Subscribe:

Friday, April 20, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१२.०४.२०१२)


॥ हरि ॐ ॥
ॐ मंत्राय नम: मध्ये श्री गुरुक्षेत्रम मंत्र आपण बघतोय. पहिली ३ पदे झाली आता ४ थे पद ॐ ऎं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चॆ त्रिविक्रम निलयं श्री गुरुक्षेत्रम्‌ "
मनुष्य जेव्हा एकटाच चालत असतो‍, त्याच्या आजूबाजूला कोणीही नाही व बरोबरीने ही कुणीही नाही, तो चालतो ती जागाही अत्यंत  safe  आहे. रस्ताही चांगला आहे, सर्व धोके बाजूला केले आहेत, त्याला कामाची घाईही नाही. तर तो कसा चालेल? काही जण आरामात चालतील... काही सोबत कोणीही नाही म्हणून घाबरुन चालतील. 
एका शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला व त्यात त्याने ३००० लोकांचे शुटींग केले, त्या व्यक्तींना माहीत नव्हते की त्यांचे शुटींग होत आहे. 

ह्या एका ग्रुप सोबत दुसरा ग्रुप घेतला ज्यांना कामाची घाई आहे. अश्या लोकांना त्याच safe रस्त्यावरुन अर्धा कि.मी. चालायला सांगितले. तसेच तिसरा ग्रुप असा घेतला की ज्यांना घाईचे काम नाही पण त्यांचा रस्ता गजबजलेला आहे. चौथा ग्रुप असा घेतला त्यांचा रस्ता गजबजलेला आहे व त्यांना घाईचे कामही आहे. 
ह्या चारही ग्रुप ची तुलना केल्यावर असे लक्षात आले की, प्रत्येकाच्या हालचालीत व गतीत फरक आहे. रस्ता safe आहे हे सांगूनही पहिल्या ग्रुप मध्ये काही जण आरामात जातात तर काही जण एकटाच आहे म्हणून घाबरत चालतात. म्हणजेच मनुष्याच्या मनोवृत्तीनुसार प्रत्येकाची वेगवेगळी वर्तणूक दिसून येते.

दुसर्‍या ग्रुपमध्ये गजबलेल्या रस्त्यावरून घाईचे काम असूनही काही जण शांतपणे जातात तर काही जण उगाचच घाईघाईत जातात, कुठेतरी धडपडतात. 
ह्यावरुन निष्कर्ष काय तर रस्ता safe आहे की नाही? काम आहे की नाही? ह्यापेक्षा क्रिया कश्यावर अवलंबून असते तर मन कश्या रितीने response देऊ इच्छीते ह्यावर तुमचं वागणं अवलंबून असतं....काहीही नसताना सुध्दा मनावर परीणाम होत असतो...
काही जण आयुष्यात अमुक अमुक परिस्थिती होती म्हणून असे घडले असा दोष देत बसतात म्हणजेच आजुबाजुच्या परिस्थितीला दोष देऊन मनुष्य स्वत:चा बचाव करत असतो.

कधी कधी एकाच आई वडिलांची दोन मुले असतात.....तेच आई-वडील, तेच संस्कार...पण एक चांगला तर एक मवाली झालेला दिसतो . 
ह्याचाच अर्थ मनुष्याच्या मनाच्याबाहेर जे आहे त्याचा मनुष्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही.
 
इतकी लोकं रस्त्यावरून जात असतात. पण एकाचाच पाय खड्ड्यात पडतो. रस्त्यावर खड्डे नाही पण मनात खड्डे आहेत तर बाहेरच्या खडड्यात पाय पडणारच. बाहेरच्या परिस्थितीचा तुमच्या मनावर कधी परिणाम होतो जेव्हा तुमच्या मनात तशीच परिस्थिती असते तेव्हा. आपल्या जिवनात जे काही घडतं, ते पहिलं आपल्या मनात घडतं.. मग बाहेर घडतं. मनात भिती असेल तर चांगल्या रस्त्यावरून चालताना सुध्दा भिती वाटते.

