Subscribe:

Monday, June 27, 2011

Excerpts from Thursday Discourse dated 23 June 2011


 सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (२३ -०६-२०११)
                                                                         हरी ॐ
आता आपण दहावी वमनबाधा याचा दुसरा प्रकार बघणार आहोत. ते म्हणजे तीच चूक परत परत करणे. त्यावेळी आपण त्या चुकीच्या मागील कारणाला ओळखले पाहिजे. त्याचे वमन आपल्याला करता आले पाहिजे. जर करु शकत नसू तर वमनबाधा होते.  मलेरिया, टी.बी. असे आजार/रोग होतात. त्यावेळी जर नीट उपचार करुन त्याचे विषाणू दूर केले नाहीत तर तो आजार आपल्याला परत परत होतो. त्याचप्रमाणे चूक देखील परत परत होते. हीचा व्यय नाही असा कोणी नाही. आणि असेल तर तो ‘संत’ आहे. जर आपल्याकडून झालेली चूक एकदाच घडली परत कधीच त्याने ती चूक केली नाही तर ती व्यक्ति ‘संत’ असते की ज्याच्याकडून कधीच कोणतीच चूक घडतच नाही.
यातही दोन प्रकार आहेत एक म्हणजे ज्याला ती चूक केल्यामुळे पश्चात्ताप होतो/आहे आणि दुसरा म्हणजे ज्याला पश्चात्ताप नाही.


ज्या व्यक्तिला पश्चात्ताप होत नाही तो वमनबाधेत मोडत नाही आणि अशावेळी श्रीगुरुक्षेत्रमंत्रदेखील त्याच्या मदतीला धावून येत नाही. कारण ‘ज्याला बदलण्याची इच्छा नाही त्याला देवपण बदलू शकत नाही.’’ अगदी उपासना करुन जादूटोणा करुन देखील नाही. मनुष्य जर स्वेच्छेने एखादी चूक वारंवार करत असेल तर ती चूकच आहे आणि त्याला त्या बाबतीत त्याला पश्चात्ताप नसेल तर ती बाधा नव्हे पाप आहे.


याउलट जर चुकीचा/चुकीबद्दल पश्चात्ताप असेल तर बाधाप्रशमन श्रीगुरुक्षेत्रमंत्र त्या गोष्टीला (चुकीच्या) दूर करतो. पाप दूर करतो. पण जर पश्चात्ताप असेल तरच श्रीगुरुक्षेत्रमंत्र काम करतो.
माझ्याकडून जे घडतंय ते चुकीचे आहे आणि मी त्यातून बाहेर पडायचा ‘प्रयास’ करतो, अशा वेळी गुरुक्षेत्रमंत्र धावून येतो. (आपल्या मदतीला) तो आपले मन बदलतो, गोष्टी  अशा काही घडवून आणतो की आपण तीच चूक परत करणार नाही. पण ज्यांना पश्चात्ताप आहे, आपली चूक आहे हे मान्य आहे त्यांच्याविषयी /बाबतीच हे घडते.
बापू सांगतात, माझ्या क्लिनिक मध्ये माझ्या टेबलवर माझ्या डाव्या हाताला एक बेल ठेवली होती. एक पेशंट गेल्यावर दुसर्‍या पेशंटला बोलवताना बापू ती बेल वाजवून बोलवायचे. ती बेल काही कारणास्तव खराब झाली  आणि नवीन बेल बसवताना ती उजव्या हाताला बसवली. नवी बेल उजव्या हाताला आहे हे माहित असूनसुद्धा पुढचे काही दिवस नवीन पेशंटला बोलवताना हात पहिले डाव्या बेल वर जायचा ती वाजली नाही की मग दुसर्‍या बेल वर. म्हणजे काय ? तर हात आणि बेलची जागा यांचे कंडिशनिंग झाले होते.


