Subscribe:

Wednesday, September 14, 2011

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०८.०९.२०११)


                                         !! हरि ॐ!!

    ‘ॐ मंत्राय नम:’ गुरुक्षेत्रम् मंत्राविषयी बघत आपण पुढे चाललो आहोत. १३ पदांचा हा मंत्र आहे. १३ हा अतिशय शुभ अंक आहे. माझा (परमपूज्य बापू) आणि नंदाचा विवाह १३ मे ह्याचदिवशी झाला. पौरसचा जन्म ही १३ एप्रिलचाच. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्रही १३ आकडी. १३ अंक हा कधीच अशुभ होऊ शकत नाही. श्रद्धावंतांसाठी अतिशय लकी आकडा आहे.

    गुरुक्षेत्रम्‌मंत्राच्या १३ पदांपैकी पहिले पद आपण बघितले, ‘सर्वबाधाप्रशमनं’ प्रत्यक्षच्या अग्रलेखांमधून चण्डिका कुल समजून घेतले, त्यांची स्कंदातील स्थाने बघितली.
    गुरुक्षेत्रम्‌ मंत्रातील पहिले पद ‘सर्वबाधाप्रशमनं’ व त्यापुढे ‘सर्वपापप्रशमनं’ व ‘सर्वकोपप्रशमनं’ ही पदे येतात. हे आधीच लक्षात ठेवून मी (परमपूज्य बापू) काही महिन्यांपूर्वीच कामाला लागलो व माझ्या १०८ मेकअपमनना पण कामाला लावले. माझे मेकअपमन कुठल्या रुपात तुमच्या समोर येतील तुम्हांला कळणारही नाही, त्यांनी मग सगळीकडे जाऊन बघितले कोण गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणतो, कोण दुसर्‍यांनी केलेल्या लड्या स्वत:च्या नावावर जमा करतो. हे सगळं बघितल्यावर माझ्या लक्षांत आलं की, माझ्यावर प्रेम करणा‍र्‍या श्रद्धावंताच्या उपासना नीट होत नाहीत. कायिक, वाचिक, मानसिक अनेक चुका त्यांच्याकडून घडत आहेत. मग मी (परमपूज्य बापू) विचार केला की, माझं ह्या गुरुमंत्रासोबत असणारे अभयवचन खरं ठरावं, ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्रिपुरारि पौर्णिमेला किरातरुद्र येणार आहे, मग त्यासाठी माझ्या बाळांची तयारी कितपत आहे, हे आवश्यक आहे.

    ह्यासाठी मी (परमपूज्य बापू) अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, प्रत्येकाने ‘श्रीराम’ म्हणा.
    ह्या अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते शुभंकरा नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच रामनवमीपर्यंत मी स्वत: माझ्या माय चण्डिकेची घोर तपश्चर्या करणार आहे.कारण, माझ्यावर प्रेम करणार्‍या श्रद्धावंताच्या चुका, पापे जास्तीत जास्त dilute  करुन, त्यांना क्षमा मिळावी, अशी माझी इच्छा आहे. यासाठी माझ्या आईची उपासना करुन गुरुक्षेत्रम्‌ मंत्राचे सामर्थ्य प्रत्येकाला प्राप्त होईल, अशी यंत्रणा निर्माण करणार आहे.

    ह्या सहा महिन्याच्या काळात मी गुरुवारी प्रवचन करेनच असे नाही, मला वाटले तर मी बोलेन, नाहीतर नाही बोलणार. कदाचित दर गुरुवारी येणारही नाही. पण मी गुरुक्षेत्रम्‌ मध्ये नक्की रोज खाली येईन. एकदा येईन की १० वेळा येईन मला (परमपूज्य बापू)  माहीत नाही.
    मी (परमपूज्य बापू) basically ह्या सहा महिन्याच्या काळात संपूर्ण procen मध्ये मुक्तावस्था स्विकारणार आहे. कारण मी माझ्या बाळांची परिस्थिती बघतोय. कुठे बॉम्बस्फोट होतोय, भूकंपही होतोय. प्रत्येकाच्या जीवनातही अनेक संकटे येतच आहेत, सगळीच गणितं बिघडत चालली आहेत.
    परव दिवशी घरात बोलत होतो, तेव्हा कळले की, मोदक ४०० रुपये किलो झाले आहेत.१९७० साली ८ ते १० रुपये साधे मोदक असायचे, आज तेच ४०० रुपये किलो झाले आहेत. आज आमची परिस्थिती काय होत चालली आहे? सकाळी घराबाहेर पडलो की परत घरी सुखरुप येईपर्यंत चिंता लागून असते. मुलगा-मुलगी कितीही चांगले असले तरी बाहेर जाऊन ते बिघडणार नाही ना? ही चिंता सतत पालकांना असते.

    ह्या सगळ्या गोष्टींना माझ्या परिवारात तरी आळा बसला पाहिजे. मी संत नाही, मी partial आहे. जे माझ्यावर प्रेम करतात, त्या प्रत्येकासाठी मी partial आहे. मला पापांची घृणा आहे पण पापियाची नाही. जोपर्यंत पापी सुधारायला बघतो, तोपर्यंत मी त्याच्यावर प्रेम करतो.
    आजच्या स्थितीत आपल्याला चांगल्या प्रकारे भक्ति व सेवा करता आली पाहिजे. 
    मला (परमपूज्य बापू) प्रत्येक बाळाला, तो कितीही दलदलीत रुतला असेल व त्याचं माझ्यावर प्रेम असेल तर मला तिथे येऊन हात देता आला पहिजे. यासाठीच मला माझ्या आई चण्डिकेची तपश्चर्या करायची आहे.

