Subscribe:

Friday, February 10, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०२.२०१२)


!! हरि ॐ !!

नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपण भेटलेलो. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद. परिक्षा म्हणजे नक्की काय? exam, परिक्षा इम्तिहान काहीही नांव द्या गोष्ट तीच असते त्याच्याबद्दल feeling बदलत नाही. कधी धाकधूक, थोड टेन्शन, थोडी भिती असते. ३० दिवस राहिलेत, १० दिवस, ८ दिवस, ३ दिवस बापरे! उद्या परिक्षा.
अनेक गोष्टी आपल्याला करणं आवश्यक असतं. जी गोष्ट आपल्याला करण आवश्यक आहे ती करावीच लागते आणि ती करत असताना मनात धाकधूक असावी लागते. हे टेन्शन फक्त शाळा कॉलेजच्या परिक्षांपूरतीच नाही तर जीवनात सगळ्याच बाबतीत apply करते. जी गोष्ट आपण करणे आवश्यक आहे ती मला जमेल किंवा नाही ही धाकधूक म्हणजे परीक्षा.

तीन गोष्टी आहेत-
१) जी गोष्ट करायची आहे ती आवश्यक असली पाहिजे.
२) ती गोष्ट करण्याची आपल्या मनाची तयारी असली पाहिजे.
३) मनाला धाकधूक असली पाहिजे.
धाकधूक काढून टाकली की भिती उरत नाही. रंगमंचावर पहिल्यांदा येताना धाकधूक असते, भिती असते मग नंतर अनेकवेळा रंगमंचावर काम करताना भिती उरत नाही. सरावाने सहजता येते आणि भीती उरत नाही.
जीवनात अगदी लहान बाळापासून वृद्धापर्यंत आपण सगळे नाटक करत असतो. आम्ही दररोज जीवनात नाटक करत असतो. आम्ही लहानपणापासून आतापर्यंत नाटकंच करत असतो, Daily  नाटक करत असतो तेव्हा stage fear असतात का? नाही. नाटक करत असताना बघणार्‍यालाही माहीत असत आणि करणार्‍यालाही माहीत असत की हे खोटंच आहे तरीही धाकधूक होते पण जीवनात खोटेपणा करताना, नाटक करताना मात्र मनात धाकधूक नसते. जीवनात हजारदा नाटक करतो पण भिती नसते अस का होत? दररोजच्या जीवनात जो नाटक करतो त्याला समोरच्याला ते खरं आहे हे दाखवायचं असत तरी मनात भिती नसते. त्याला जे नाही आहे ते समोरच्याला दाखवायचं असलं तरी जराही मनाला दु:ख झालेल नसतं. stage वर नाटक करताना फक्त नाटकातल्या पात्रासारख करायच असतं. शिवाजी असेल तर शिवाजीसारखं व्हायचं असतं. जीवनात मनुष्य हजार वेळा नाटक करत असतो पण stage वर नाटक करायला घाबरतो.
जीवनात मनुष्य ज्याच्या समोर नाटक करतो, तिथे जो प्रेक्षक असतो, त्याच्यावर परिणाम घडवून आणायचा असतो, ती व्यक्ती परिक्षक नसते ते त्याचे विद्यार्थी असतात. जेव्हा कळतं समोरची व्यक्ती हुशार आहे तेव्हा मनाला भिती वाटते.
समोर कोण आहे त्यावर धाकधूक अवलंबून आहे जो इंग्लिश मध्ये बी. ए. झालेला आहे त्याची इंग्लिशची oral exam ssc मराठीत पास झालेल्या मुलाने घेतली तर तो परिक्षा देणारा घाबरेल का?  इथे भीती कोणाला वाटेल विद्यार्थ्याला की परिक्षकाला?
परिक्षा कोण घेतो ह्याच्यावर भिती अवलंबून असते. भिती तीन गोष्टींवर अवलंबून असते-
१) जो परिक्षक आहे तो अत्यंत कठोर आहे.
२) माझं नशिब चांगल की वाईट मला माहित नसतं.
३) माझी स्वत:ची तयारी झाली की नाही.