‘कंडिशनिंग’ जेव्हा ‘अ’ नावाची घटना/गोष्ट आणि ‘ब’ नावाची घटना किंवा गोष्ट या सतत एकत्र घडतात, त्यावेळी  मेंदूमध्ये एक वेगळे नवीन सेंटर बनते की ज्यामध्ये ‘अ’ आणि ‘ब’ चा परस्पर संबंध असतो. आपल्या जीवनामध्ये जेव्हा २-४ गोष्टी सतत एकत्र घडत राहतात तेव्हा त्यांचे मेंदूमध्ये एक समीकरण तयार होते यालाच कंडिशनिंग  म्हणतात.


एका सायंटिस्टने एक कुत्रा ठेवला आणि एका ठराविक वेळेला एक विशिष्ट /वेगळा बझर लावून तो त्याला त्याचे आवडते खाद्य देत असे. काही दिवसांनी तो फक्त बझर वाजवत असे आणि रिकामी डिश त्याच्यासमोर सरकवत असे त्यावेळी देखील फक्त बझर ऐकून त्या कुत्र्याच्या तोंडात लाळ येत असे, नंतर त्याने डिश सरकवणे सुद्धा बंद केले तो फक्त बझर वाजवत असे आणि तेव्हासुद्धा त्या कुत्र्याची लाळ गळत असे. यावरुनच कंडिशनिंग इफेक्ट लक्षात येतो.


आपल्या मनाचे कंडिशनिंग हे आपणच करतो. काही बाबतीत आपले आईवडिल , संस्कार करणे ही गोष्ट चांगली की वाईट, दिवा लावला की नमस्कार करायचा ही सवय. माझ्या देवासमोर दिवा लागला की हात जोडला जातो ही सवय असते.
कंडिशनिंग जे आहे ते स्थळ, काळ, दिशा, वेळ आजूबाजूची परिस्थिती यावर अवलंबून नसते. आणि सवय जर आजूबाजूची परिस्थिती अनुकूल असेल तरच प्रकटते. समजा एखादा मुलगा सिगरेट पित असेल आणि त्याचे आईवडिल त्याच्यासमोर असतील, तर ती त्याची सवय असेल तर तो आईवडिलांसमोर पिणार नाही आणि जर का ते कंडिशनिंग असेल तर मात्र तो बिनधास्त ती सिगारेट त्यांच्यासमोर पण ओढेल.


‘‘सवयीपेक्षा कंडिशनिंग’ तीव्र असते. कंडिशनिंग मनुष्याला निर्लज्ज बनवते. त्याला स्थळ, काळ, वेळ बघायची गरजच भासत नाही. सवय आपण बंद करु शकतो.
तर बापू हे कसं काय ?


जर एखादा मनुष्य दारु पितो, दररोज एक पेग- त्याचा संबंध दुःख किंवा आनंदाशी नाही तर सवय.
पण ज्याक्षणी तो डोक्याला शांती मिळते, दुःख विसरल जातं, आनंद व्यक्त करता येतो म्हणून पितो ते कंडिशनिंग - त्यामुळे व्यसन लागते. सुटणारी ती सवय आणि न सुटणारी- कंडिशनिंग / व्यसन आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट सुधारायची किंवा नाही ‘इट डिपेंडस ऑन कंडिशनिंग’.


मोठ्यातला मोठा कंडिशनिंग मधून बाहेर यायला कंडिशनिंग च मदत करते.
निगेटिव्ह कंडिशनिंग चुकीचे. पॉझीटिव्ह कंडिशनिंग चांगले. की जे वाईटातून बाहेर पडायला मदत करते.
जर व्यक्ती दुःख विसरण्यासाठी किंवा चांगली ऍक्टिंग करतो म्हणून दारु/सिगरेट पित असेल त्यावर डिपेंडंट राहत असेल म्हणजे व्यसनी बनत असेल आणि जर त्याला त्यातून बाहेर पडायचे असेल तर त्याचे ऍक्टिंग दुसर्‍या गोष्टीबरोबर जोडले पाहिजे. दारु पिण्याने माझी ऍक्टिंग चांगली होते तर त्याने दारु प्यावी पण त्याबरोबर स्वतःच्या मनाने एखादे स्तोत्र म्हणावे की हा अमुक स्तोत्र बोलल्यावर माझी ऍक्टिंग चांगली होते. हळूहळू ती व्यक्ति पाच पेग दारु ऐवजी चार पेग आणि एकदा स्तोत्र पठण, तीन  पेग आणि दोन वेळा स्तोत्र पठण असे करत करत स्तोत्रांची संख्या वाढवत न्यायची  आणि पेगची संख्या कमी करत न्यायची. असे केल्याने त्याच्या मेंदूमध्ये पठणाचे नवीन केंद्र तयार होईल आणि त्याचे ऍक्टिंग चे केंद्र स्तोत्र पठण केंद्राशी जोडले जाईल. दारुच्या केंद्राची सत्ता कमकुवत होईल व पठणाच्या केंद्राची सत्ता वाढेल.
कंडिशनिंग वाईट किंवा चांगले हे आपल्यावरून ठरते. ती गोष्ट आणि माझे रिलॅक्सेशन (निवांतपणा) आपल्या नकळत चूक आणि रिलॅक्स होणं यांचं कंडिशनिंग होते.


