Subscribe:

Tuesday, July 12, 2011

Excerpts from Thursday Discourse dated 7 July 2011

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०७.०७.२०११)
    "ॐ मंत्राय नम:" सर्वबाधाप्रशमनं मध्ये आपण वमन बाधा बघतोय. किती झाल्या आतापर्यंत दोन! आज आपल्याला तिसरी व चौथी वमन बाधा बघायची आहे. ह्या नेहमी जोडीने फिरत असतात. एक असली की दुसरी असतेच. दोन्ही नेहमी एकत्रच राहतात व एकत्रच बाहेर पडतात. पण ह्याचा अर्थ एक बाधा टाकली तर दुसरीसुद्धा बाहेर जाईल असे होत नाही.
    ह्यातली एक बाधा जर बाहेर टाकली व दुसरी आत असेल तर बाहेर गेलेली बाधा परत आत येणार. कारण दोन्ही नेहमी एकत्र असतात. पण आतली बाधा बाहेर जात नाही. म्हणजेच दोघींपैकी एक बाधा बाहेर टाकली तर उरलेली आतली दुसरी बाधा बाहेर जात नाही. का? कारण, ह्या अश्या बाधा आहेत की, ह्यांच्यामुळे मनुष्याला जी गोष्ट हवी असते ती मिळत  नाही.
    काय हवे असते मनुष्याला? समाधान. ह्या समाधानाच्या आड येणार्‍या ह्या दोन बाधा आहेत. म्हणून ह्या दोघींना एकदम बाहेर टाकले पाहिजे. ह्या दोन्ही बाधांची नावेसुद्धा self explanatory आहेत. ह्यातली पहिली जी आहे ती असमा बाधा व दुसरी आहे ती अधान बाधा.
    असमा बाधा म्हणजे काय? तर मनुष्याला आपल्यासारखे दुसरे कुणी असू नये, असे वाटणारी जी वृत्ती, ती म्हणजे असमा.
    अनेकजण बोलतात की, "आमच्यासारखे दु:ख कोणाला नसू दे” पण असं बोलताना मनात खरोखर तसा भाव असतो का? नाही. एखादी व्यक्ती परिक्षेला जात असताना प्रत्येकजण त्याला Best of luck देतो, पण मनात मात्र worst of luck हा विचार असतो, असं का? कारण असमा बाधा. असमा म्हणजे "मी ज्या परिस्थितीमध्ये आहे, त्या परिस्थितीमध्ये माझ्यापेक्षा वरचढ कुणीही असता कामा नये.” उदाहरणार्थ, मी जर १०,००० कमावतो व ह्या कमाईमध्ये मी ज्या standard ने राहतो, त्यापेक्षा १०,००० कमाई असणार्‍यांमध्ये कुणीही (माझ्यापेक्षा)श्रेष्ठ असता कामा नये.   
    मनुष्य स्वत:ची level ठरवताना एकच निकष (criteria) लावतो तो म्हणजे स्वत:च्या सोयीचा. असा सोयीचा निकष लावणे म्हणजे अधान बाधा. माझ्यापेक्षा मोठं कुणीच असता कामा नये, असा प्रत्येक ठिकाणी आपल्या सोयीप्रमाणे मनुष्य निकष लावत असतो.
    एकच स्त्री पण ती सासूच्या भूमिकेत असेल तर सूनेसाठी वेगळा निकष लावते व आईच्या भूमिकेत असेल तर मुलीसाठी तिचा वेगळा निकष असतो. एखाद्या मुलाला त्याला आवडणारी मुलगी पटवायची आहे, आणि त्या मुलीच्या आजीच्या होकारावर त्यांचे लग्न अवलंबून असेल तर तो मुलगा त्या मुलीच्या आजीसाठी वाट्टेल ते करायला तयार होतो.
      म्हणजेच परिस्थितीनुसार, स्वत:च्या सोयीनुसार मनुष्य निकष बदलत असतो.
    १९९३ मध्ये मार्डच्या (MARD) डॉक्टर्सनी संप केला होता. तेव्हा एक गृहस्थ Private Medical College असता कामा नये म्हणून तावातावाने बोलत होते. आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या ह्या गृहस्थांच्या मोठ्या मुलांना चांगले मार्कस्‌ मिळून गर्व्हमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यामुळे Private College त्यांना चुकीचे वाटत होती. हेच गृहस्थ काही वर्षानंतर परत भेटले, तेव्हा Private College काढणे किती आवश्यक आहे, ह्याविषयी बोलू लागले. त्यांच्या बोलण्यातून समजले की, त्यांच्या धाकट्या मुलाला मार्कस्‌ कमी होते, म्हणून त्यांना त्याच्या   admission साठी Private डोनेशन घेणार्‍या कॉलेजची आवश्यकता वाटू लागली होती.