    ही तपश्चर्या प्रामुख्याने तीन प्रकारे होणार आहे -

१) आदिमाता चण्डिकेच्या ब्रह्मत्रिपुरसुंदरी स्वरुपाची उपासना

२) माझ्या (परमपूज्य बापू) गुरुंनी दिलेली बलातिबला उपासना
३) सावित्री उपनिषदानुसार सावित्री स्वरुपाची उपासना


    ही उपासना अश्विन शुद्ध नवरात्रीच्या अर्थात अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते चैत्र नवरात्रीच्या अर्थात शुंभकरा नवरात्रीच्या नवव्या दिवसापर्यंत म्हणजेच रामनवमीपर्यंत चालणार आहे. ह्या काळात मी स्वत:ला कुठलेही बंधन ठेवणार नाही पूर्णपणे उन्मुक्त अवस्थेत मी स्वत:ला ठेवेन.
    कारण मला माझ्या बाळांच्या घडणार्‍या चुका दिसतात, अशावेळी मी शांत बसू शकत नाही. मी माझ्या मार्गाने पुढे चालणारच आहे. तुम्ही म्हणाल, ‘अशावेळी बापू आम्ही काय करायचे?’ तर, जेवढे जमेल तेवढी उपासना करा. कमीतकमी दिवसातून १ वेळा विश्वाच्या कल्याणासाठी हनुमानचलिसा अर्पण करा. तेव्हा म्हणायच, ‘बापू, विश्वकल्याणासाठी ही हनुमानचलिसा समर्पित.’
    स्वत:ला घ्या काळात पापी समजून दोष देऊ नका, स्वत:ला कमी लेखू नका. कारण माझा बापू माझ्यासाठी बसला आहे. जो मला कधीच टाकणार नाही, ह्या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवा.

    ह्या सहा महिन्याच्या काळात मी २४ x ७ तपश्चर्येत असणार आहे. मी आणि माज़ी आई बस एवढच नातं ह्या काळात असणार आहे. बाकी सगळे संभाळायला तिचे ज्येष्ठ पुत्र दत्तात्रेय व हनुमंत सिद्ध झालेले आहेत. सोबत तुमची नंदाई आणि सुचितमामाही सर्व समर्थपणे सांभाळायला आहेतच.
    ह्या तपश्चर्येतून दोन गोष्टी साधल्या जाणार आहेत त्या म्हणजे - 

१) सर्वांग ब्रह्मस्त्र व 
२)सर्वांग करुणाश्रय


    जे जे चुकीचे वाईट आहे, माझ्यावर प्रेम करणार्‍यांना त्रास देणारे आहे, त्यांच्यासाठी ब्रह्मस्त्र असेल तर जे माझ्यावर (परमपूज्य बापू) प्रेम करतात, भारतावर प्रेम करतात त्यांच्यासाठी सर्वांग करुणाश्रय असेल. ह्या दोन गोष्टी मी स्थिर करुन रामनवमीच्या दिवशी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये स्थापन करणार आहे.
    तिसर्‍या महायुद्धाचे पडघम वाजू लागले आहेत, असं मी मागे म्हटलं होते त्या डाकिणीचा संचार सुरु झाला आहे. आता मला उभं राहायलाच पाहिजे अतिशय शांतपणे.
     ‘सर्वपापप्रशमनं श्रीगुरुक्षेत्रम्‌’ सर्व पापांचा उद्धार ह्यातून होऊ शकतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी होऊ शकतो, मग आम्ही का नाही बदलू शकत? नक्कीच बदलू शकतो.

   खूप मोठी विकासाची संधी ह्या सहा महिन्याच्या काळात अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हांला मिळणार आहे, कारण इथे सोबत माझीही उपासना असेल. मानवी मर्यादा असल्याने तुम्हांला कायम उपासना करायला जमणार नाही, मला मान्य आहे पण माझ्यावर प्रेम करणार्‍या बाळांची ताकद नक्कीच मोठी आहे.
    ह्या काळात मी प्रवचनात बोलणार नाही, पण काही गोष्टी अशा आयोजित करणार आहे, की ज्यामुळे तुमची क्षमता व सामर्थ्य अधिकाअधिक वाढेल. तुम्हांला याचक बनावे लागू नये, यासाठी माझे प्रयास आहेत, हे उपकार नाहीत. आई-वडिल आपल्या बाळांसाठी करतात ते कधी उपकार नसतात.

    माझी theory साधी सोपी आहे, माझं घर पहिले, माझं घर म्हणजे हॅप्पी होम मधले सातव्या मजल्यावरचे घर नव्हे तर माझं घर म्हणजे माझ्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण.
      एखादी उपासना करताना जर उच्चार नीट जमत नसतील, तर ती जबाबदारी माझी, तुमची नाही. बापू समर्थ आहे, तुमचं ओझं बाळगायला.
    जोमदारपणे आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. रामनवमीनंतर परत आधीप्रमाणेच प्रवचन regular सुरु होईल. किंवा त्यात काही changes  असतील तर ते तेव्हा ठरतील.
    निर्धास्त रहा, confident  व्हा आणि सुखाने जगा, एवढीच माझी इच्छा आहे. आज आपण गुरुक्षेत्रम्‌ मंत्र ५ वेळा म्हणणार आहोत.

                                                           !! हरि ॐ!!

0 comments:

Post a Comment