जगातील प्रत्येक university, colleges, schools निर्माण करण्यात येतात ती विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी, नापास करण्यासाठी नाही. परिक्षकाचा हेतू पास करण्याचा असतो. प्रत्येक university, colleges, schools मध्ये आमच्याकडे ही डीग्री दिली जाते असा बोर्ड लावलेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवून पास करण्यासाठी बसलेत. शाळा, कॉलेजेस्‌नी ठरवलं की ९०% विद्यार्थी नापास करायचेत, तर पाच वर्षात सगळ्या शाळा, कॉलेज बंद पडतील. ही समाजाची पण गरज आहे आणि विश्वाच्या चक्राच्या चालू राहण्यासाठी पण आवश्यक आहे.
परिक्षा ही फेल करण्यासाठी नसते. जीवनातील परीक्षासुध्दा तुम्हाला फेल करण्यासाठी नसते. वाईट व्यक्ती जरी परिक्षा घेत असेल तरी काही फरक पडत नाही. फळ कोण देणार ह्यावर सगळं अवलंबून असतं. फळ देणार कोण आहे? फळ देण्यासाठी ती आदीमाता आणि तिचं चण्डिकाकुल बसलेले आहेत.
तुमची ताकद किती? तुमची ताकद limited. पाप-चुका वाईट नशीब तयार करण्याची माझी ताकद किती? लाख जन्म जरी झाले असतील आणि प्रत्येक जन्मात जन्मल्यापासून मरेपर्यंत पापच केले असतील. लाख जन्म नको आपण ३७२ जन्म घेऊया. ह्या ३७२ जन्मांमध्ये संपूर्णपणे पापच केलेले आहे. बापू आम्ही एवढी पाप केली तर आमचं नशीब कसं चांगल असेल. मनुष्य ३७२ जन्मांच पाप घेऊन येत नाही, तर फक्त दोन जन्माचं पाप आणि पुण्य घेऊन जन्माला येतो. ज्याअर्थी तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला आहे त्याअर्थी तुम्ही कुठेतरी पुण्य केलेलं आहे. नुसती पापच केली तर पुन्हा प्राणीयोनीतच जाऊन मग मानवाचा जन्म मिळतो. ज्याअर्थी तुम्ही मानव म्हणून जन्मला आहात त्याअर्थी तुमची पुण्याची पाटी कोरी नाही.
आम्हाला वाटतं तेवढ आमचं नशीब वाईट नाही. जीवन जगताना त्या सद्‍गुरु तत्त्वाचा हात पकडलेला असेल मग आम्हाला काळजी का? तुम्ही परीक्षेला बसलेले आहात तेव्हा डोक्यावर पाप घेऊन बसलेले नाहीत आणि तो सद्‌गुरू तुम्हाला संधी द्यायला बसलेला आहे.
१४ वर्षापर्यंतच्या मुलाच्या हातून पाप घडल तर ते त्याला लागत नाही ती त्याच्या आईवडिलांची जबाबदारी असते पुढे साडे तीन वर्षातही हातून पाप घडलं तरी चुकांमध्ये गणल जात. तो  परमात्मा संधी द्यायला बसलेला असतो, संध्या कापायला नाही.
ज्याअर्थी आम्ही मानवाच्या जन्माला आलो आहोत त्या अर्थी आमच्याकडे पुण्य/नशीब १५% आहेत, आम्हाला देवाच नाम घेण्याची इच्छा आहे पुण्य/नशीब ३०% आहेत, ज्याअर्थी आम्ही सद्‍गुरु तत्त्वाला मानतो त्याअर्थी ४५% आहेत, पण पुण्य/नशीब ४५ ते १०० चा प्रवास तुमची सद्‍गुरुवरची निष्ठा, प्रेम व त्याच्या शब्दांवर विश्वास किती प्रमाणात आहे ह्यावर अवलंबून आहे. हा प्रवास तुम्हालाच कापायचा आहे. आम्ही स्वत:साठी जेवढे कट्टर असतो, तेवढेच सद्‍गुरुसाठीही कट्टर असलं पाहिजे. आमच्या अंगावर मच्छर बसली कि आम्ही तिला हाकलवतो, माशी घाण करेल म्हणून तिला हाकलवतो, वाघाला म्हणतो का ये आणि मला खा? जेवढी गोष्ट आम्ही स्वत:साठी सांभाळतो तेवढीच सद्‍गुरुतत्त्वासाठी संभाळली पाहिजे. जेवढं तुम्ही स्वत:ला जपता तेवढचं तुमच्या सद्‍गुरुतत्त्वाला जपा. मी आहे हे जितकं खरं आहे तितकचं तेवढाच माझा सद्‍गुरु आहे. तो माझा आहे हे सत्य आहे.
ह्या भूमिकेतून अभ्यास करा, युद्ध करा काहीही करा अपयश तुमच्याकडे येणार नाही. म्हणून हेमाडपंत सांगतात-
इतर देव सारे मायिक ! गुरुची शाश्वत देव एक
चरणी ठेविता विश्वास देख ! रेखेवर मेख मारी तो!!

नशीबावर प्रहार करुन तुमचं दुष्प्रारब्ध तो दूर करतो केव्हा जेव्हा तुमचा त्याच्यावर विश्वास असतो तेव्हा तुमचा विश्वास असेल तरच तो तुमच्या रेखेवर मेख मारणारच आहे.
आमचा विश्वास किती हे आम्हालाच माहित असत हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही.
एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा !!
जो ह्या प्रमाणे विश्वास ठेवतो त्याच्यासाठी परीक्षा परीक्षाच उरत नाही. त्याला प्रत्येक परिक्षा नित्य गोष्ट बनते, आणि ज्याचा विश्वास नसतो त्याच्यासाठी प्रत्येक छोटी गोष्ट परिक्षा बनते. ४५ ते १०० हा प्रवास गुरुभक्तीनेच होतो. म्हणून सगळ्या संतांनी गुरुभक्तीचा महिमा सांगितला आहे.
ज्ञानेश्वर म्हणतात -
हे जे हृदय आपुले ! चौफाळूनिया भले  !
वरी बैसऊ पाऊले सद्‍गुरुची !

साईसच्चरित, मातृवात्सल्यविन्दाम‍ काय सांगत - तो आपल्या भक्तांच्या संरक्षणासाठी धावतोच, तो जे करायचं ते आपल्या भक्तांसाठी करतोच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना तो सद्‍गुरुतत्त्वाची मूल्य जपतोच.
मातृदेवोभव, पितृदेवोभव, गुरुदेवोभव - आई, बाप, शिक्षक सगळ गुरुच आहे. आई पहिला गुरू, बाप दुसरा गुरू, शिक्षक तिसरा गुरू आणि सद्‌गुरू आमचा रेखेवरी मेख मारणारा खरा गुरू.
जीवनात यशाच्या मार्गाने चालायच असेल तर गुरुभक्तीशिवाय पर्याय नाही. ४५ पेक्षा पुढे जायच असेल तर तुम्हाला गुरुभक्तीचाच आश्रय करायला हवा. ४५% च्या पुढे गेलात तर तो रेखेवर मेख मारतोच - तो अंबरीषाच्या, वाल्या कोळ्याच्या रेखेवर मेख मारतो मग आमच्या का नाही मारणार.

!! हरि ॐ !!

0 comments:

Post a Comment