    नंतर काही वर्षांनी परत हेच गृहस्थ भेटले पुन्हा ते Private कॉलेजना दोष देऊ लागले. कारण, ह्यावेळी त्यांची मोठी मुलं त्यांना सोडून परदेशी गेली होती. त्यांच्या नातवाला चांगले मार्कस्‌ मिळाले होते पण आता ह्यांची आर्थिक स्थिती खालावली होती.
    म्हणजे, जेव्हा पहिल्यांदा पैसा होता, मुलांकडे मार्कस होते तेव्हा Private College त्यांच्यासाठी चुकीचे होते. दुसर्‍यांदा पैसा होता,  मुलांकडे मार्कस्‌ कमी  होते, तेव्हा Private College   त्यांच्यासाठी योग्य होते. तिसर्‍यांच्दा जेव्ह पैसा कमी व नातवाकडे मार्कस्‌ आहेत, तेव्हा पुन्हा Private College चुकीचे ठरवले गेले. म्हणजे निकष कश्याच्या आधारे लावला तर स्वत:च्या सोयीनुसार.
    बापूंनी हनुमान चलिसा म्हणायला सांगितली, एका दिवसात १०८ वेळा म्हणायला सांगितल्यावर एवढ्या स्पीड ने म्हटली जाते की हनुमानजी घाबरले. माझ्याकडे येऊन हनुमानजी म्हणाले की, ह्या तुझ्या भक्तांचा एवढा स्पीड आहे म्हणण्याचा की, तिथे माझा स्पीड पण कमी पडतो. सरस्वती देवी, जी वाग्देवता आहे, ती पण येऊन म्हणाली की, तुझ्या भक्तांचे उच्चार कळत नाहीत. दोघेही माझ्याकडे (परमपूज्य बापू) तक्रार घेऊन आले. म्हणून मग मी (परमपूज्य बापू) ऐकू लागलो, तर मला काहीच ऐकू आले  नाही. असे करु नका राजानों.
    १०८ वेळा हनुमानचलिसा म्हणणे ही उरकण्यासारखी गोष्ट नाहे. तुमचे उच्चार तुम्हाला नीट कळले पाहिजेत. सावकाश म्हटले तरी ५१/२ ते ६ तास पुरतात. काही जणांचे इथे ३ तासांत संपते, हे योग्य आहे का?   
    समजा तुम्ही शौचास बसलात आणि तेव्हाच नेमके तुम्हाला कुणी उठवले तर कसे वाटेल? कठीणच वाटेल ना. तसेच बुद्धीकडून एकदा आज्ञा निघाली की, त्यास आवर घालणे कठीण असते.
    प्रत्येक गोष्टीला आपल्या सोयीनुसार निकष लावणे, व आपल्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही, ह्या गोष्टी जेवढ्या कमी करता येतील, तेवढ्या कमी करा. जेव्हा तुम्ही दोन्ही बाधा टाकण्यासाठी प्रयास करता तेव्हा जर त्यातल्या एका बाधेसाठी तुमचे प्रयास कमी पडत असतील तर तिथे कमी पडणारे प्रयास हनुमंत भरुन काढेल. पण जर दोन्हीपैकी फक्त एकच बाधा काढायला बघाल, तर तसे होणार नाही.
    मी "याँव” केले "ताँव” केले असे मनुष्य नेहमी म्हणत असतो, हे "मी याँव” म्हणजे काय? तर मांजराची वृत्ती, अप्रामाणिकपणा. मांजर जसे जिथे सोय तिथे धाव घेते, मग तीथे योग्य की अयोग्य बघितले जात नाही.
    नेहमी बघा, कुत्रा कधीही घरातल्या व्यक्तीखेरीज इतर कुणीही काहीही दिले तरी तिकडे ढुंकुनही बघत नाही. मांजराचे तसे नसते, ते जिथे त्याला खायला मिळेल तिथे धावते.
    असमा बाधा मनुष्याला मांजराप्रमाणे बनवते मांजर स्वत:च्याच घरात चोरुन खात असते. हे आपल्याच घरात चोरुन खाणे म्हणजे जे आपल्यावर उपकार करतात त्यांच्याशी कृतघ्न्तपणे वागणे. जे आपणहून द्यायला तयार आहेत, त्यांच्याकडून चोरुन घेणे इथे शब्दश: चोरणे असा अर्थ होत नाही.