आपण जेव्हा एखादी चूक करतो तेव्हा त्याचे ३ टप्पे असतात,
जेव्हा चूक घडत असते ती वेळ,  चूक करायच्या आधीची वेळ, आणि चूक केल्यानंतर,  हे ते तीन टप्पे.
त्यामध्ये पहिले चूक होऊ नये म्हणून आपण टेन्शन घेतो (चूक करायच्या आधीची वेळ).
चूक करताना रिलॅक्स असतो (चूक घडत असते ती वेळ).
आणि चूक केल्यानंतर पुन्हा आपण टेन्शन घेतो.


समजा १२ तास आपण उदाहरणादाखल घेतले व ह्याचे ३ टप्पे केले (४तास + ४ तास +  ४ तास)


त्यामध्ये पहिला आणि शेवटचा पिरिअड टेन्शन असते (४ तास + ४ तास) आणि चूक करताना रिलॅक्स पिरियड असतो (४ तास). रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले जागृत मन झोपते पण अंतर्मन मात्र विचार करत असते ते जागृत असते.
आणि अशा या अंतर्मनाला रिलॅक्सेशन आवडतं आणि ते तेच धरुन ठेवते.  अंतर्मनाच्या दृष्टीने आपण एकाच गोष्टीमुळे आठ तास टेन्शन आणि चार तास रिलॅक्स झालेलो असतो. अशावेळी अंतर्मन जेवा आपण रिलॅक्स (निवांत) झालेलो ते ४ तास धरून ठेवते व त्याचे केंद्र वाढवते (म्हणजेच चुकीचे केंद्र) आणि ते ‘चुकीच्या’ केंद्राशी जोडले जाते.
तसेच चूक घडण्याआधी व चूक घडल्यावर आपल्याला जो पश्च्त्ताप होतो व टेन्शन येते (४ + ४ = ८ तास) ह्या वेळात आपण निवांत नसतो, म्हणून अंतर्मन ह्या केंद्राला (चूक ना करण्याच्या केंद्राला) कमी ताकद पुरवते म्हणजेच हे केंद्र लहान बनते.
आणि मग साहजिकच चूक न करणार्या केंद्राची ताकद कमी झाल्याने  चुकीचे केंद्र (चूक करण्याचे केंद्र)  आपल्या बाह्या मनाला भारी पडते, आणि परत परत चुका होतच राहतात.




तर अशी वेळी काय करावे?


चूक घडण्याआधीचे ४ तास टेन्शन घेण्याऐवजी स्थळ बदला, देवळात जा, ते नसेल करायचं तर पिक्चरला जा, सार्वजनिक ठिकाणी जा, मोहाच्या ठिकाणी राहू नका.
समजा तुम्ही ऑफिस मध्ये आहात. एकच रुम आहे आणि तुम्ही दोघंच आहात, बाहेर पडू शकत नाही तर अशा वेळी  ती चूक केल्यामुळे आपल्या पत्नीला किती वाईट वाटेल याचा विचार करा  म्हणजे चूक केल्यानंतरचे चार तास उगाळा. आणि जर का चूक घडली (त्यातूनपण) तर पहिले चार आणि नंतरचे चार तास अशी डबल केंद्रं मनामध्ये तयार होतात. आणि त्यामुळे अंतर्मनात चूक केल्यामुळे टेन्शन निर्माण होते.