परिक्षा झाल्यावर रिझल्ट लागेपर्यंतच्या काळात आपण मजा करतो, रिझल्ट आधीच लागलेला असतो आपण fail असतो पण जोपर्यंत तो रिझल्ट माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचा माझ्यावर परिणाम होत नाही. 
काही वर्षांपूर्वीची गोष्ट, S.S.C. ला पहिला आलेल्या मु्लाचा आधी fail म्हणून result आला होता, नंतर परत तपासणी करता तो मुलगा पहिला आल्याचे कळले. पण आधीच्या निकालाच्या tension मुळे ह्या नंतरच्या result चा त्याला काहीच आनंद वाटला नाही.
आमच्या सर्वांच्या जीवनात जे काही घडत असते ते आधी मनात घडते मग बाहेर घडत असते.

वाडील accident मध्ये वारले म्हणजे मुलाच्या मनात तसं होतं का? आम्ही स्थूलात कशाचाही संबंध कशाशीही लावतो. हा काय त्या मुलाचा दोष नाही. वडिलांचा accident ही त्यांच्या जिवनातील घटना आहे. त्यांच्या मनात accident घडला होता म्हणून तसे घडले.

मनात accident होणे म्हणजे काय? आपण अनेकवेळा दचकतो का? कारण अचानकपणे काहीतरी accidently  घडते. अचानक अपघात होऊन ईजा होणे म्हणजे accident . 

जेव्हा अचानकपणे तुमचे मन दुसर्‍या कोणाला तरी ईजा करते तेव्हाच तुमच्या मनात accident  घडतो. 
जेव्हा आपले मन दुसर्‍याला किंवा स्वत:ला अपघात करते तेव्हाच आमच्या जीवनात अपघात होत असतो हे लक्षात घ्या. १०० पैकी ९९ वेळा अपघात हे त्या मानवाने स्वत:च स्वत:ला केलेल्या अपघातामुळे होत असतात.

आम्ही स्वत:ला अपघात कसा करतो?
उद्या रविवार आहे, उद्या सगळे घर साफ करूया...घर साफ करता करता आमच्या मनात विचार येतो, सगळे जण साफ करतातच आहेत तर आपण जरा बाहेर फिरुन येऊया, सगळ्यांचे काम करुन झाले की मग येऊया. इथे घरात सगळे काम करताना आपण फिरुन येणे हा अपघातच आहे. कारण तुम्ही बाहेर फिरायला गेलात, मात्र तुमचे वयस्कर आई- वडिल, पत्नी- मुले सगळे काम करत आहेत म्हणजे इथे तुम्ही तुमच्या responsibility चा केलेला अपघात आहे, ह्यासोबत आई-वडिलांचा अनादर करणे, मुलांची काळजी न घेणे हाही भाग आहेच. 

ह्याने तुमच्या जीवनात काय होणार? तर तुम्ही ज्याच्यावर भरवसा टाकणार ती गोष्ट तुम्हाला दगा देणार.
म्हणजेच जेव्हा तुम्हांला जास्त घाई असेल तेव्हाच तुमच्या गाडीचे टायरच पंक्चर होणार, तुम्हांला ट्राफिक जाम लागणार, तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोचू शकणार नाही तुमचे नुकसान होणार, अश्या प्रकारचे अपघात तुमच्या जीवनात होणार . 

आता एका स्त्रीने समजा ठरवले की मी आजपासून भांडणार नाही, बिल्कुल रागवणार नाही आणि तेव्हाच तिच्या नवर्‍याने ठरवले की घरातली सगळी भांडी पाडायची, घरात सगळा कचरा करायचा. ही कशी रागवत नाही बघूया... तिच्या सासूने ठरवले हीच्या आईला शिव्याच घालायच्या. इथे ह्या दोन्ही व्यक्तींकडून त्यांच्याच मनाला अपघात घडवला जातो कारण त्या स्त्रीची भावना, तिचा हेतू चांगला होता.
दुसर्‍या व्यक्तीच्या चांगल्या निश्चयाच्या आड येणारे वर्तन तुमच्याकडून घडणे म्हणजे तुम्ही त्यांना केलेला अपघातच असतो.
म्हणूनच त्यानुसार तुमच्या जीवनात अपघात घडत असतात. तुमच्या जीवनातील ५०% अपघात हे ह्याच कारणामुळे घडत असतात. 

तुम्ही महिन्यातले २९ दिवस pass नेता मात्र ३० व्या दिवशी तुम्ही pass न्यायला विसरता आणि नेमके तेव्हाच तुम्हाला T.C. पकडतो हा अपघातच आहे.