    आपण स्वत:च स्वत:शी कसे वाईट वागत असतो बघा. आपले घुडगे wight barring  joints आहेत, ज्यांच्यामुळे आपण धावू शकतो. जे जॉईंट्स आम्हांला धावण्यासाठी, जिने चढण्यासाठी आवश्यक असतात, त्या जॉईंट्सना हवा असणारा व्यायाम आपण देतो का? घरात आपण खाली बसतो का? आम्हांला जेवताना  dinning table च लागते. मग ३०-४० वयामध्येच गुडघे दुखू लागतात. त्यात एवढे वजन वाढते. मग मला (परमपूज्य बापू) म्हणतात, "बापूराया, हे गुडघे दुखणे थांबव.
    आयुष्यभर खाली बसणे टाळले, गुडघ्यासाठी आवश्यक व्यायाम टाळले की मग डायनिंग टेबल, कमोड वापरण्याची वेळ येते.
    गुडघ्याच्या वरती जे  muscles असतात. त्यांना Quadriceps म्हणतात. ह्यांची ताकद जेवढी strong तेवढे गुडघे strong असतात. ही ताकद व्यायामामधूनच वाढते. आमचे जिभेचे, हाताचे (खाण्याचे) व्यायाम पुष्कळ असतात. पण गुडघ्याचे होतात का? वाढलेल्या वजनामुळे कित्येकांना जरा बसल्यावर पायाला मुंग्या येतात.
    बर्‍याचवेळा मनुष्य मी एवढं कमी खातो तरी माझं वजन जास्तच आणि दुसरा एवढं जास्त खातो तरी वजन कमीच अशी तुलना करत राहतो. पण कुठलीही स्त्री माझ्या शेजारणीचा नवरा चार लफडी करतो पण माझा नवरा करत नाही, अशी तुलना करते का? नाही. पुरुषसुद्धा दुसर्‍याची बायको बाहेर लफडी करते, पण माझी बायको करत नाही, अशी तुलना कधीच करत नाही.
    म्हणजे, माणसाला कुठे तुलना करायची नाही, हे चांगल्या प्रकारे माहित असते. तुलनेमधूनच सोय बघितली जाते व सोय बघण्यासाठीच तुलना केली जाते.
    दुसर्‍याकडे पैसा जास्त म्हणून मग मनुष्य आपली सोय बघून (टेबलाखालून) पैसा कमवतो. लक्षात ठेवा तुमचे निकष बदलले की, त्या परमेश्वराचेही निकष बदलतात. १०,००० रुपये महिना प्रामाणिकपणे मिळवणार्‍यांच्या रांगेऐवजी तुम्ही अप्रामाणिकपणे कमवणार्‍यांच्या रांगेत जाता.
    पण, तो परमात्मा तुमच्यासारखी तुलना करत नाही. तो काय सांगतो, "प्रत्येकाची रांग वेगळी!” त्याने जर स्वत:ची सोय बघितली तर कल्पना करा काय होईल? तुमच्या गाडीचा ब्रेक तुटला आहे. गाडी दरीत कोसळणार आहे. तुम्ही त्याला हाक मारताय, आणि त्याने म्हटले आता जरा आळस आला आहे, मग जातो, तर ते चालेल का? नाही. त्याने तेव्हाच आले पाहिजे  "तेव्हाच” हे महत्त्वाचे असते.
    म्हणून सद्गुरुंची तुलना कधी करु नका. जर खरोखरचा सद्गुरु असेल तर तो माझ्याशी समा व धान वागणार आहे म्हणजेच समाधान देणार आहे.
    सद्गुरुनां कश्यामुळे समाधान मिळते?
१)सद्गुरुंची तुलना इतर कुणाशीही केली नाही
२)तो सांगेल तोच निकष मानला, त्याच्या सांगण्याची तुलना इतर कश्यासोबत केली नाही.
    ह्या गोष्टी पाळल्या तर सद्गुरुस समाधान मिळते.
    आयुष्यात मनुष्याला समाधान मिळवायचे असेल तर त्याला सद्गुरुंशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही.
    समजा, तुम्ही हातात फावडे घेतले व खड्डा खणून स्वत:ला त्यात पुरुन घेतले. म्हणजे चूक कोणी केली? तुम्ही.
    आणि मग असाच खड्डा तुम्ही सद्गुरुंसाठी खणला, त्यात त्यांना पुरुन त्यांच्यावर माती टाकली, आणि नंतर जर तुमच्या हाताला फावडे लागले किंवा तुम्हांला काही जखम झाली तर तेव्हा तुम्ही जे त्याच्याशी वागलात त्याचा कुठलाही राग न मानता तुमचा सद्गुरु तुमच्या जखमेवर फुंकर घालायला, तुम्हांला मलमपट्टी बांधायला तुमच्या मागे उभा असतो.