चांगली माणसे चूक घडू नये म्हणून प्रयत्न करत असतात पण त्यांचे अंतर्मन त्यांना दुर्बल करते.    
मी चूक केली हे कुणाला कळलं नसलं तरी माझ्या देवाला ते कळतं.
चूक करण्याआधीचे चार तास तो माझ्यावर रागवला होता.
मी चूक करत असताना तो संतापलेला आणि त्याला दुःखही होत होतं आणि चूक झाल्यानंतर त्याला माझ्याविषयी सहानुभूती देखील असते.


चूक करताना सद्गुरुचे नामस्मरण करा. माझं (प.पू.  बापूंचे) नाव घ्या.तुमची चूक करण्याची वृत्ती कमी होईल आणि चांगली वृत्ती दहा पट वाढेल. तोच माझा (बापूंचा) धंदा आहे. प्रेमाने मला जे मान्य आहे ते बोलतो. ‘‘तुम्ही सामान्य माणसे आहात, तीच चूक वारंवार करत असताना, घडत असतांना, ती ओझी वाहताना मला सोबत घ्या.’’
अंतर्मन त्या सद्गुरुच्या ताब्यात द्या.
चूक करताना जेव्हा आपण ‘साई , साई’ असे म्हणतो त्यावेळी आपल्या मनामध्ये ‘साई’ नावाचे केंद्र तयार होते आणि दारु पिण्याची इच्छा होत नाही.
पण सद्गुरुतत्त्वाचेच नाव घ्या त्याच्या दुसर्‍या रुपाचे नाव घेऊ नका. रुप जरी त्याचे असले तरी त्यांची कार्य वेगळी आहेत.
‘जिस जिस पथ पर भक्त साई का, वहॉं खडा हैं साई’
तुम्ही कुठेही जाता तिथ तिथे तुमचा सद्गुरु आधी उभा असतो. तुम्ही जेव्हा पाप करताना देवाचे नाव घ्याल तेव्हा सद्गुरुतत्त्वाचेच नाव घ्या. त्याच्या दुसर्‍या रुपाचे नाव घेऊ नका कारण त्या रुपाकडे तेवढ्या प्रमाणात क्षमा नसेल. अकारण कारुण्य जेवढे सत्गुरुंकडे असतं तेव्हढ दुसर्या कुणाकडेही नसतं.


आम्ही पाप केले तर आमच्या सद्गुरुला दुःख होतं आणि जर पाप करताना त्याचे नाव घेतले तर त्याला दुःख होत नाही. ‘माझ लेकरु सुधरतयं मलाही जरा प्रयत्न करु देत’ असे त्याला वाटते.
ज्यावेळी आपल्या मनाला पश्चात्ताप होतो त्यावेळी आपला वाईट कंडिशनिंगशी संबंध संपतो.
चांगल्या माणसावर वाईट कंडिशनिंग लवकर होते तर चांगले कंडिशनिंग उशीरा होते. वाईट माणसाला कंडिशनिंग होत नाही ते सर्व दिखावे असतात.


आपल्या अंतर्मनावर जर (अंतर्मनात) परमात्मा असेल (नाम) असेल तर आपले बाह्यमन कंट्रोल मध्ये रहाते.
आपण जेव्हा प्रार्थना-आमंत्रण करतो, त्यावेळीच तो परमशिव आपल्या मनामध्ये येतो ते ही आपले आमंत्रण आहे तेवढ्यापुरतेच आणि तोपर्यंतच राहतो. त्याला पूर्णपणे शरणागत जा, तो कायमचा तुमच्या मनात राहतो.


श्रीसाईसच्चरितामध्ये एका कथेत सांगितल्याप्रमाणे एक म्हातारी साईबाबांकडे गुरुमंत्र द्या म्हणून उपोषण करते. बाबा तिला म्हणतात,‘‘काय गं आई? माझ्या गुरुने माझे कान फुंकले नाहीत तर मी काय फुंकू? तु माझ्याकडे अनन्य भावाने बघ, मी तुझ्याकडे बघेन त्याच भावाने.’’