मनुष्य जेव्हा दुसर्‍याने ३० दिवसांपैकी २९ दिवस चूक केलेली नाहिये अणि १ दिवस केलेली चूक आपण पकडून ठेवतो...तेव्हा ३० व्या दिवशी T.C. तुम्हाला पकडतो. दुसर्‍याने केलेल्या लहानश्या चुकीचा बाऊ करतो तेव्हा तश्याच प्रकारचे अपघात त्याच्या जीवनातही घडतात. २९ दिवस pass नेऊनही ज्या दिवशी तुम्ही pass न्यायला विसरता तेव्हाच T.C. तुम्हाला पकडतो. 

ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही वही-पेन घेऊन तुमचे सगळे अपघात लिहून ठेवा, सतत तापसून पहा. मी तुम्हांला असे कधी सांगणार नाही, मग ह्याला सर्वसाधारण उपाय काय? ह्यासाठी universal antidote काय? तर अत्यंत सोपी गोष्ट आहे .

प्रत्येक मानवाचे मन हे तीन घटकांनी बनलेले असते. बाह्य मन, आंतर मन व विवेक हे मनाचे तीन भाग असतात. मानवाच्या मनाच्या प्रत्येक बिंदुमध्ये ह्या तीन्ही गोष्टी म्हणजे ब्रम्हा, विष्णू व महेश हे वेगवेगळे अस्तित्वात नसतात. ह्या तिघांचेही कार्य एकमेकांना नेहमी पूरकच असते. 

माझ्या मनाचा प्रत्येक बिंदू हा एकाच वेळेला ब्रम्हा, विष्णू व महेश ह्या तिघांच्याही प्रदेशामध्ये आहेच. मग असे असताना मन वाईट का वागते ?

तर ह्याचे उत्तर ग्रंथराज देतो, जेव्हा मानव कल्पना करतो तेव्हा त्याच्या मनावर विष्णूच्या नाभीकमलातून बाहेर पडलेल्या ब्रम्हदेवाचे राज्य असते. असा ब्रम्हदेव ज्याच्या मागे मधु- कैटभ लागलेले आहेत. मधु- कैटभ म्हणजेच स्तुती व निंदा. 
ज्याक्षणी मनाचे वास्तवाचे भान सुटते तेव्हा मन विष्णुचे साहाय्य नसलेल्या ब्रम्हदेवाच्या हातात जाते. कल्पना शक्तीचा उपयोग खरंतर planning करण्यासाठी करायला हवा पण आपण त्याचा उपयोग मनोराज्यासाठी करतो. सर्व कल्पना ह्या शेवटी फलाशा आहेत. ही क्रिया घडू नये, ही सुध्दा आशाच आहे.

कित्येक घरात परिक्षा झाल्यावर मुलं घरी आली की आई वडील त्यांचा पेपर घेऊन बसतात ह्यामुळे मुलांचा confidence कमी होतो. अश्या आई-वडिलांना खरंतर treatment द्यायला हवी. नापास झाल्यावर मुलांना मारणारे आई-वडिल मुर्ख असतात. 
आपल्याला जे जमले नाही ते आपल्या मुलांनी करावे ह्यासाठी पालक मुलांवर जबरदस्ती करतात हे पूर्णपणे चुकीचे आहे. 
परिक्षा झाल्यावर पुढच्या पेपरसाठी मुलांना मदत करा. मुलं जेव्हा अभ्यास करीत नाहीत तेव्हा त्यांना ठॊकून काढणे योग्य आहे पण fail झाल्यावर मारणे बरोबर नाही. 

मुलांच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवता आला पाहीजे, जे आई- वडिल मुलांशी प्रेमाने वागतात त्यांची मुले confident  बनतात तर जे आई-वडिल मुलांवर फक्त ओरडतात त्यांची मुले एकतर भित्री व बावळट बनतात नाहितर मवाली बनतात.

बर्‍याच वेळा अनेक माणसे १०८ वेळा स्तोत्र किंवा एखादा गजर म्हटल्यावर देव दिसला, असे सांगतात. मग आम्ही पण आम्हांला सुद्धा दिसले हे सांगू लागतो, इथे मनोराज्ये सुरु होतात. हे कशाला हवे आहे? 
पण शेजारच्याला दिसले म्हणजे मला पण दिसलेच पाहीजे हा आमचा अट्टाहास असतो .
अख्खाच्या अख्खा देव आपल्या समोर उभा असतो अशी संधी वारंवार मिळते का? मग तेव्हा शांतपणे गजर करायचा सोडून आमचं लक्ष प्रकाश दिसतो की चक्र दिसते ह्याकडॆ असते. त्याला जेव्हा ज्याला दाखवायचे आहे तेव्हा त्याला तो दाखवणारच आहे पण त्यासाठी आम्ही मनोराज्ये करणे चूक आहे. 