    जेव्हा मनुष्य सद्गुरुंशी ह्या दोन बाधा टाळून वागतो, त्याच्या चरणांशी ह्या बाधा ठेवतो. तेव्हा ह्य अबाधा त्या मनुष्याच्या आयुष्यात उरतच नाहीत. कारण सद्गुरुंमध्ये व तुमच्यामध्ये दुसरे कुणीही नसते.
    "जिस जिस पथपर भक्त साई का, वहाँ खडा है साई”
    कुणाला वाटते, सद्गुरु व माझ्यामध्ये अनेक जण आहेत कुणासाठी बायको, मुलं जवळची असतात तर कुणासाठी अन्य व्यक्ती. पण खरं सांगू का? ह्यातलम कुणीही तुमचे नसते. तुमचा असतो तो एकच तुमचा सद्गुरु.
    एक उदा. सांगतो एक मनुष्य स्वत:चे घर किती शांत ठिकाणी आहे, जवळ कुठलीही दुकाने नाहीत, म्हणून नेहमी तक्रार करत असे देवाने एक स्तोत्र दिले. ह्यामुळे त्याने नवीन जागा घेतली, एक महिना आनंदाने गेल्यावर परत ह्या मनुष्याच्या त्याच्या सद्गुरुकडे तक्रारी सुरु झाल्या, नवीन जागेत काहीच शांतता नाही म्हणून, मग परत त्याला नवीन स्तोत्र दिले व देवाने कंटाळून त्याला पहिल्या व दुसर्‍या जागेच्या मध्ये म्हणजे जिथे शांतीही नाही व जास्त अशांतीही नाही अशा ठिकाणी जागा दिली व नवीन उपासना दिली तिथे एक महिना आनंदात गेल्यावर परत ह्या मनुष्याच्या तक्रारी सुरु झाल्या, कारण माणसं असून त्या बिल्डिंगमध्ये कुणी एकमेकांशी बोलत नव्हते. परत देवाने मग चौथी उपासना दिली.
    इथे हा मनुष्य प्रार्थना सद्गुरुंची करत होता पण सद्गुरुंच्या शब्दांवर मात्र त्याचा विश्वास नव्हता. ह्या व्यक्तीसाठी त्याचा देव हा फक्त त्याच्या सोयीसाठी होता.
    कुणी माझ्यापुढे जाता कामा नये व स्वत:च्या सोयीनुसार निकष लावणे ह्या गोष्टी सद्गुरुंसमोर थांबवल्या पाहिजेत.
    गुरुपौर्णिमेच्या, त्रिपुरारीपौर्णिमेच्या दिवशी आरामात ९ नंतर खाऊन-पिऊन बरेचजण सोयीनुसार दर्शनाला येतात. त्यासाठी मग लाईनच ९ नंतर थांबवावी लागली. अशी वेळ का येते?
    इथे एक दिवस स्टेजवर बसून बघा आणि सगळ्या गर्दीकडे बघत हात वर करत रहा, १ तास सुद्धा तुम्ही बसू शकणार नाही. तेव्हा तुमच्या लक्षात येईल किती कठीण असते ते.
    देवाकडे स्वत:ची सोय बघणे थांबवा हे कसे थांबवायचे? तर यासाठी सद्गुरुकडे प्रथम सामान्य मनुष्य म्हणून पहा.
    समाधान सेवा म्हणजे गुरुचरणसेवा. ही तीन पातळींवर करता येते -
१)भौतिक पातळी :- म्हणजे स्थूल पातळीवर सद्गुरु मनुष्य रुपात आला आहे म्हणून त्यांची मनुष्य समजून जी सेवा करायची आहे अशी देहिक सेवा, तसेच त्याने जे सांगितले आहे ते आचरणात आणणे.
२)सूक्ष्म सेवा :- म्हणजे त्याच्या मनाची सेवा मानसिक सेवा त्याने (सद्गुरुंनी) सांगितलेली उपासना प्रेमपूर्वक करणे.
३)तरल पातळी :- प्रज्ञेची पातळी. सद्गुरुंचे चिंतन, त्याच्या विचारांचे चिंतन करणे.
४)तुर्या पातळी (अवस्था) :- ही कुठलाही मानव करु शकत नाही.
    संपूर्ण प्राणाने सद्गुरुंची सेवा करायची. सद्गुरुंच्या मूळ अस्तित्त्वाची, त्रिगुणातीत अस्तित्त्वाची स्वत:च्या प्राणाने सेवा करायची.
