९.२५ पर्यंत मग मात्र lock किया जायेगा. तुम्ही भोळे आहात, वेडेपणा करु नका, ह्याला नाही म्हणा, मग त्रिविक्रमाचा धोका तुमच्या आयुष्यातुन गेलेला असेल, मीच शिकवले ना तुम्हांला नाही म्हणायला मग निर्णय आताच घ्या. एकदा का तुम्ही नाही शब्द उच्चारले की मग तुम्हांला कोणी विचारायला येणार नाही. काळजी करु नका.

फक्त एकच गोष्ट होईल की तुमचे आकडे तुम्हांला स्वत: लाच मोजावे लागतील. जसे शिशुपालाने मोजले. स्वत:चे आकडे स्वत; ला मोजावे लागण्यासारखे दु:ख नाही... म्हणून विचार करा मझ्या आईने सांगितले आहेत १२ तास... नीट निर्णय घ्या.

All the best .


हरी ॐ

0 comments:

Post a Comment