मानवाच्या जीवनात जेव्हढ्या कल्पना कमी तेव्हढे accident कमी. म्हणून आपण कल्पना करतो आहे असे वाटले की मनाला थांबवायचे. पण असे करण्यासाठी मानवाकडॆ capacity कमी असते व ही capacity पुरवणारी शक्ती म्हणजे त्रिविक्रम. 

मागेही मी (प. पू. बापू) सांगितले होते की हरि-हराचे एकत्रित रुप, सद्‌गुरुतत्त्वाचे प्रतीक म्हणजे त्रिविक्रम . 
जो कोणी खराखुरा सद्‌गुरु आहे, मग जरी तो ५०० वर्षांपूर्वी झाला असला तरी तो ह्या त्रिविक्रममध्ये आहेच .
हाच मनुष्याला मायेच्या प्रांतातून दुर नेतो. त्रिविक्रम हे प्रतिक पण आहे, चिन्हही आहे त्याच वेळी ही एक विश्वव्यापक आकृती आहे, विराट चैतन्य आहे. ह्या त्रिविक्रमाचे लॉकेट आपण गळयात घालतो, ह्याचे स्मरण आपण गुरुक्षेत्रम्‌ मंत्रात करतो. 
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा accident मधून वाचवायची ताकद सद्‌गुरु तत्त्वाशिवाय अन्य कशातही नाही. 

म्हणून ह्या त्रिविक्रमाला आपलासा करा. ह्याचा फोटो नक्की खिशात ठेवू शकता पण जेव्हा त्रिविक्रमाचे नाव तुम्ही गुरुक्षेत्रम्‌ मंत्रामध्ये घेता तेव्हा त्याचे फळ हे १०८ वेळा ॐ त्रिविक्रमाय नम: असे बोलण्याच्या बरोबरीचे आहे, हे आपल्याला समजायला हवे.

गुरुमंत्र म्हणजे काय तर जो एकदा म्हटल्यावरही मला १०८ वेळा म्हटल्याचे सामर्थ्य प्राप्त होते. जेव्हा मी श्रद्धेने गुरुमंत्र म्हणतो तेव्हा तो माझ्या शरीरातील १०८ केंद्रावरही कार्य करतोच. माझ्या weak केंद्रांना strong बनवण्याचे कार्य हा त्रिविक्रमच करत असतो . 

त्रिविक्रम निलयं ह्यातील निलय म्हणजे काय तर घराचा असा भाग की जो फक्त खास घरातल्यांसाठीच आहे. 
गुरुक्षेत्रम हे कुठल्या विशिष्ट जागेशी संबंधीत नाही. गुरुक्षेत्रम म्हणजे काय हे आम्हांला नीट कळले पाहिजे, हे पाच गोष्टींनी बनलेले आहे ते म्हणजे ती अनसूयेची तसबीर, ती दत्तगुरुंची तसबीर, महिषासुरमर्दिनी, धर्मासन व ह्या चारही गोष्टींवरचा stamp म्हणजे त्रिविक्रम. आज गुरुक्षेत्रम इथे मुंबईत आहे उद्या मला वाटले तर अमेरिकेत नेईन, पाकिस्तानात नेईन, मी मागेही सांगितले आहे पाकिस्तान हा देश मला फार आवडतो ह्यासाठी कोणाचे काही objection असेल तर मला त्याचे काहीही घेणे देणे नाही. 

गुरुक्षेत्रम मंत्र हा मला माझ्या सद्‌गुरुंनी दिलेला मंत्र आहे. जेव्हढा वेळ तुम्ही गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणता त्यावेळी तेव्हढा वेळ ते गुरुक्षेत्रम्‌ तुमच्या मनामध्ये तयार होत असते आणि गुरुक्षेत्रम्‌ आले म्हणजे त्यातील चारही गोष्टी व त्रिविक्रमही आलाच ह्यांच्यासोबत त्या धर्मासनावर बसलेला आमचा मित्रही तेव्हढया वेळेसाठी आमच्या मनामध्ये येतो. पण जर मी १० वेळा म्हटले तरी काही फायदा झाला नाही असा विचार करुन मी हा मंत्र म्हटला तर काहीही उपयोग होणार नाही. 