सद्गुरुकडे प्रेमाने बघा, तुम्ही ज्या भावाने बघाल, तो त्या भावाने तुम्हाला बघेल. जर वाईट दृष्टीने बघितलं तर तो डोळे बंद करुन घेतो. त्याला काही फरक पडत नाही.
बघण्याचे प्राबल्य त्यालाच आहे ज्याचे तुमच्यावर प्रेम आहे.


आदिमाता परमात्म्याला सृष्टीचक्र आणि संहारचक्र घेऊन अवतार घ्यायला लावते.
१) राम - १०८% सृष्टीचक्र घेऊन आला आणि आवश्यकतेपुरते संहारचक्र वापरले. म्हणजेच सृष्टीचक्र प्रधान आणि संहारचक्र गौण  (उपांग)
२) परशुराम - संहारचक्र (प्रथम कालखंड) आणि सृष्टीचक्र (नंतरचा कालखंड)
३) कृष्ण - संहारचक्र (प्रधान) आणि सृष्टीचक्र (उपांग)


पण तोच परमात्मा जेव्हा सद्गुरुच्या (साई) रुपात अवतरित होतो तेव्हा ती आदिमाता त्याला दोन्ही चक्रांच्या सहीत पाठवते म्हणजेच ..........
त्याच्या उजव्या हातात सृष्टीचक्र तर डाव्या हातात संहारचक्र
उजव्या पायात संहारचक्र तर डाव्या पायात सृष्टीचक्र.
म्हणजेच त्याला पाहिजे आणि हवे तसे ‘तो’ (सद्गुरु) काळानुसार घटनेनुसार त्याचा वापर करतो. त्याच्या प्रत्येक वागण्यात, चालण्यात, हातवार्‍यांमध्ये भाव असतो आणि त्याचे कारण वेगवेगळे असते. त्याच्याकडील सृष्टीचक्र हे त्याच्यावर प्रेम करण्यांसाठी चांगल्याची निर्मिती करते, तर संहारचक्र वाईट गोष्टींचा नाश करते.


म्हणूनच सद्गुरुच्या पादुका नेहमी पूज्य असतात. त्याचे पादुकापूजन आपण करतो. त्याला आमंत्रण देतो.
तो आपल्या डाव्या पायाने चांगल्याची निर्मिती करतो तर उजव्या पायाने वाईटाचा नाश करतो.
आदिमाता परमात्म्याला का पाठवते? (सद्गुरु रुपात)
कारण - परत परत तीच चूक करणे हा परमात्म्याचा गुणधर्म आहे म्हणूनच युगानुयुगे लोटली तरी वाईट माणूस सुधारेल म्हणून तो क्षमा करतो आणि त्याचे परिमार्जन ते सर्व दुरुस्त करण्यासाठी- ती आदिमाता सद्गुरुतत्त्वाची निर्मिती करते. 



तो क्षमा करत राहतो म्हणून आई सद्गुरुतत्त्वास दोन्ही चक्रे घेऊन पाठवते. जो सद्गरुतत्त्वाचा आश्रय घेतो. त्याच्या  आयुष्यात सद्गुरु नेहमी हात व पाय यांसहित कार्य सुरु करतो. हे करण्यासाठीच .......
बाबा सांगतात,‘‘तू माझ्याकडे बघ, मी तुझ्याकडे बघेन  .......................
परमात्मा चूक करतो पण भल्यासाठी.
आईच्या आज्ञेच्या बाहेर जाऊन तो क्षमा करतो म्हणून त्याला परत परत यावं लागतं.
‘‘परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम्’’
म्हणूनच आम्हाला घट्टपणे सद्गुरुतत्त्वाचे चरण, हात , नितांत श्रद्धा आणि प्रेमाने धरुन ठेवले पाहिजेत.
हरी ॐ

1 comments:

Bhagyashree said...

thank you so much...Bapu.

Post a Comment