    आमचं शरीर, मन, बुद्धी एकत्र करुन सेवा करायची, ही आपण करु शकत नाही, कारण तोच (सद्गुरु) अशी आमची सेवा करत असतो. तो सदेह येतो ते ह्या तुर्यावस्थेसाठी तो देहातीत असतो, तेव्हा दिसू शकत नसल्याने मर्यादा येतात. म्हणून मग तो अवतार धारण करतो ते भक्तांच्या सेवेसाठी.
    तुमची सेवा हे त्याच्यासाठी (सद्गुरुंसाठी) अध्यात्म असते. मानवाची सेवा करण्यांसाठी प्रत्येक मानवात असणार्‍या परमेश्वराच्या अस्तित्त्वाची सेवा करण्यासाठीच तो येतो.
    ह्यातील पहिल्या ३ सेवा आपल्याला नीट करता आल्या पाहिजेत. ज्या क्षणाला मी सद्गुरुंना आपले मानतो, त्या क्षणापासून तो तुमची सेवा (तुर्यावस्था) करतोच. म्हणून त्याच्याकडे निकष लावू नका. नंबर लावत बसू नका.
    तुम्ही नंबर लावले की माझ्या डोक्याला ताप होतो. त्यामुळे इतरांचे किंवा स्वत:चेही सद्गुरुंकडे नंबर लावत बसू नका.   
    आजपासून आपण निश्चय करुया की, आपल्याला समाधान सेवा करायची आहे. पहिल्या तीन सेवा आपल्याला करायच्या आहेत. चौथी सेवा तोच आपली करत असतो. ह्या सेवा जेवढया अधिक प्रमाणात वाढतील, त्याप्रमाणात असमा व अधान बाधा नाहीश्या होतील व आयुष्यात समाधान येईल. सद्गुरुसेवा म्हणजेच समाधान सेवा. सद्गुरुस जरी तुम्ही खड्डयात पुरले तरी तो तुमच्या जखमेवर फुंकर कशी घालतो, हे आज आपण बघितले ही गोष्ट चिरकालीन सत्य आहे.
    साईबाबांच्या काळात बघा, काहीजण आम्ही शिरडीत कुठे राहतो? बाबांची सेवा कशी करणार? असा विचार करत बसले. ते शेवटपर्यंत कोरडेच राहिले.
    आम्हांला असं आमचं जीवन फुकट घालावयाचे आहे का? आज माझा (परमपूज्य बापू) तुम्हां प्रत्येकाला एक प्रश्न आहे. तुम्हाला तुमचं जीवन सफलपणे जगण्याची इच्छा आहे की नाही? (सगळे हो म्हणतात)
    मग ह्याच्यासाठीच मी इथे आलो आहे, इथे बसलो आहे. ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला स्वत:चे जीवन समर्थपणे जगण्यासाठी समर्थशक्ती देणारे. किरातरुद्र सूक्त तुमच्यासाठी येणार आहे. हे सूक्त कलियुगासाठी अत्यंत आवश्यक आहे.
    आज ज्यांनी ज्यांनी उत्तर "हो” दिले आहे, तसेच आज जे इथे नाहीत पण ते तुमच्यावर मनापासून प्रेम करतात, त्यांचे उत्तरही मी "हो” मानले आहे. आणि जे मुंबईत नाही, त्यांची काळजी तुम्ही करु नका. मी(परमपूज्य बापू) फक्त मुंबईचा नाही. खरं तर मी कुणाचाच नाही आणि मी सगळ्यांचाच आहे. मी जसा भारत , इतर देशांचा तसा पाकिस्तानचा पण आहे. पाकिस्तान मला फार हवाहवासा वाटतो.
    किरातरुद्र मधून मी तुम्हांला सगळं शिकवणार आहे. नुकताच संपन्न झालेला प्रसन्नोत्सव असो,  अंजनामाता वही असो कि, किरातरुद्र असो. ह्या सर्वांचे basis काय? तर सद्गुरु सेवा, सद्गुरुप्रती समर्पणाचा भाव.
    ह्यापुढे आम्ही तुलना करणार नाही. तर आम्ही समाधान सेवा करणार व त्यालाही (सद्गुरुस) समाधान देणार.
    गुरुपौर्णिमेला प्रत्येकाला काहीतरी सद्गुरुस द्यावेसे वाटते. जर काही द्यायची इच्छा असेल तर फक्त समाधान सेवा द्या. मग देणार का समाधान सेवा?(सगळे हो म्हणतात) नक्की? (सगळे परत हो म्हणतात)
    "हरि ॐ” ह्या "हरि ॐ” चा एक अर्थ "असेच होवो” असाही आहे.

हरि ॐ