दिल्लीतल्या घरात दोन जागा असतात एक दिवाण-ए-आम आणि एक दिवाण-ए-खास ह्यातील दिवाण-ए-आम हे सगळ्या लोकांसाठी असते तर दिवाण-ए-खास हे फक्त घरातील खास व्यक्तींसाठी असते.
निलयं म्हणजेच दिवाण-ए-खास . "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी..." 

गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणताना काम, क्रोध ह्यांची मनातील गर्दी हलवायचा प्रयत्न करा.
समजा १०८ वेळा जर पूर्ण म्हणता येत नसेल तर फक्त अंकुर मंत्र १०८ वेळा म्हटला तरी चालेल. 
माझे मन मला गुरुक्षेत्रम्‌ मंत्रासाठी दिवाण-ए-खास बनवायला हवे 

मंत्र म्हणताना एखाद वेळी चुकलो तर tension नको आमचा बापु बसला आहे सांभाळून घ्यायला.

पण असे म्हणताना जर एरव्ही बापूवर विश्वास नसेल तर काहीही उपयोग नाही.
मी (प.पू.बापु) गेल्यावेळी सांगितले मला जेव्हढे आवश्यक तेव्हढेच ऐकू येते, आवश्यक तेव्हढेच दिसते. आमचा बापू कसा आहे तर रोबो आहे, यांत्रिक मानव आहे व त्याची बटणं आमच्या हातात आहेत. त्याची आमच्याकडे पाहण्याची, बोलण्याची बटणं आमच्याच हातात आहेत. जर आम्ही चालण्याचं बटण बंद केले तर तो आमच्याकडे चालत येणार नाही, म्हणजेच बापूने माझ्यकडे चालत यायचे की नाही हे कोण ठरवतो? तर मीच ठरवतो व ह्यालाच कर्म स्वातंत्र्य म्हणतात . 
बापूने आमच्यासाठी काय करायचे हे ठरवणारा रिमोट कंट्रोल कुणाकडॆ आहे तर आमच्याच कडे आहे. पण असे असले तरी तुमच्या संगण्यावरुन तो दुसर्‍याला सजा देणार नाही हे लक्षात ठेवा. 

तुमच्याकडे असलेला रिमोट कसा वापरायचा हे तुम्ही ठरवत नाही. जेव्हा बापूला काहीही समजत नाही असा विचार मनात येतो तेव्हा माझ्याकडच्या रिमोट्चे बटण मी बंद करतो आणि मग बापूला काहीही काळत नाही. 
मी ह्याआधीही अनेक वेळा हे सांगितले आहे की मला काहीही कळत नाही. मी कधी भगवे कपडॆ घालतो का? 

मी दिसायला तुमच्यासारखाच आहे मला काही चार हात किंवा दहा पाय नाहीत, मी कुठेही भाला- धनुष्य घेऊन फिरत नाही... मग अश्या माणसाचे प्रवचन ऐकुन तुम्हांला काय मिळणार आहे? 
आज ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने स्वत:हून प्रेमाने द्यायचे आहे? मी बापूकडे का येतो? माझ्यात आणि बापूत काय फरक आहे?

माझ्या एका student ची गोष्ट इथे सांगतो, मी M.D. साठी त्याला शिकवायला होतो. M.D च्या परिक्षेसाठी lucky म्हणून माझा एप्रन व स्टेथोस्कोप तो घेऊन गेला होता. परिक्षा झाल्यावर मी तिथेच त्याच्या रूम बाहेर उभा होतो. हा जेव्हा परिक्षेवरुन आला तेव्हा त्याने आल्या आल्या तो अप्रन व स्टेथोस्कोप समोरच्या खुर्चीवर ठेवला व तिथे मी आहे असे समजुन म्हणाला, "Dr.A.D.Joshi, I passed my exams, we both are equal. you also M.D and i am also M.D..Sir now no more firing please."
मी तिथेच उभा राहुन हे ऐकत होतो. इथे ह्या मुलाचा बालभाव होता त्या क्षणासाठी त्याचा शिक्षक त्याचा मित्र झाला होता व तो त्यास मी पास झालो आहे सर, आता मला तुम्ही ओरडायचे नाही, हे कौतुकाने सांगत होता.

हाच मुलगा त्याच्या लग्नाच्या वेळी सकाळी माझ्या दादरच्या घरी आशीर्वाद घेण्यासाठी आला व परत लग्नानंतरही बायकोसोबत आशीर्वाद घेण्यासाठी आला. त्याच्यासाठी मंदिरातील देव नंतर होते आधी सरांना नमस्कार हा त्याचा भाव होता. 
आमचा बापू काय करतो तर बापू शरीराची व मनाची treatment करतो, 
पण अश्या treatment पेक्षा रोग होऊच नये म्हणून काय करता येईल हे मला जास्त आवडते. 
आज बापूमध्ये काय एव्हढे special आहे हे विचार करायची वेळ आली आहे. 
मी मागेच सांगितले की ह्यापुढे अनेक भुकंप येतील, खालची माती वर येईल, जमिनीतील बाहेर येईल, बाहेरचं जमिनीत जाईल, समुद्र किनारा सोडून आत येईल, मोठी संकटे येतील ह्या धर्तीवर आमची श्रद्धा बळकट असायला हवी. आम्हांला compitant, potent होता आले पाहिजे. 
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मी सांगितले होते,
"एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऎसा.." 
हे वर्ष अत्यंत महत्वाचे आहे. कारण ह्या वर्षाच्या आधीच्या परिस्थीतीत व ह्या वर्षाच्या नंतरच्या परिस्थीतीत जमीन-अस्मानाचा फरक असणार आहे.

बापू तर आमच्या सारखाच आहे(?) असा विचार करुन आम्ही पाऊल पुढे टाकायचे की नाही हे ठरवायचे आहे. हे तुम्हांला खिजवण्यासाठी नाही बोलत आहे तर तुमच्याच मनात गुणसंकिर्तन घडावे म्हणून सांगत आहे . 

हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे उद्यापासुन पुढच्या गुरुवारपर्यंत वेड लागल्यासारखा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणा, वेळ-काळाचे सोवळं-ओवळ्याचे भान नसले तरी चालेल.

कारण ह्या सात दिवसांमध्ये मी माझ्या तपश्चर्येचा संकल्प खेळवतोय. मी जी तपश्चर्या केली त्याचा संकल्प मी ह्या सात दिवसात मुक्तपणे खेळवतोय. ह्या काळात जो कोणी हा अनिरुद्ध माझा आहे असे म्हणून मन:पूर्वक गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणेल (सांघिक पणे नाही तर एकट्याने) त्यांना मी promise करतो की त्यांच्या मनाचा ५१% भाग हा १०८% त्रिविक्रमाच्या ठशाखाली येणारच. ५१% ही majority आहे हे लक्षात घ्या. म्हणजे इथे सत्ता कोणाची असणार आहे तर चण्डिकाकुलाची. 

माझ्या तपश्चर्येचा संकल्पच हा आहे " अवघाचि संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक" प्रत्येकाला मनाचे सामर्थ्य मिळावे म्हणुन मला जे तपश्चर्येमधुन ब्रम्हास्त्र मिळाले आहे ते मी प्रेरित केले आहे .

एक ध्यानात ठेवा मंत्र म्हणताना तुलना करु नका, तुम्ही जेव्हढं जास्त कराल तेव्हढ माझ काम सोप्प. मी कमीत कमी ५१% सांगितले आहे... अधिक केले जास्त मिळणार नाही असे म्हटले नाही, ते मिळणारच आहे आलं लक्षामध्ये.

ह्या सात दिवसात स्वत:च्या मनामध्ये कायमचं त्रिविक्रमनिलय तयार करण्याची संधी प्रत्येकाला आहे. आज इथून निघताना सुरुवात करा... बापू आम्हांला आवडतो की नाही? आवडतो तर का आवडतो? आवडत नाही तर का आवडत नाही ? ह्याचा विचार हा मंत्र म्हणताना करा. 
मला जरी कुणीही कितीही शिव्या घातल्या तरी ह्या सात दिवसात जर त्याने हा मंत्र म्हटला तर त्यालाही ह्याचे सामर्थ्य मिळणारच आहे. 

आता तुमच्या सोबत मी मंत्र म्हणतोय म्हणजे सुरुवात झाली आहे. जेव्हा आपण पुढच्या गुरुवारी इथे हा मंत्र म्हणणार तेव्हा ह्याचा last minute असेल. आपल्या मित्रांना, नातेवाईकांनाही कळवा.

आमचा बापू आमच्यासाठी काय आहे हे तुम्ही ठरवायचे आहे. मी तुमचा रोबो आहे .
॥ हरि ॐ ॥

0 comments:

Post a Comment